या आजाराचा सामना करणाऱ्या महिलांसाठी धोक्याची घंटा, कोरोनाचा नवा प्रकार देऊ शकतो त्रास- अभ्यास

तब्येत पाणी
Updated Mar 27, 2021 | 11:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

कोरोनाची दुसरी लाट आणि त्याच्या नव्या प्रकारामुळे डॉक्टरांची डोकेदुखी वाढत आहे. पण या विषाणूचा सर्वाधिक धोका कुणाला असेल तर तो महिलांना आहे. जाणून घ्या कोणत्या महिलांना यापासून बचाव करण्याची गरज आहे.

Woman with mask
या आजाराचा सामना करणाऱ्या महिलांसाठी धोक्याची घंटा, कोरोनाचा नवा प्रकार देऊ शकतो त्रास- अभ्यास  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • बर्मिंगहॅम विश्वविद्यालयाच्या अभ्यासात माहिती समोर
  • काय आहे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम?
  • अशा महिलांना कोरोना होण्याची शक्यता 51%नी जास्त

2019च्या अखेरीस सुरू झालेला कोरोनाचा आजार (Corona virus) अनेकांचा बळी घेऊन अद्याप जगभर थैमान घालत आहे. शास्त्रज्ञांनी (scientists) यापासून बचावासाठी काही लसीही (vaccines) तयार केल्या आहेत. पण आता या विषाणूचा नवा प्रकार (new strain) दिसत आहे ज्यावर ही लस किती परिणामकारक आहे हे अनिश्चित (uncertain) आहे. या नव्या प्रकाराचा धोका वयस्कर लोकांना (aged people), लहान मुलांना (children) आणि युवांनाही (youngsters) आहे. त्यामुळे ज्यांची रोगप्रतिकारशक्ती (immunity) कमी आहे किंवा ज्यांना मूत्रपिंडाचे (kidney) किंवा हृदयाचे आजार (heart problems) आहेत त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. पण या प्रकाराचा सर्वाधिक धोका हा (danger) महिलांना (women) आहे.

बर्मिंगहॅम विश्वविद्यालयाच्या अभ्यासात माहिती समोर

नुकतीच ही माहिती बर्मिंगहॅम विश्वविद्यालयाच्या (बर्मिंगहॅम विद्यापीठ) एका अभ्यासात समोर आली आहे. यात सांगितले गेले आहे की ज्या महिलांना पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचा त्रास आहे त्यांच्यासाठी कोरोनाचा हा नवा प्रकार अधिक धोकादायक आहे. ही महिलांच्या शरीरातील संप्रेरकांशी संबंधित समस्या आहे. सामान्य महिलांच्या तुलनेत हा आजार असलेल्या महिलांना याचा संसर्ग होण्याची शक्यता 50 टक्के जास्त आहे.

काय आहे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम?

पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही एक संप्रेरकांशी संबंधित समस्या आहे. प्रजननक्षम वयातील अनेक महिलांना याचा त्रास होतो. या आजारात महिलांच्या ओव्हरीत एक गाठ किंवा सिस्ट तयार होते. यामुळे मासिक पाळीदरम्यान आणि गर्भावस्थेतही समस्या उत्पन्न होऊ शकतात. याच्या लक्षणांमध्ये वजन वाढणे, केस गळणे, मासिक पाळी वेळेवर न येणे किंवा पिंपल्स येणे यांचाही समावेश होतो. गेल्या काही काळात पीसीओएसची समस्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

अशा महिलांना कोरोना होण्याची शक्यता 51%नी जास्त

पीसीओएसचा त्रास असेलेल्या महिलांबाबत केलेल्या संशोधनात कोरोनाच्या संभाव्य धोक्याबद्दल नवी माहिती समोर आली आहे. यात 21,292 अशा महिलांना घेतले गेले होते ज्यांना पीसीओएसची समस्या आहे आणि 78,310 अशा महिलांना घेण्यात आले ज्यांना ही समस्या नाही. हे संशोधन 6 महिने चालले आणि यातून असा निष्कर्ष काढण्यात आला की ज्या महिलांना पीसीओएसची समस्या आहे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका 51%नी जास्त आहे.

पीसीओएससह या समस्याही उद्भवू शकतात

पीसीओएसच्या समस्येचा सामना करणाऱ्या महिलांना कोरोनाचा धोका जास्त असल्याचा निष्कर्ष या कारणामुळेही जास्त आहे कारण या समस्येमुळे टाईप 2 मधुमेह, यकृताशी संबंधित आजार आणि उच्च रक्तदाबाच्या समस्याही उद्भवू शकतात. तसेच या समस्यांमुळे आपल्या पाचनशक्तीवरही वाईट परिणाम होतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी