Vitamin D ची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात करा या पौष्टिक पदार्थाचा समावेश

तब्येत पाणी
Updated Mar 27, 2023 | 20:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vitamin D Nutritious Foods: व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरासाठी सर्वात महत्वाच्या पोषक घटकांपैकी एक आहे. व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरातील कॅल्शियमचे पोषण करते आणि हाडे मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक घटक आहे.

Add these Nutritious Foods to your diet for High Vitamin D
Vitamin D ची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात करा या पौष्टिक पदार्थाचा समावेश  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हाडे मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे आहे.
  • व्हिटॅमिन डीचे सेवन करून तुम्हाला डिप्रेशनपासून दूर राहू शकता.
  • रोगप्रतिकारक शक्ती देखील खूप मजबूत करते

High Vitamin D Food: व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरासाठी सर्वात महत्वाच्या पोषक घटकांपैकी एक आहे. व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरातील कॅल्शियमचे पोषण करते आणि हाडे मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक घटक आहे. यामुळे दातही मजबूत होतात तसेच, वृद्धत्वाबरोबर, सांधेदुखी यांसारख्या हाडांच्या आजारांची समस्या देखील  व्हिटॅमिन डी मुळे दुरूस्त होते. (Add these Nutritious Foods to your diet for High Vitamin D)

व्हिटॅमिन डी असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने प्रौढ आणि लहान मुलांच्या हाडांचा कमकुवतपणा दूर होतो. मांसाहारी पदार्थामध्ये व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात असते. परंतु शाकाहारी लोक काही पदार्थाच्या माध्यमातून व्हिटॅमिन डी  सहज मिळवू शकतात, ज्यामुळे त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण होईल. 

व्हिटॅमिन डी असलेले शाकाहारी पदार्थ 

1. दूध 

दुधात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. तसेच आहारशास्त्रामुसार दूधाला संपूर्ण आहार मानले जाते. यामध्ये सर्व प्रकारची पोषक तत्वे आढळतात. त्यात प्रथिने, फॅट आणि चांगले कार्ब्स देखील आढळतात. जर तुम्हाला लॅक्टोजचा त्रास असेल तर तुम्ही दुधाऐवजी ताक किंवा स्मूदीचे सेवन करू शकता. यातून तुम्हाला खूप फायदाही होऊ शकतो.

अधिक वाचा: Turmeric for skin care: चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी टर्मरिक फेस क्लींजर वापरून पहा

दही

दुधापासून बनवलेले दही हा उन्हाळ्यातील सर्वोत्तम आहार आहे. दह्याचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला आतून थंडावा मिळतो आणि शरीर हायड्रेटही राहते. ज्यांना दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी दही एक परिपूर्ण प्रोबायोटिक म्हणून काम करू शकते . त्यात प्रथिने भरपूर असतात आणि कॅलरीज खूप कमी असतात.  कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा दही हा चांगला स्त्रोत आहे. उन्हाळ्यात तुम्ही दह्याचे ताक, रायता आणि गोड लस्सी बनवून पिऊ शकता. यामुळे हाडांच्या दुखण्यामध्ये खूप आराम मिळतो. 

मशरूम

मशरूम व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत मानला जातो. तुम्ही मशरूम तुमच्या आहारात सूप, फ्राय, स्टू किंवा सॅलडच्या स्वरूपात समाविष्ट करू शकता. अतिनील प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर मशरूम व्हिटॅमिनचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मशरूम शरीरातील व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढते. तुम्ही मशरूम  सँडविच आणि भाज्यांसाठी शाकाहारी स्टफिंग म्हणून वापरू शकता. मशरूम खायलाही खूप चविष्ट असतात. 

अधिक वाचा: Kidney Stones : मेणासारखा वितळून जाईल तुमचा मूतखडा, बस करा हे 5 घरगुती उपाय!

संत्र्याचा रस

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. एक ग्लास संत्र्याचा ज्युस प्यायल्याने तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते. तसेच यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. तुम्ही ते फळांच्या स्वरूपात आणि रसाच्या स्वरूपात पिऊ शकता. उन्हाळ्यात हे खूप फायदेशीर ठरू शकते. 

चीज

चीज हे एक अतिशय चवदार दुग्धजन्य पदार्थ आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन डी भरपूर आहे. हे त्वचा आणि मेंदूसाठीही खूप चांगले आहे. यासाठी तुम्हाला ताजे पनीर खावे लागेल.

अधिक वाचा: रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे चांगले आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या गरम पाणी पिण्याचे फायदे

आहारात व्हिटॅमिन डी समाविष्ट करण्याचे फायदे


1. व्हिटॅमिन डीचे सेवन करून तुम्हाला डिप्रेशनपासून दूर राहू शकता. 

2. शरीरात व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात असल्याने हृदयविकारासारखे आजार दूर राहण्यास मदत होते. 

3. हाडे मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे आहे. 

4. रोगप्रतिकारक शक्ती देखील खूप मजबूत करते. 

5. वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहम्यासाठी आहारात व्हिटॅमिन डीचा समावेश करणे आवश्यक आहे. 

6. याशिवाय मेंदू आणि मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी हे खूप उपयुक्त ठरू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी