Weight Loss Tips : पोटावरची वाढती चरबी कमी करण्याचे ७ सोपे घरगुती उपाय

7 ayurvedic tips to lose weight and belly fat : सात सोप्या आयुर्वेदिक उपायांनी वजन कमी करणे आणि पोटावरची चरबी कमी करणे शक्य आहे. हे उपाय घरबरल्या सहजतेने करणे शक्य आहे. 

7 ayurvedic tips to lose weight and belly fat
पोटावरची वाढती चरबी कमी करण्याचे ७ सोपे घरगुती उपाय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पोटावरची वाढती चरबी कमी करण्याचे ७ सोपे घरगुती उपाय
  • उपाय घरबरल्या सहजतेने करणे शक्य
  • जाणून घ्या पोटावरची वाढती चरबी कमी करण्याचे ७ सोपे घरगुती उपाय

7 ayurvedic tips to lose weight and belly fat : जंकफूड आणि फास्टफूडच्या आजच्या काळात वाढतं वजन ही अनेकांसाठी गंभीर समस्या झाली आहे. बैठ्या कामामुळे पोटावर वाढणारी चरबी कमी कशी करावी याच चिंतेत अनेकजण असतात. या अशा चिंतेत असलेल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी. आता पोटावरची चरबी कमी करणे सोपे झाले आहे. फक्त सात सोप्या आयुर्वेदिक उपायांनी वजन कमी करणे आणि पोटावरची चरबी कमी करणे शक्य आहे. हे उपाय घरबरल्या सहजतेने करणे शक्य आहे. 

आरोग्य - वेबस्टोरी । तब्येत पाणी

  1. कोमट पाणी प्या : दिवसभरात जास्तीत जास्त कोमट किंवा सहन होईल एवढे गरम पाणी प्या. गरम पाणी प्यायल्याने पचनक्षमता सुधारते. शरीरातील विषद्रव्ये शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढण्यास मदत होते.
  2. अन्न चावून खा : ताजे सकस अन्न खा. अन्नाचा प्रत्येक घास व्यवस्थित चावून खा. जास्तीत जास्त वेळ अन्न चावल्यामुळे त्या अन्नात भरपूर लाळ मिसळते आणि असे अन्न पचविणे सोपे होते. थोडे अन्न शांतपणे पण भरपूर वेळ चावून खाल्ल्यास मर्यादीत अन्नाच्या सेवनानेच पोट भरू शकते.
  3. मेथीच्या दाण्यांचे पाणी प्या : मिक्सरमधून मेथीच्या दाण्यांची पूड करून घ्या. तयार केलेल्या पूडपैकी एक चमचा मेथीच्या दाण्यांची पूड आणि एक ग्लास पाणी हे मिश्रण ढवळून घ्या आणि प्या. यामुळे पचनक्षमता सुधारेल आणि पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल.
  4. वेगाने चाला : दररोज किमान एक तास वेगाने चाला किंवा धावा. यामुळे शरीरातून घामावाटे निवडक विषद्रव्ये बाहेर टाकली जातील. तसेच शरीराच्या नियमित वेगवान हालचालींमुळे वजन कमी होईल. पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल.
  5. आल्याचे पाणी प्या : मिक्सरमधून सुक्या आल्याची पूड करून घ्या. आता एक चमचा सुक्या आल्याची पूड एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्या. यामुळे पचनक्षमता सुधारेल आणि पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल.
  6. त्रिफळा : रात्री झोपण्याआधी एक चमचा त्रिफळा चूर्ण घ्या. नंतर एक ग्लास पाणी अथवा एक ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे पोटाचे विकार दूर होण्यास आणि पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल.
  7. रात्रीचा हलका आहार : रात्रीचा आहार हलका राहील याची खबरदारी घ्या. शक्यतो दररोज सूर्यास्ताआधी रात्रीचे जेवण जेवून घ्या. ते शक्य नसल्यास रात्रीचे जेवण आणि झोप या दरम्यान किमान २-३ तासांचे अंतर राहील अशी खबरदारी घ्या. झोपण्याआधी शतपावली केल्यामुळेही पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी