कमी वयातच दाढी झाली सफेद? जाणून घ्या या मागील चार कारणे

Safed dadhi : काही वर्षापूर्वी वयाची चाळीशी पार केलेल्या लोकांची केस पांढरे होत असायची. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये कमी वयातच लोकांच्या डोक्याची केस पांढरी होत असल्याच दिसून येत आहे.

a beard get white colour at a young age? know these last four reasons
कमी वयातच दाढी झाली सफेद? जाणून घ्या या मागील चार कारणे   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तणावामुळे दाढीचा रंग हा पांढरा होत असतो.
  • मेलेनिन हे डोळे, केस आणि त्वचेचा प्राकृतिक रंग आणि चमक कायम ठेवण्याचं काम करत असते.
  • बिडी, सिगारेटचं व्यसनही कमी वयात दाढी आणि डोक्याचे केस पांढरे करत असतात.

whitening of the beard : अनेकजण डोक्याची केस पांढरे झाले म्हणून चिंतित असायचे परंतु आता दाढीही (beard) पांढरी होत असल्याने त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. काही वर्षापूर्वी चाळीशी पार झाली तर त्याचे केस पांढरी होत असायची. परंतु आता कमी वय असलेल्या लोकांचीही केस पांढरी होऊ लागली आहेत. फक्त डोक्याचीच नाही तर दाढी देखील पांढरी होऊ लागली आहे. ज्या लोकांचे कमी वयात डोक्याचे पांढरे झाले असतील तसेच दाढी पांढरी झाली असेल तर त्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्याचा आत्मविश्वास राहत नसतो, त्यांना त्याच्या रुपाची लाज वाटू लागते. केस पांढरे होण्याची कारणे काय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत...  मित्रांनो तुमच्या चुकीच्या दिनचर्यामुळे तुम्ही 25 ते 30 वर्ष म्हातारे झाल्यासारखं तुम्हाला वाटतं असतं.  (a beard get white colour at a young age? know these last four reasons )

अधिक वाचा  : Vinayak Meteअपघात : सीआयडीनं चालकाला का मानलं गुन्हेगार

दाढी पांढरी होण्याची कारणे

तणाव 

तणावामुळे दाढीचा रंग हा पांढरा होत असतो. स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण एकमेंकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्नात असतात. यामुळे  अपेक्षा पू्र्ण  करण्याच्या नादात ते तणाव वाढवून घेत असतात. आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात अनेकजण खाणे-पिणे विसरत असतात. यामुळे शरीराच्या विकासाकडे दूर्लक्ष करत असतात. 

अधिक वाचा  :  लोहरस कामगारांवर पडून मोठी दुर्घटना, 8 जण होरपळले

मेलिनिन 

मेलेनिन एक असा पिंगमेंट आहे, जे डोळे, केस आणि त्वचेचा प्राकृतिक रंग आणि चमक कायम ठेवण्याचं काम करत असते. हे रंगद्रव्य अनेक प्राण्यांमध्ये आढळून येत असते. यामुळे खाणे-पिण्यात साइट्स फूड, बोर, पालेभाज्या खाल्या पाहिजेत. हे शरीरात मेलेनिन वाढविण्याचे काम करत असतात. 

अधिक वाचा  : श्रद्धा हत्या प्रकरण: आफताबच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड

धुम्रपान 

बिडी, सिगारेटचं व्यसनही कमी वयात दाढी आणि डोक्याचे केस पांढरे करत असतात.  जास्त धुम्रपान करण्याने रक्तवाहिन्या वाळू लागतात, यामुळे हेअर फॉलिकल्सपर्यंत रक्त प्रवाह व्यवस्थित होत नाही, यामुळे काळ्या दाढीचा रंग पांढरा होऊ लागतो. 

अनुवांशिक

अनुवांशिकतेमुळेही लहान वयात केस आणि दाढी पांढरी होत असते. अशी परिस्थिती असेल तर तुम्ही तुमच्या आहारात जीवनसत्व सी आणि इतर पोषक तत्त्वांना वाढवावे. याचबरोबर व्यायाम केला तर या समस्येचे समाधान मिळू शकते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी