वजन कमी करायचं असेल किंवा अनियमित मासिक पाळीची समस्या, रोज प्या ओव्याचं पाणी

अन्न चवदार बनवण्यासाठी किंवा उत्तम आरोग्यासाठी ओव्याचं पाणी खूप फायदेशीर आहे. ओव्याचं पाणी लठ्ठपणा ते दम्या सारख्या गंभीर आजारावर गुणकारी आहे.

irregular menstrual problems
अनियमित मासिक पाळीची समस्या  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • वजन कमी करायचं असेल तर ओव्याचं पाणी गुणकारी
  • महिलांची असलेली अनियमीत मासिक पाळीची समस्यादेखील दूर होते.
  • अॅसिडिटीपासून सुटका होण्यासाठी ओव्याच्या बिया खूप फायदेशीर

नवी दिल्ली: अन्न चवदार बनवण्यासाठी किंवा उत्तम आरोग्यासाठी ओव्याचं पाणी खूप फायदेशीर आहे. ओव्याचं पाणी लठ्ठपणा ते दम्या सारख्या गंभीर आजारावर गुणकारी आहे. हे पाणी प्यायल्याने महिलांची असलेली अनियमीत मासिक पाळीची समस्यादेखील दूर होते. यासह अनेक फायदे ओव्याच्या पाण्याचे होत असतात. तर आज आम्ही तुम्हाला हे फायदे सांगणार आहोत-

दम्यामध्ये उपयुक्त

ओवा तुमच्या शरीरातील श्लेष्मा बलगम साफ करतो तसेच सर्दी आणि खोकल्यापासून मुक्त करतो.  
दमा आणि ब्राँकायटिसच्या उपचारात ओव्याच्या बिया अत्यंत उपयुक्त आहेत. यासाठी तुम्ही दिवसातून दोनदा गुळाबरोबर ओव्याचं सेवन करा. यासोबत ताप- सर्दीमध्ये उकाळलेल्या पाण्यात ओवा टाकून त्याच सेवन करा. 

अॅसिडिटीची समस्या असल्यास

अॅसिडिटीपासून सुटका होण्यासाठी ओव्याच्या बिया खूप फायदेशीर असतात. विशेषत: जेव्हा तुम्ही ते जिरे आणि अद्रकाच्या पावडरबरोबर सेवन करता. अॅसिडिटीच्या समस्येमुळे अनेकांना पोट पुढे लागतं म्हणजेच काय ढेरी येऊ लागते. अशा स्थितीत गरम पाण्यात ओवा लिंबू पिळून त्याचे सेवन करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी