Monkeypox: 'या' 6 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो मंकीपॉक्स

Monkeypox cases in india: सीडीसीच्या अहवालानुसार, जगातील 76 देशांमध्ये मंकीपॉक्सची 19,188 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी (Global Health Emergency)म्हणून घोषित केले आहे.

6 symptoms will be rare how can monkeypox infection
'या' 6 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो मंकीपॉक्स  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
 • भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक सूचना केल्या जारी
 • मंकीपॉक्स हा कोविड-19 सारखा नवीन आजार नाही
 • जागतिक आरोग्य संघटनेनुसार सध्या मृत्यूचे प्रमाण ३ ते ६ टक्के

Monkeypox cases in india: उत्तर प्रदेशातील नोएडा येथे मंकीपॉक्सचा (Monkeypox) एक संशयित रुग्ण समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रुग्ण 47 वर्षीय महिला आहे. तिने मंगळवारी आरोग्य विभागाशी संपर्क साधला, त्यानंतर तिचे नमुने घेण्यात आले. मात्र, तिला मंकीपॉक्सची लागण झाली असल्याची पुष्टी अद्याप झालेली नाही. देशात आतापर्यंत 4 जणांना मंकीपॉक्स झाल्याचं आढळून आलं आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी (Global Health Emergency) म्हणून घोषित केलं आहे. CDC च्या अहवालानुसार, जगातील 76 देशांमध्ये मंकीपॉक्सची 19,188 हजारांहून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत. हे लक्षात घेता मंकीपॉक्सची लक्षणे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. (6 symptoms will be rare how can monkeypox infection)

या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष 

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्स संदर्भात एक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्यानुसार एखाद्या व्यक्तीचा गेल्या 21 दिवसांत मंकीपॉक्सचा संसर्ग असलेल्या देशात प्रवासाचा इतिहास असेल तर पुढील गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

अधिक वाचा: Cholesterol: मेणाप्रमाणे वितळेल कोलेस्ट्रॉल, फक्त १ महिना करा या ड्रिंकचे सेवन

 1. शरीरावर लिम्फ नोड्स किंवा ग्रंथी सुजणे
 2. ताप
 3. डोकेदुखी
 4. अंगदुखी
 5. अशक्त वाटणे
 6. अंगावर पुरळ येणे

इत्यादी लक्षणे दिसल्यास तातडीने आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती द्यावी.

या गोष्टींची देखील घ्या काळजी

 • याशिवाय, शरीरावर पुरळ येतात आणि ते ताप आल्यानंतर 1-3 दिवसांनी दिसतात. जे पुढे 2 ते 4 आठवडे कायम असतात.
 • त्याचप्रमाणे, पुरळ प्रथम तोंडावर आणि जिभेवर, त्यानंतर हात आणि पाय तसेच तळवे आणि इतर अवयवांवर दिसू लागतात.
 • लॅब चाचणीनंतरच मंकीपॉक्सची पुष्टी होते.
 • जागतिक आरोग्य संघटनेनुसार सध्या मृत्यूचे प्रमाण ३ ते ६ टक्के आहे.

अधिक वाचा: वयाच्या 60 व्या वर्षीही होणार नाही सांधेदुखी, आजपासून करा या 5 गोष्टी

मंकीपॉक्स हा कोव्हिड-19 पेक्षा वेगळा 

मंकीपॉक्स हा कोविड-19 सारखा नवीन आजार नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या म्हणण्यानुसार, 1970 मध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आल्यापासून आफ्रिकेतील 11 देशांमध्ये हे रुग्ण समोर आले आहेत. यामध्ये बेनिन, कॅमेरून, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, गॅबॉन, कोटे डी आयव्होर, लायबेरिया, नायजेरिया, काँगो प्रजासत्ताक, सिएरा लिओन आणि दक्षिण सुदान यांचा समावेश आहे.

संसर्ग कसा पसरतो

हा विषाणू वन्य प्राण्यांपासून पसरतो. त्यानंतर, हा विषाणू त्या संक्रमित व्यक्तीद्वारे इतर मानवांशी वेगवेगळ्या प्रकारच्या संपर्काद्वारे पसरतो. उदाहरणार्थ, जसं की, दुसऱ्याच्या टॉवेलचा वापर किंवा लैंगिक संपर्क यामुळे मंकीपॉक्स प्रसार होतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी