Women Health News: चाळीशीनंतर 'या' 5 कारणांमुळे महिलांचे अचानक वाढू लागतं वजन; जाणून घ्या कारण

Weight Gain in Women 5 causes: महिलांचं जसं वय वाढतं तसं त्यांचं वेगानं वजन ही वाढण्यास सुरूवात होते. वाढत्या वयाबरोबर महिलांचे वजन (Women's Health) अचानक वाढू लागते. यामागे काही कारणं आहेत, त्यापैकी ही पाच मुख्य कारणे आहेत जी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे.

Weight Gain
40 नंतर या 5 कारणांमुळे महिलांचे वजन अचानक वाढू लागते 
थोडं पण कामाचं
  • वयानुसार वजन वाढणं ही बाब पूर्णपणे सामान्य आहे. वयाबरोबर तुमच्या शारीरिक हालचाली कमी होण्यास सुरूवात होते.
  • जर तुमचं वजन अचानक वाढत असेल तर ते तुमच्या शरीरासाठी सामान्य नाही.
  • अचानक वजन वाढण्याची कारणे काय असू शकतात याकडे लक्ष द्या.

नवी दिल्ली:  These Five reasons weight increasing in Women: जसं जसं वय वाढतं तसं तसं आरोग्याशी संबंधित उद्धभवण्यास सुरूवात होत असते. यात सर्वाधिक समस्या महिलांच्या आरोग्यावर होत असतात. महिलांचं जसं वय वाढतं तसं त्यांचं वेगानं वजन ही वाढण्यास सुरूवात होते. वाढत्या वयाबरोबर महिलांचे वजन (Women's Health) अचानक वाढू लागते. यामागे काही कारणं आहेत, त्यापैकी ही पाच मुख्य कारणे आहेत जी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. (Women suddenly gain weight) 

वजन वाढत असल्यास त्यावर लक्ष द्यावे

वयानुसार वजन वाढणं ही बाब पूर्णपणे सामान्य आहे. वयाबरोबर तुमच्या शारीरिक हालचाली कमी होण्यास सुरूवात होते. तुमचं धावणं, खेळणं आणि उडी मारणे देखील जवळजवळ थांबून जाते. स्लो एक्टिविटीज, नेचुरल लॉस ऑफ मसल्स मास, स्लो मेटाबॉलिज्म या आणि अशा अनेक कारणांमुळे तुमचे वजन वाढते.

अधिक वाचा- नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी?, खुद्द एकनाथ शिंदेंनी दिलं अचूक उत्तर 

वजन वाढू देऊ नका 

जर तुमचं वजन अचानक वाढत असेल तर ते तुमच्या शरीरासाठी सामान्य नाही. हार्मोनल असंतुलन, थायरॉईड किंवा इतर कोणतंही कारणही यामागे असण्याची शक्यता असते. 

अचानक वजन वाढण्याचं कारण 

वजन वाढण्याचे मूळ कारण म्हणजे आपली जीवनशैली तसेच आपला आहार. बराच वेळ एकाच जागी बसून राहणं हे सवय वजन वाढीस आमंत्रण देते. तज्ज्ञांच्या मते की,  मानवी शरीर जटिल आहे. कालांतराने यामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात.

महिलांमध्ये अचानक वजन वाढण्याची समस्या असते.  अचानक वजन वाढण्याची कारणे काय असू शकतात याकडे लक्ष द्या.

थायरॉईड ही आहे कारण 

थायरॉईडमुळेही वजन वाढू शकते. यामुळे महिलांना थकवा, एनर्जी लेव्हल कमी होणे, कोरडी त्वचा, केस गळणे किंवा आवाजात बदल अशा समस्यांचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे सर्वप्रथम थायरॉईडचा स्तर तपासा आणि योग्य औषध घ्या.

मेनापॉज 

मेनापॉज सुरू होण्यापूर्वीच्या कालावधीला पेरीमेनोपॉज म्हणतात. हे सहसा 40 वर्षांनंतर स्त्रियांमध्ये सुरू होते. पेरीमेनोपॉज टप्प्यात बरेच बदल होतात. यामुळे, इस्ट्रोजेन हार्मोन असमानपणे वाढतो किंवा कमी होतो. यामुळे वजन तर वाढतेच पण हॉट फ्लॅशेज, लैंगिक इच्छा कमी होणे, मासिक पाळी अनियमित होणे इत्यादी बदल होतात. यामुळे, स्नायू सैल होऊ शकतात आणि शरीरातील चरबी वाढण्याची शक्यता असते.

अधिक वाचा- Alert..! 15 ऑगस्टला तीन प्रकारचे Attacks होणार? 

पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम

रिसर्चमध्ये असं सूचित करण्यात आलं आहे की, पाचपैकी एक तरी स्त्री पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ग्रस्त असते. हा एक अंतःस्रावी संप्रेरक विकार आहे जो पुनरुत्पादक हार्मोन्स इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉनचे संतुलन बिघडवतो. यामुळे केवळ अनियमित मासिक पाळी येत नाही तर शरीराच्या इन्सुलिनच्या वापरावरही परिणाम होतो. याचा ब्लड शुगर लेव्हलवर परिणाम होतो आणि शरीराच्या मध्यभागी वजन वाढते.

तणावामुळे वाढतं वजन 

जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा तुमच्या एड्रेनालाईन ग्रंथीवर परिणाम होत असतो. कॉर्टिसोल हार्मोनचा स्राव वाढू लागतो. त्यामुळे शरीरातील ऊर्जा आणि चरबी दोन्ही साठण्यास सुरूवात होते. आपल्यापैकी बहुतेकजण ऑफिस किंवा घरगुती समस्यांमुळे तणावात असतात. कॉर्टिसोल हार्मोनची पातळी दीर्घकाळ उच्च राहिल्यास शरीरात चरबी जमा होऊ लागते. यामुळे वजनही वाढू शकते.

लहान आतड्यात बॅक्टेरिया

चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियाचे संतुलन बिघडल्यामुळे लहान आतड्यात बॅक्टेरियांची वाढ होण्याची शक्यता असते. यामुळे सूज येणे, ओटीपोटात दुखणे, अतिसार आणि अॅसिटीडी होऊ शकतो. यामुळे तुमचे वजन अचानक वाढण्याची शक्यता असते. याशिवाय औषधाच्या अतिसेवनानेही अचानक वजन वाढू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी