Strong Bones: तिशीनंतर सुरू होतात हाडांच्या तक्रारी...हाडे मजबूत करण्यासाठी हे खा!

Health Tips : आपल्या आरोग्याचा, फिटनेसचा (Fitness) एक महत्त्वाचा भाग म्हणजे मजबूत हाडे (Strong bones) हा असतो. वयाची ३० वर्षे ओलांडल्यानंतर महिलांना हाडे दुखण्याची तक्रार सुरू होते. वास्तविक, योग्य दिनचर्या न पाळल्यामुळे आणि चांगला आहार न घेतल्याने ही समस्या उद्भवते. त्यामुळे अशा परिस्थितीत जसजसे तुमचे वय वाढत जाईल तसतसे तुम्हाला हाडे मजबूत करण्यावर भर द्यावा लागेल.

Strong Bones
मजबूत हाडांसाठी काय खाल 
थोडं पण कामाचं
  • वय वाढल्यानंतर हाडांच्या तक्रारी सुरू होतात
  • फिटनेसमध्ये मजबूत हाडांचे मोठे महत्त्व
  • हे खाल्ल्यास हाडे राहतील मजबूत

Strengthen Bones : नवी दिल्ली : आपल्या आरोग्याचा, फिटनेसचा (Fitness) एक महत्त्वाचा भाग म्हणजे मजबूत हाडे (Strong bones) हा असतो. वयाची ३० वर्षे ओलांडल्यानंतर महिलांना हाडे दुखण्याची तक्रार सुरू होते. वास्तविक, योग्य दिनचर्या न पाळल्यामुळे आणि चांगला आहार न घेतल्याने ही समस्या उद्भवते. त्यामुळे अशा परिस्थितीत जसजसे तुमचे वय वाढत जाईल तसतसे तुम्हाला हाडे मजबूत करण्यावर भर द्यावा लागेल. नाहीतर भविष्यात तुमच्या वेदना वाढतील, तसेच तुम्हाला अनेक व्याधींना तोंड द्यावे लागेल. चला तर मग जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की अशा कोणत्या गोष्टी खाव्यात, जेणेकरून हा प्रकार होणार नाही. (After 30s many problems regading bones arises, eat this to get strong bones)

अधिक वाचा : Dehydration: शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर दिसतात ही लक्षणे, दिसल्याबरोबर व्हा सावध

या सुक्या मेव्यांचा आहारात करा समावेश 

काही ड्राय फ्रूट्स आहेत, ज्यांच्या मदतीने तुमची हाडे मजबूत होऊ शकतात. वास्तविक अशा सुक्या मेव्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे हाडे दुखण्याची तक्रार उद्भवत नाही. यामध्ये तुम्ही काजू, बदाम, अक्रोड आणि मनुका यांचा समावेश करू शकता.

गूळामुळे शरीराला चांगले कॅल्शियम मिळेल

यासोबतच शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी गूळही कोणापेक्षा कमी नाही हे फार कमी लोकांना माहिती आहे. जर तुम्ही त्याचा आहारात समावेश केलात तर तुम्हाला कॅल्शियम चांगल्या प्रमाणात मिळेल. त्यामुळे हाडांना दुखापत होणार नाही.

अधिक वाचा : Dry Fruits : अक्रोड, बदाम, काजू खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती, जाणून घ्या

या फळांचाही होईल फायदा 

लिंबूवर्गीय फळांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते हे सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी यासारख्या गोष्टींचा समावेश करा. याचा तुम्हाला फायदा होईल. आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचाही समावेश करा. त्याच वेळी, आडा देखील कॅल्शियमचे एक चांगले माध्यम आहे. तुम्हालाही याचा फायदा होऊ शकतो.

 हल्लीच्या धावपळीच्या आयुष्यात फिटनेस जपणे आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. फिटनेस राखला तर दीर्घ काळ काम करणे सोपे होते. निरोगी जीवन जगण्यासाठीही फिटनेस महत्त्वाचा आहे. मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, लठ्ठपणा या समस्यांना सामोरे जाण्यापेक्षा फिटनेस जपणे हिताचे आहे.

अधिक वाचा : Boiled Egg Water : अंडी उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकून देता काय? हे फायदे जाणून घेतल्यावर करणार नाही तसे...

दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून काम करणे तसेच तेलकट पदार्थ, जंकफूड आणि फास्टफूड यांचे वाढलेले सेवन यामुळे आजारांचे प्रमाण वाढते आहे. लढ्ढपणाची समस्या मोठी होत चालली आहे. त्यातच अपायकारक कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी हल्ली अनेकजण घेऊन येऊ लागले आहेत. वाढलेल्या अपायकारक कोलेस्टेरॉलने त्रस्त असलेल्यांनी तर खास काळजी घेतली पाहिजे. शरीरातील अपायकारक कोलेस्टेरॉल कमी करणे शक्य आहे. अपायकारक कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी योग्य प्रकारचे व्यायाम अर्थात एक्सरसाइझ करणे आवश्यक आहे. याचा उपयोग हाडे बळकट करण्यासाठीदेखील होतो. लक्षात घ्या मजबूत हाडे, मजबूत स्नायू असतील तर तुमचे शरीर तंदुरुस्त राहील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी