Weight Loss : वाढते वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये करा या ५ फळांचा समावेश

तब्येत पाणी
Updated Apr 30, 2021 | 12:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight Loss: लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही असी काही फळे आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करू शकता ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. 

fruits
Add this 5 fruits in your diet for weight loss 

थोडं पण कामाचं

  • तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये संत्री खाल्ली पाहिजेत
  • अननसमध्ये फायबरचे प्रमाण खूप असते. यामुळो पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते
  • टरबूज खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते

मुंबई: लठ्ठपणा(obesity) वाढणे हे अनेक आजारांचे कारण आहे. लोक आपल्या वाढत्या वजनामुळे त्रस्त असतात. तसेच वाढलेल्या वजनामुळे आत्मविश्वासही कमी होतो. हे तुमची लाईफस्टाईल(lifestyle), तणाव(stress) आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही अशी काही फळे आपल्या डाएटमध्ये सामील करू शकता जी तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करतील. जाणून घ्या कोणती आहेत ही फळे(Add this 5 fruits in your diet for weight loss)

संत्रे - तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये संत्री खाल्ली पाहिजेत. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. याशिवाय यात अँटी ऑक्सिडंट्स असतात जे वजन कमी करण्यात फायदेशीर ठरतात. संत्र्यामध्ये व्हिटामिन सीचेप्रमाण भरपूर असते. ज्यामुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते. उन्हाळ्यात याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. संत्रे थंड असते. त्यामुळे आपले शरीरही थंड राहते. 

स्ट्रॉबेरी - स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. बेली फॅट कमी करण्यासाठी हे फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने पाचनशक्ती चांगली राहते. डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी याचे सेवन जरूर करावे. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यास याची मदत होते. दिसायला लाल रंगाची असलेली स्ट्रॉबेरी खाण्यासही स्वादिष्ट लागते. 

अननस - अननसमध्ये फायबरचे प्रमाण खूप असते. यामुळो पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच वजन कमी होण्यास फायदा होतो. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. याच्या अधिक सेवनाननेही वजन वाढत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्ही याचा डाएटमध्ये समावेश करू शकता. 

सफरचंद- दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा असे सफरचंदाबाबत म्हटले जाते. सफरचंदामध्ये अनेक पोषकतत्वे असतात जी आपल्याला आजारांपासून दूर ठेवतात. यात बीटा कॅरोटीन, फ्लॅव्हेनाईड आणि फायबरसारखे गुण असतात. ज्यामुळे पचनसंस्था चांगली राहते. वजन कमी करण्यातही याचा फायदा होतो. 

टरबूज - टरबूज एक स्वादिष्ट फळ आहे. हे फळ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये येते. टरबूज खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. यात ९० टक्के पाणी असते. यामुळे तुम्ही हायड्रेट राहता. टरबूजाचे सेवन वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. यात लायकोपिन असते ज्यामुळे त्वचा चमकदार होते. तसेच या फळालाही तुम्हाला डाएटमध्ये सामील केले पाहिजे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी