Health Tips: झपाट्याने वजन कमी करण्यासाठी चहामध्ये साखरेऐवजी घाला या गोष्टी

तब्येत पाणी
Updated May 24, 2022 | 09:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sugar Alternative for Tea | बदलत्या जीवनशैली सोबत लोकांना लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज इत्यादी घातक आजारांचा सामना करावा लागतो.

  Add these things instead of sugar in tea to lose weight
वजन कमी करण्यासाठी चहामध्ये साखरेऐवजी घाला या गोष्टी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आरोग्य तज्ज्ञ लोकांना कमी प्रमाणात साखरेचे सेवन करण्याचा सल्ला देतात.
  • गूळामध्‍ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडेंट आढळतात.
  • खजूर सरबतामध्ये एक अद्भुत नैसर्गिक गोडवा आहे.

Sugar Alternative for Tea | मुंबई : बदलत्या जीवनशैली (Lifestyle) सोबत लोकांना लठ्ठपणा (Obesity), हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure), डायबिटीज (Diabetes) इत्यादी घातक आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आजच्या धावपळीच्या जगात आरोग्य तज्ज्ञ देखील लोकांना कमी प्रमाणात साखरेचे सेवन करण्याचा सल्ला देत असतात. भारतात सर्वाधिक लोक सकाळी उठल्याबरोबर प्रथम चहा पितात. न चहा पिता लोकांच्या दिवसाची सुरूवातच होत नाही. लक्षणीय बाब म्हणजे चहा मध्ये देखील साखरेचे प्रमाण अधिक असते. साखरेची चहा पिल्याने डायबिटीज असलेल्या लोकांची फक्त शुगर लेव्हल वाढत नाही तर त्यांचे वजनही वाढते. (Add these things instead of sugar in tea to lose weight). 

अधिक वाचा : शरद पवारांच्या 'त्या' फोटोची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

दरम्यान, जर तुम्ही डाएटिंग करत असाल पण तुमच्या चहातील गोडपणामुळे तुम्हाला त्रास होत असेल, तर आम्ही सांगितलेल्या काही नैसर्गिक गोड पदार्थांचा तुम्ही वापर करू शकता. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यासोबतच ते तुमच्या चहाची चवही वाढवतात. चला तर मग जाणून घेऊया काही नैसर्गिक स्वीटनर पर्यायांबद्दल (Natural Sweetener Options), ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा चहा गोड आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी करू शकता. 

अधिक वाचा : एसबीआयच्या ग्राहकांना घर बसल्या मिळणार 35 लाखांपर्यंतचे कर्ज

मधाचा वापर करा

जर तुम्हाला सकाळचा चहा निरोगी आणि चवदार बनवायचा असेल तर तुम्ही चहामध्ये साखरेऐवजी मध घालू शकता. पण चहामध्ये साखर घालताना लक्षात ठेवा की मधाचा गरम प्रभाव असतो. त्यामुळे चहासोबत त्याला उकळू देऊ नका. सर्वप्रथम साखरेशिवायच चहा बनवा. यानंतर गरजेनुसार त्यामध्ये मध घाला. मध थोड्या प्रमाणात घट्ट असते, त्यामुळे चहामध्ये विरघळायला थोडा वेळ लागतो. चहामध्ये मध चांगले मिसळा. यानंतर तुमच्या गोड चहाचा आनंद घ्या.

गूळाचा वापर करा

जर तुम्ही देखील झपाट्याने वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर चहामध्ये साखरेऐवजी गूळाचा वापर करा. लक्षणीय बाब म्हणजे गूळामध्‍ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडेंट आढळतात, त्यामुळे ते वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला गती देतात. गूळाचा चहा बनवताना एक बाब लक्षात ठेवा की गूळ जास्त प्रमाणात घालू नये. यासोबतच चहाला उकळी आल्यावर चहामध्ये वरून गूळ टाका. नाहीतर तुमच्या चहाची चव बिघडेल. गूळ चहामध्ये टाकल्यानंतर चहा चांगली हलवा आणि नंतर तुमच्या गोड आरोग्यदायी चहाचा आस्वाद घ्या. 

खजूर सरबताचा वापर करा 

खजूर सरबतामध्ये एक अद्भुत नैसर्गिक गोडवा आहे. खजूराचा सरबत चवीला खूप गोड आणि घट्ट असते. अशा परिस्थितीत चहामध्ये हे सरबत वापरताना त्याचे प्रमाण लक्षात ठेवा. काळी चहा प्यायल्यास त्यात खजूराचे सरबत टाकून प्या. हे चव आणि आरोग्य दोन्हीसाठी खूप चांगले आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी