food combinations:आयुर्वेदानुसार हे फूड कॉम्बिनेशन तुमच्या शरीरासाठी ठरू शकतात घातक

तब्येत पाणी
Updated Oct 13, 2021 | 13:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

सोशल मीडियावर रोजच काही ना काही ट्रेंड करत असते. यात काहीजण या ट्रेंडला पसंती देतात तर काहींचा याला विरोध असतो. याआधी तुम्ही हे ट्रेंडिंग फॉलो करण्यास सुरूवात करा तर त्याबाबत आरोग्याी जोखीमही जाणून घ्या. 

food combination
आयुर्वेदानुसार हे फूड कॉम्बिनेशन शरीरासाठी ठरू शकतात घातक 

थोडं पण कामाचं

  • काही फूड कॉम्बिनेशन्स आपल्या पाचनस्वास्थ्यामध्ये बाधा निर्माण करतात.
  • बिर्याणी आणि चॉकलेट हे असे दोन पदार्थ आहेत जे वेगवेगळे प्रत्येकाला पसंत आहेत. मात्र एकत्र तुम्ही खाल्लेय का?
  • मुंबईत प्रसिद्ध असलेला वडापाव साऱ्यांनाच फार आवडतो. पावाच्या आत वडा तर असतोच मात्र याच्याऐवजी आईस्क्री

मुंबई: आमच्याप्रमाणेच तुम्हीही अनेक नवीन आणि अजबगजब असे फूड कॉम्बिनेसन अनेकदा सोशल मीडियावर ट्रेंड झालेले पाहिले असतील. जसे आईस्क्रीम अथवा रसगुल्ला अथवा पायनॅप्पल पिझ्झा. हे सगळं ऐकायला छान वाटतं मात्र खायला फार क्वचितच.  मात्र यातील काही फूड कॉम्बिनेशन्स तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. 

का आहेत हानिकारक फूड कॉम्बिनेशन्स

काही फूड कॉम्बिनेशन्स आपल्या पाचनस्वास्थ्यामध्ये बाधा निर्माण करतात. हे विचित्र फूड कॉम्बिनेशन्स केवळ अपचनाचे कारण ठरत नाहीत तर शरीरात विषारी पदार्थही निर्माण करतात. आयुर्वेदानुसार प्रत्येक खाद्यपदार्थाचे पाचनतंत्र वेगवेगळे असते. जेव्हा विविध उर्जा असलेले पदार्थ एकत्र केले जातात तेव्हा पोटातील पाचनअग्नि खराब होतो. ज्यामुळे अपचन, सूज, गॅस तसेच विषारी पदार्थ पोटात तयार होणे अशा समस्या येतात. जाणून घ्या असे काही फूड कॉम्बिनेशन्स...

मॅगी आणि मिल्कशेक

तुम्हाला ऐकायला विचित्र वाटतेय ना? वेगवेगळे नाही तर एकत्रच. हे ऐकायला जेवढे विचित्र वाटते तेवढेच किंवा त्यापेक्षा भयानक आपल्या आरोग्यासाठी आहे. असे यासाठी कारण एकीकडे मॅगीमध्ये मसाले भरपूर असतात तर दुसरीकडे दुधाचे गुण हे वेगळे असतात. 

बिर्यानी आणि चॉकलेट

बिर्याणी आणि चॉकलेट हे असे दोन पदार्थ आहेत जे वेगवेगळे प्रत्येकाला पसंत आहेत. मात्र एकत्र तुम्ही खाल्लेय का? तुम्ही विचार करू शकता काी बिर्याणीवरती चॉकलेट सिरप टाकून खाणे कसे लागेल? हे खाताना कसे लागेग हे तर आम्हाला माहीत नाही मात्र यामुळे आरोग्यास जरूर नुकसान पोहोचू शकते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Slurrp HT (@slurrpapp)

आईस्क्रीम वडापाव

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Curly Tales (@curly.tales)

मुंबईत प्रसिद्ध असलेला वडापाव साऱ्यांनाच फार आवडतो. पावाच्या आत वडा तर असतोच मात्र याच्याऐवजी आईस्क्रीम. हे ऐकण्यास किती विचित्र वाटते नाही? ही ट्रेंडिंग रेसिपी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. गरमगरम वडापावाच्या आत थंड थंड आईस्क्रीम. केवळ तापमानच वेगवेगळे नाही तर आयुर्वेदानुसार या दोघांचे गुणधर्मही वेगवेगळे आहेत. यामुळे पाचनसंस्था बिघडते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी