ऐश्वर्यासारखी स्किन हवीये, महागडे प्रॉडक्ट नव्हे तर या घरगुती पदार्थांचा करा वापर

तब्येत पाणी
Updated Jul 16, 2019 | 22:40 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

ऐश्वर्या राय बच्चनसारखी चमकती त्वचा हवी असे कोणाला वाटणार नाही? आता या गोष्टीचा खुलासा झाला आहे. ऐश्वर्याच्या स्किन केअर रूटीनमध्ये काय काय सामील करण्यात आले आहे.

áishwarya rai
ऐश्वर्या राय 

थोडं पण कामाचं

  • ऐश्वर्या भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देते
  • ऐश्वर्याचा सल्ला तहान लागण्याआधी पाणी प्या
  • शरीरासोबत मनाचे आरोग्यही चांगले असले पाहिजे

मुंबई: ऐश्वर्या राय बच्चन जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. या बॉलिवूड अभिनेत्रीने १९९४मध्ये मिस वर्ल्डचा ताज जिंकला होता. तेव्हापासून तिची ओळख संपूर्ण जगाला झाली. त्या दिवसांपासून ऐश्वर्याच्या चाहत्यांमध्ये वाढच होत आहे. ४५ व्या वयातही ऐश्वर्याची स्किन आणि तिची सुंदरता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तिचा चेहऱ्याचा ग्लो दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तुम्हालाही तिच्यासारखी सुंदर आणि ग्लोईंग स्किन मिळवायची आहे तर तिचे स्किन केअर रूटीन फॉलो करायला विसरू नका. ऐश्वर्याच्या तिच्या सुंदरेतेचे गुपित उघडले आहे. स्किन नेहमी फ्रेश दिसण्यासाठी ती काय करते घ्या जाणून

ऐश्वर्याचा सल्ला तहान लागण्याआधी पाणी प्या

ऐश्वर्याच्या मते त्वचेची काळजी घेणे सोपे आहे मात्र त्यावर लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. ऐश्वर्या आपली स्किन कशी हायड्रेट ठेवता याईल याकडे अधिक लक्ष देते. जर तुमची स्किन हायड्रेट असेल तर तुम्ही फ्रेश दिसाल. याच कारणामुळे ती भरपूर पाणी पिते. तसेच लोकांनाही भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देते. तसेच तहान लागण्याआधी पाणी प्या. चेहरा हायड्रेट असेल तर तुम्ही एजिंग टाळू शकता. अधिक पाणी पिणे तुमच्या स्किनसाठी दीर्घकाळ चांगले असते. तसेच स्किनसाठी हे टॉनिक म्हणून काम करते. 

तणावमुक्त राहणे

हम दिल दे चुके सनम सिनेमातून साऱ्यांचे हृदय चोरणारी अभिनेत्री ऐश्वर्या रायने आणखी एक गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे तणावमुक्त राहणे. शरीरासोबत मनाचे आरोग्यही चांगले असले पाहिजे. जर तुम्ही तणावमुक्त आहात तर तुमच्या चेहऱ्यावर चमक आणि सुंदरता असते. 

स्वत:चे मित्र बना आणि काळजी घ्या

ऐश्वर्या म्हणते तुमची स्किन कशीही असली तरी चालेल ती सहज तसेच तिच्यावर लक्ष दिले पाहिजे. तुम्ही स्वत:चे मित्र बना. नेहमी खुश राहा आणि तुम्ही कोण आहात हा विचार करून खुश राहा. स्वत:ला खुश ठेवले पाहिजे. जेव्हा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसेल तेव्हा तुम्ही खूप सुंदर दिसाल. 

केमिकल बेस नव्हे तर घरगुती प्रॉड्क्टसनी मिळवा ग्लो

ऐश्वर्या आपल्या स्किनसाठी केमिकल बेस प्रॉडक्ट नव्हे तर होम मेड प्रॉडक्टचा वापर करते. ती घरगुती पदार्थांनी आपला चेहरा साफ करते आणि पॅकही घरगुती पदार्थ तसेच पदार्थांपासून बनवते. टोमॅटो, संत्रे, लिंबू आणि पपईसारखी फळे खाण्यासोबतच ती चेहऱ्यावरही लावते. सुंदरता नेहमी आतून झळकते त्यामुळे आपल्या डाएटवरही लक्ष दिले पाहिजे. 

डाएटवर लक्ष द्या

हेल्दी आणि पोषणतत्वांनी भरलेले पदार्थ खाण्यावर लक्ष द्या. सर्वाधिक सलाड खा, फळे खा, हिरव्या भाज्या खा तसेच दूध, दही खा आणि चेहऱ्यावरही लावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
ऐश्वर्यासारखी स्किन हवीये, महागडे प्रॉडक्ट नव्हे तर या घरगुती पदार्थांचा करा वापर Description: ऐश्वर्या राय बच्चनसारखी चमकती त्वचा हवी असे कोणाला वाटणार नाही? आता या गोष्टीचा खुलासा झाला आहे. ऐश्वर्याच्या स्किन केअर रूटीनमध्ये काय काय सामील करण्यात आले आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...