६ स्वस्तातील सुपर फूड, जे तुमच्या खिसा खाली न करता देतात हेल्थ मॅजिक 

तब्येत पाणी
Updated Sep 26, 2019 | 18:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

असे काही खाद्य पदार्थ असतात, जे फायदेशीर असून ते खूप महाग नसतात. आम्ही तुम्हांला असे ६ स्वस्तातील सुपर फूड्स सांगणार आहोत.  ते सध्या प्रचलित असलेल्या सुपर फूडसाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. 

6 cheaper super foods that won t burn a hole in your pocket yet do the health magic news in marathi
६ स्वस्तातील सुपर फूड, जे तुमच्या खिसा खाली न करता देतात हेल्थ मॅजिक  

'वजन कमी करण्यासाठी हे ६ सुपरफूड्स ट्राय करा.  हे सुपर फुड्स तुमचे आयुष्य बदलून टाकतील. अशा प्रकारचे अनेक लेख तुम्ही वाचले असतील. यातील 'सुपर फूड' हा शब्द खूप आकर्षक आहे.  वजन कमी करणे किंवा रोग बरे करण्याची विशेष क्षमता  आहे, तसेच ते पदार्थ  कसे पौष्टिक आहेत, याबद्दल नेहमीच वैज्ञानिक चर्चा घडतअसते. पण या संदर्भात कोणताही ठोस पुरावा हे सिद्ध करण्यासाठी सादर केला जातो. 

मोठ्या कंपन्या आणि समूह त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी अशा संज्ञा वापरण्यास संकोच करीत नाहीत. खरं तर हे आहे की, तुम्ही जर योग्य अन्न खाल्ले आणि अॅक्टीव्ह राहिले तर तुम्हांला कोणत्याही सुपरफूडची गरज नसते. तुम्ही जर तुमच्या आरोग्याची काळजी घेतली नाही. कोणतेही सुपर फूड तुम्हांला वाचवू शकत नाही. 

जे अन्न तुम्हांला फायदे देते ते नेहमी सुपर महाग (खर्चीक) असते असे नाही. आम्ही तुमच्यासाठी असे ६ कमी खर्चिक आणि सध्या प्रचलित असलेल्या सुपर फूड्सला पर्यायी खाद्य पदार्थ सांगणार आहोत. त्यांने तुम्हांला नक्कीच फायदा होईल. 


मसूर 

क्विनोवा या सुपर फूडसाठी एक स्वस्त आणि प्रथिनेयुक्त पर्याय म्हणून मसूरकडे पाहिले जाते. मसूरमुळे हृदयरोग दूर राहतो आणि तुमचे हृदय नेहमी निरोगी राहते. मसूरची डाळ किंवा मसूरची आमटी करणे खूप सोपे असते आणि ते खूप चविष्टही असते. 

ब्रोकोली 

हेल्दी डायटसाठी ब्रोकोली हे अत्यंत महत्त्वाची हिरवी भाजी आहे.  कॅले या सुपर फूडला ब्रोकोली हा पर्याय आहे. यात व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमची मात्रा अधिक असते. यात अँटीऑक्सिडंटची मात्रा अधिक असल्याने तुमचे हृदय निरोगी राहते. 

पालक 

पालक हे सर्वात चांगले सुपर फूड आहे. याला कोणीही मागे टाकू शकत नाही. यात लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते.  तसेच गव्हाच्या गवतापेक्षा दुप्पट प्रमाणात क्लोरोफिल असते. 


अंडी 

चिया सिड्सला उत्तम पर्याय अंडी आहेत. चिया सिड्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. पण या चिया सिड्स खूप महाग असतात. त्या मानाने अंडी खूपच स्वस्त असतात आणि त्यांच्यात सारख्याच प्रमाणात प्रोटिन असते. अंड्यातील फॅटचे प्रमाण हे हृदयासाठी खूप चांगले असते. 


हरभरा 

काजू हे खूप पौष्टिक असतात. पण काही काजूतील काही प्रकार खूप महाग असतात. त्याशिवाय हरभऱ्याचा वापर करा. यात  फायबर युक्त चांगले कार्बोहायट्रेड आणि प्लान्ट बेस प्रोटीनचे योग्य संतुलन यात असते. हरभरा खूपच स्वस्त आहे आणि त्यापासून पदार्थ तयार करणे सोपे आहे. त्यांना भाजून घ्या आणि ते कधीही खा. 

केळी 

तुमच्या कार्यालयातील फळांची टोपली ही निरोगी अन्नाचा चांगला स्त्रोत आहे. यात यात पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन सी आणि अॅमिनो अॅसीड असते. ते तुमच्या शरिराला तजेला देण्यासाठी सेरोटोनिनची निर्मिती करते. 

त्यामुळे कशाची वाट पाहत आहेत?  त्यामुळे आताच तुमची पिशवी उचला आणि वर सांगितलेल्या हेल्दी फूडची खरेदी करायला बाहेर पडा.  जे तुम्हांला चांगले आरोग्य देतील तसेच खिसा खालीही करणार नाहीत. 

आरोग्य आणि पौष्टिकतेविषयी  इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा GOQii अॅप डाऊनलोड करा. आणि  मान्यता प्राप्त हेल्थ एक्स्पर्टने कंडक्ट लाइव्ह कोचिंग सेशन अटेंड करू शकतात.  यात तुम्ही जे ज्ञान प्राप्त कराल, त्याच्या मदतीने इंडिया हेल्थ क्विझ ( या प्रश्नमंजुषा) मध्ये भाग घेऊन आकर्षक बक्षिस मिळवू शकतात. 

जागरूक रहा, निरोगी रहा 

( हा लेख प्रायोजित आहे.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...