तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे ८ सोपे उपाय

8 Easy way to get rid of bad breath : सोपे उपाय करून तोंडाची दुर्गंधी अर्थात मुखदुर्गंधी घालवून आत्मविश्वासाने चारचौघांत वावरणे शक्य आहे. 

8 Easy way to get rid of bad breath
तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे ८ सोपे उपाय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे ८ सोपे उपाय
 • सोपे उपाय करून तोंडाची दुर्गंधी अर्थात मुखदुर्गंधी घालवून आत्मविश्वासाने चारचौघांत वावरणे शक्य
 • कोमट पाण्यात चिमुटभर मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या करा

8 Easy way to get rid of bad breath : तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या अनेकांना भेडसावते. या समस्येला मुखदुर्गंधी असेही म्हणतात. ही समस्या सामान्य आहे. पण या समस्येमुळे चारचौघांत वावरणे कठीण होते. काही जण या समस्येमुळे आत्मविश्वास गमावतात, खचून जातात. यावर सोपे उपाय आहेत. हे उपाय करून तोंडाची दुर्गंधी अर्थात मुखदुर्गंधी घालवून आत्मविश्वासाने चारचौघांत वावरणे शक्य आहे. 

तोंडाला दुर्गंधी येण्याची कारणे

दात आणि तोंडाची स्वच्छता ठेवली नाही अर्थात Oral Care केले नाही तर तोंडाला दुर्गंधी येते. मुखदुर्गंधीचा त्रास जाणवतो. अन्नकण दातांच्या फटीत अडकून राहतात आणि तिथेच सडल्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते. या व्यतिरिक्त बद्धकोष्ठता अर्थात अपचनाचा त्रास असलेल्यांनाही मुखदुर्गंधीचा त्रास होऊ शकतो. कांदा, लसूण, मद्य (दारू) अशा उग्र वासाच्या पदार्थांचे सेवन तोंडाला दुर्गंधी येण्यास कारणीभूत ठरू शकते. धूम्रपान अर्थात स्मोकिंग, मद्यपान (ड्रिंकिंग), मावा, गुटखा, तंबाखू अशी शरीराला हानीकारक असलेली व्यसने केली तर तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. ज्यांना वारंवार चहा पिण्याची सवय आहे अशांच्या तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. ज्यांना सायनस वा सर्दी-खोकल्यासारखे विकार वारंवार होतात किंवा सतत तोंड कोरडे पडते त्यांनाही मुखदुर्गंधीचा त्रास होऊ शकतो. मधुमेह अर्थात डायबिटिस, किडनीचे विकार, पोटाचे विकार असल्यास तोंडाला दुर्गंधी येऊ शकते.

तोंडाची दुर्गंधी अर्थात मुखदुर्गंधी घालविण्याचे ८ सोपे उपाय

 1. दात दररोज सकाळी झोपून उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी स्वच्छ घासा. Oral Care केले तर तोंडाची दुर्गंधी अर्थात मुखदुर्गंधीची समस्या कमी होत जाईल.
 2. दात घासताना पुरेसे पाणी घेऊन चुळा भरा आणि तोंड स्वच्छ करा. टंग क्लीनर वापरून अथवा बोटाने जिभेची स्वच्छता करा, यामुळे तोंडाची दुर्गंधी अर्थात मुखदुर्गंधीची समस्या कमी होत जाईल.
 3. कोमट पाण्यात चिमुटभर मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या करा अथवा कोमट पाण्याने गुळण्या करा, यामुळे मुखदुर्गंधी अर्थात तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल.
 4. वारंवार चहा, कॉफी पिणे टाळा
 5. धूम्रपान, मद्यपान, मावा, गुटखा, तंबाखू अशी शरीराला हानीकारक असलेली व्यसने सोडा
 6. दररोज रात्री झोपताना एक चमचा त्रिफळा चूर्ण घ्या नंतर एक ग्लास पाणी प्या. यामुळे पोटाचे विकार दूर होण्यास मदत होईल तसेच पोटाच्या समस्यांमुळे मुखदुर्गंधी जाणवत असल्यास ती दूर होण्यास मदत होईल.
 7. तोंडात एखादी लवंग वा वेलची किंवा थोडी बडीशेप चघळण्याची सवय ठेवा. यामुळे मुखदुर्गंधी कमी होण्यास मदत होईल.
 8. दररोज सकाळी तुळशीची तीन ते पाच पाने तसेच पेरूची एक-दोन पाने चावून खा नंतर चुळा भरून तोंड स्वच्छ करा यामुळे मुखदुर्गंधी कमी होण्यास मदत होईल.
   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी