How to Control Weight हे 5 हेल्दी फूड्स आटोक्यात आणतील वाढते वजन, आजच करा तुमच्या आहारात समाविष्ट 

तब्येत पाणी
Updated Apr 02, 2023 | 19:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

How to Control Weight : बदलत्या खण्यापिण्याच्या सवयीमुळे आजकाल बहुतांश लोक वाढत्या वजनाने त्रस्त आहे. वाढते वजन अनेक आजारांचे कारण आहे. वजन नियंत्रित करणे अत्यंत महत्वाचे असून त्यासाठी आपल्या काही सवयी बदलणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही हेल्दी फुड्स बद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये कमी कॅलरीज असून तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. शिवाय तूमचे वजन कमी करण्यास मदत करतात. 

सध्याच्या बदलत्या खण्यापिण्याच्या सवयीमुळे आपण आपल्या आरोग्याकडे कानाडोळा करत आहोत.
वाढते वजन नियंत्रित करणे अत्यंत महत्वाचे आहे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वाढते वजन अनेक आजारांचे कारण आहे.
  • आज आम्ही तुम्हाला अशा काही हेल्दी फुड्स बद्दल सांगणार आहोत
  • आजच करा तुमच्या आहारात समाविष्ट 

Health Tips सध्याच्या बदलत्या खण्यापिण्याच्या सवयीमुळे आपण आपल्या आरोग्याकडे कानाडोळा करत आहोत. सुट्टीच्या दरम्यान किंवा पिकनिक ला कुठे बाहेर गेल्यास हॉटेल मध्ये जाऊन आपण अनेक तेलकट पदार्थांचा स्वाद घेतो. असे करताना आपण अनेक कॅलरीज आणि कोलेस्ट्रॉल शरीरात ढकलतो. जे पुढे जाऊन आपले वजन वाढवते. (Add these 5 healthy foods to your diet today to curb weight gain). 

वाढते वजन नियंत्रित करणे अत्यंत महत्वाचे असून त्यासाठी आपल्या काही सवयी बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील काही महत्वपूर्ण पदार्थांचा समावेश आपल्या आहारात केल्याने आपले वाढलेले वजन आटोक्यात येईल.  

अधिक वाचा : ​मुंबईकरांचा म्हाडाच्या 4640 घरांसाठी चौपट प्रतिसाद

ब्राऊन राईस

अनेकजण भाताचे शौकीन असतात, त्यामुळे आपण सफेद तांदूळ आपल्या रोजच्या आहारात वापरतो, परंतु त्यात असलेले कार्बोहायड्रेट्स आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात. यामध्ये फायबर देखील मोठ्या प्रमाणात असते, ज्यामुळे वजन वाढण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे, त्याला पर्याय म्हणून तुम्ही ब्राऊन राइस, क्विनोआ, बाजरी यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. एका संशोधनानुसार, या पदार्थांमध्ये असलेले पोषकघटक ग्लायसेमिकची पातळी सुधारून सूज आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी करतात.

वाफवलेले पदार्थ

आजकाल लोकं पुरी, वडे यांसारखे तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खातात, पण त्यात असलेले ट्रान्सफॅट्स तुमच्या खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतात, ज्यामुळे तुमच्या हृदयामध्ये सूज येऊ शकते, तसेच हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे कोणताही खाद्यपदार्थ तळण्याऐवजी तो वाफवून किंवा ग्रील करून खा. शिवाय पीठ, भाज्या, औषधी वनस्पती किंवा एअर फ्राइड स्नॅक्स सारखे पदार्थ देखील खाऊ शकता. हे तुमच्या आरोग्यासाठी देखील चांगले राहील.

अधिक वाचा : ​पुण्यातील वाहनांच्या आणि अपघातांच्या संख्येत मोठी वाढ

गव्हाची चपाती 

आठवड्याच्या सुट्टीमध्ये किंवा एखाद्या सुट्टीच्या दिवशी आपण ब्रेडपासून सॅंडविच, टोस्ट तसेच इतर नाना प्रकारचे चविष्ट डीशेस तयार करतो, मात्र ब्रेड बनवण्यासाठी वापरण्यात येणारा मैदा आरोग्यासाठी हानिकारक आहे. यात फायबर खूप कमी प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता अधिक असते. संशोधनानुसार, ब्रेडऐवजी तुम्ही तुमच्या आहारात गव्हाच्या ब्रेडचा किंवा गव्हापासून बनवलेल्या चपातीचा समावेश करू शकता. यामुळे टाइप 2 मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. 

बाजरी 

ब्रेड, पेस्ट्री, स्नॅक्स सारख्या भारतीय खाद्य पदार्थांमध्ये रिफाइंड चे पीठ आणि मैदाचा वापर केला जातो. असे अन्न खालल्यामुळे इंसुलिनची पातळी वाढते. जेणेकरून शरीर सुजते आणि स्थूल होते. हे टाळण्यासाठी गव्हाचे पीठ, बाजरी, ज्वारी यांसारख्या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा. यामध्ये फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते तसेच वजन कमी होण्यास आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास देखील मदत होते. एका संशोधनानुसार, मैद्याऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचे सेवन करू शकता. यामुळे टाइप २ मधुमेहाचा धोकाही कमी होईल.   

कमी गोड असलेले पदार्थ

आपल्या दिवसाची सुरुवात एक कप चहाने होते, परंतु या चहात असलेल्या कॅलरीज, जास्त साखर मधुमेह आणि दात किडण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे,  चहाऐवजी आपण आपल्या आहारात विनाहर्बल साखरेचा चहा, नारळ पाणी, ताक आणि ताजा लिंबाच्या रसाचा समावेश करू शकता. नारळाच्या पाण्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि इलेक्ट्रोलाइट्स शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. एका संशोधनानुसार, जर तुम्ही साखर नसलेल्या पदार्थांचे सेवन केले तर वजन नियंत्रणात येईल आणि चयापचय पातळी सुधारण्यासही मदत मिळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी