ayurvedic tips : थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला, घसा दुखणे, घसा खवखवणे यावर 6 प्रभावी घरगुती उपाय

ayurvedic tips, home remedy for winter problems, 6 effective home remedies for cold, cough, sore throat in cold days : थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला, घसा दुखणे, घसा खवखवणे अशा स्वरुपाचे त्रास अनेकांना होतात. जाणून घ्या हे त्रास बरे करणारे 6 प्रभावी घरगुती उपाय. 

ayurvedic tips
थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला, घसा दुखणे, घसा खवखवणे यावर 6 प्रभावी घरगुती उपाय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला, घसा दुखणे, घसा खवखवणे यावर 6 प्रभावी घरगुती उपाय
  • आल्यात अँटी बॅक्टेरिअल, अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी ऑक्सिडंट  गुण
  • आल्यात पचनक्षमता सुधारण्याचे आणि पोटाचे विकार बरे करण्याचे सामर्थ्य

ayurvedic tips, home remedy for winter problems, 6 effective home remedies for cold, cough, sore throat in cold days : थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला, घसा दुखणे, घसा खवखवणे अशा स्वरुपाचे त्रास अनेकांना होतात. जाणून घ्या हे त्रास बरे करणारे 6 प्रभावी घरगुती उपाय. 

आले : आल्यात माणसाला दैनंदिन कामासाठी उर्जेचा पुरवठा करण्याचे मर्यादीत सामर्थ्य आहे. तसेच आल्यात प्रोटिन (प्रथिने), टोटोल लिपिड अर्थात फॅट्स, कार्बोहायड्रेट (कर्बोदके), शुगर (साखर / शर्करा), कॅल्शिअम, आयर्न (लोह), मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम, झिंक, कॉपर (तांबे), मँगनिझ, सेलेनियम, व्हिटॅमिन सी (क जीवनसत्व), थायमिन, राइबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी 6, फोलेट, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, लिपिड, फॅटी अॅसिड (सॅच्युरेटेड), फॅटी अॅसिड (मोनोअनसॅच्युरेटेड), फॅटी अॅसिड (पॉलीसॅच्युरेटेड) असते. यामुळे आले हे थंडीतील अनेक किरकोळ त्रासांवर प्रभावी औषध आहे. आल्यात पचनक्षमता सुधारण्याचे आणि पोटाचे विकार बरे करण्याचे सामर्थ्य आहे. दुपारच्या जेवणानंतर एक चिमूट आल्याची पूड खाणे लाभदायी आहे. आल्यात अँटी बॅक्टेरिअल, अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी ऑक्सिडंट  गुण आहेत. यामुळे थंडीच्या दिवसांत तब्येत बरी नसताना आले खाल्ल्यास सर्दी, खोकला, घसा दुखणे, घसा खवखवणे हे त्रास बरे होण्यास मदत होते. 

Hair Growth Tips: सुंदर-लांबसडक केसांसाठी आहारात घ्या हे जीवनसत्त्व, केसांची वाढ पाहून थक्क व्हाल

Winter Health Tips: हिवाळ्यात टाचांना तडे का जातात? ही असतात महत्त्वाची कारणे...अशी घ्या काळजी

असे खावे आले : 

  1. एक इंच आल्याचा तुकडा आणि एक ग्लास पाणी एका भांड्यात घेऊन किमान 3 ते 5 मिनिटे उकळवा. आता गाळून घेऊन हे पाणी प्या. सर्दी, खोकला, घसा दुखणे, घसा खवखवणे हे त्रास बरे होण्यास मदत होईल.
  2. एक लिटर पाण्यात अर्धा चमचा सुंठ पूड मिसळून ढवळा. हे पाणी एका भांड्यात घेऊन मंद आचेवर किमान 15 ते 20 मिनिटे उकळवा. नंतर गॅस बंद करून हे पाणी प्या. सर्दी, खोकला, घसा दुखणे, घसा खवखवणे हे त्रास बरे होण्यास मदत होईल.
  3. दुपारच्या जेवणानंतर एक चिमूट आलेपूड ताकात मिसळा. आता ढवळून घ्या. नंतर हे ताक प्या. अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होईल. सर्दी, खोकला, घसा दुखणे, घसा खवखवणे हे त्रास बरे होण्यास मदत होईल.
  4. एका भांड्यात एक लिटर पाणी ओता. यात एक छोटा चमचा जिरेपूड, एक छोटा चमचा धणेपूड, एक छोटा चमचा बडीशेप ओता. हे मिश्रण ढवळून घ्या. आता मंद आचेवर हे मिश्रण किमान 10 ते 15 मिनिटे उकळवा. नंतर हे पाणी गाळून घ्या. आता हे पाणी प्या. पोटाशी संबंधित विकार, सर्दी, खोकला, घसा दुखणे, घसा खवखवणे हे त्रास बरे होण्यास मदत होईल.
  5. एका ग्लासमध्ये 5 मिली आलेरस, 1 चमचा मध, चवीपुरते मीठ आणि 5 थेंब लिंबूरस ओता. हे सर्व मिश्रण ढवळून एकजीव करा. दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधी हे मिश्रण पिऊन घ्या. अन्न पचनास मदत होईल. सर्दी, खोकला, घसा दुखणे, घसा खवखवणे हे त्रास बरे होण्यास मदत होईल.
  6. 1 चमचा कोरडी (सुकी) आलेपूड आणि 1 चमचा गुळाची पूड (पावडर) हे मिश्रण एकत्र मिसळून एकजीव करा. आता हे मिश्रण व्यवस्थित चावून खाऊन घ्या. अन्न पचनास मदत होईल. सर्दी, खोकला, घसा दुखणे, घसा खवखवणे हे त्रास बरे होण्यास मदत होईल.

लक्षात ठेवा : आले उष्ण आहे. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे अथवा आल्याची अॅलर्जी आहे त्यांनी आल्याचे उपाय करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

(Disclaimer / डिस्क्लेमर :  ही संकलित माहिती आहे. Times Now Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी