शरीरातील नसा मोकळ्या करणारे, गाठींची समस्या दूर करणारे आणि हार्ट अॅटॅकपासून रक्षण करणारे १० पदार्थ

According A Research Published In Ncbi 10 Food That Can Open Blocked Heart Arteries Naturally : संशोधनानुसार दहा पदार्थ असे आहेत जे शरीरातील अपायकारक कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास, गाठींची समस्या दूर करण्यास आणि नसा मोकळ्या करून रक्तप्रवाह सुरळीत करण्यास मदत करतात.

According A Research Published In Ncbi 10 Food That Can Open Blocked Heart Arteries Naturally
शरीरातील नसा मोकळ्या करणारे, गाठींची समस्या दूर करणारे आणि हार्ट अॅटॅकपासून रक्षण करणारे १० पदार्थ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • शरीरातील नसा मोकळ्या करणारे, गाठींची समस्या दूर करणारे आणि हार्ट अॅटॅकपासून रक्षण करणारे १० पदार्थ
  • माणसासाठी वरदान असलेले पदार्थ
  • लसूण एक सुपरफूड

According A Research Published In Ncbi 10 Food That Can Open Blocked Heart Arteries Naturally : फास्टफूड, जंकफूड, मैद्याचे पदार्थ, बेकरीत तयार केले जाणारे पदार्थ आणि तेलकट पदार्थ खाणे तसेच अनेक तास एकाच ठिकाणी बसून काम करणे अशा स्वरुपाच्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या शरीरात अपायकारक कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू लागले आहेत. अपायकारक कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमध्येही वाढ झाली आहे. शरीरात वाढलेले अपायकारक कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये कडेने साठून राहते. यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. काही वेळा अपायकारक कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये गाठी निर्माण होतात. यातून नव्या संकटांची सुरुवात होते. एका संशोधनानुसार दहा पदार्थ असे आहेत जे शरीरातील अपायकारक कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास, गाठींची समस्या दूर करण्यास आणि नसा मोकळ्या करून रक्तप्रवाह सुरळीत करण्यास मदत करतात. या दहा पदार्थांमुळे माणसांचे हार्ट अॅटॅकपासून रक्षण होण्यास मदत होते. जाणून घ्या माणसासाठी वरदान असलेले हे दहा पदार्थ...

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

  1. लसूण : लसूण एक सुपरफूड आहे. लसूण खाल्ल्याने शरीराची सूज कमी होण्यास, शरीरातील अपायकारक कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास, वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. आंबट फळे, बेरी, फॅटी फिश, अॅवाकॅडो हे पण आरोग्यासाठी लाभदायी आहे.
  2. हिरव्या भाज्या : पालक, ब्रोकोली, कोबी, मुळा या हिरव्या भाज्या शरीरातील अपायकारक कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. रक्तातील साखरेचे प्रमाण तसेच रक्तदाबा नियंत्रणात ठेवण्यास हिरव्या भाज्या मदत करतात.
  3. टोमॅटो : टोमॅटो शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढविण्यास मदत करतो. यासाठी शरीराला टोमॅटोतील लायकोपिन नावाच्या घटकाचा उपयोग होतो. टोमॅटो मर्यादीत प्रमाणात खाल्ल्याने हृदयविकाराची समस्या कमी होण्यास मदत होते.
  4. नट्स : बदाम, अक्रोड, बेदाणे हा सुकामेवा मर्यादीत प्रमाणात खाल्ल्याने गाठींची समस्या दूर होण्यास आणि नसा मोकळ्या होण्यास मदत होते.
  5. सीड्स : फ्लेक्स सीड्स, चिया सीड्स यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असल्यामुळे ते शरीराला लाभदायी आहे. शरीरातील इन्सुलीनची पातळी नियंत्रणात ठेव्यास हे पदार्थ मदत करतात. 

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी