Alcohol and Cancer Risk: दारूचा एक थेंबही प्यायल्याने होऊ शकतात 7 कॅन्सर, महिलांच्या या अवयवाला सर्वाधिक धोका

Alcohol and Cancer: अल्कोहोलाच्या सेवनामुळे सात प्रकारचे कर्करोग होऊ शकतात.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दारूचा एक थेंब पिणे म्हणजे 7 प्रकारच्या कॅन्सरला आमंत्रण
  • मद्यपानामुळे होणारे कर्करोग पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळे असतात

Alcohol can cause seven type of cancer read in marathi: अनेकजणांना अल्कोहोल पिण्याचे व्यसन असते तर काहीजण कधीतरी अल्कोहोलाचे सेवन करतात. एक-दोन पेग प्यायल्याने काहीही होत नाही उलट शरीराला फायदा होतो असा दावाही अनेकजण करतात. मात्र, डब्ल्यूएचओ (WHO) ने एक धक्कादायक खुलासा केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, दारू पिण्यासाठी सुरक्षित असे लिमिट नाहीये आणि दारूचा एक थेंबही सात प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. (Alcohol causes 7 types of cancer read details in marathi)

दारूमुळे होऊ शकतो कर्करोग

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, अल्कोहोल (दारू) एक असे पेय आहे ज्यामध्ये कर्करोग (Cancer) निर्माण करणाऱ्या पदार्थांच्या ग्रुप 1 मध्ये ठेवण्यात आले आहे. दारूमुळे सात प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. यामध्ये तोंडाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग, यकृत (लिवर) कर्करोग, वॉइस बॉक्स कर्करोग, कोलोरेक्टल कर्करोग आणि महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग यांचा समावेश आहे.

हे पण वाचा : लग्नानंतर महिला नाकात नथ का घालतात? वाचा...

महिलांना या कर्करोगाचा धोका

अल्कोहोल आणि कर्करोल या संदर्भात डब्ल्यूएचओच्या फॅक्टशीटनुसार, मद्यपानामुळे होणारे कर्करोग पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळे असतात. 2018 मध्ये युरोपियन भागात मद्यपानामुळे कर्करोग होण्याच्या सर्वाधिक केसेस दिसून आल्या.

पुरुषांमध्ये यकृत कर्करोग नाही

अल्कोहोलमुळे होणाऱ्या कर्करोगत लिवर कॅन्सरचे नाव सर्वात आधी येते. मात्र, डब्ल्यूएचओच्या फॅक्टशीटमध्ये म्हटले की, 2018 मध्ये युरोपियन प्रदेशात दारू पिण्यामुळे पुरुषांमध्ये आतडी आणि मलाशय याचा कर्करोग झाला.

हे पण वाचा : कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस गळतात?

दारूसोबत धूम्रपान करू नका

जर तुम्ही दारूसोबत धूम्रपान सुद्धा करता तर ते तात्काळ थांबवा. कारण, जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, जे व्यक्ती दारू पिण्यासोबतच धूम्रपान सुद्धा करतात त्यांना कर्करोग होण्याचा धोका 5 पटीने अधिक असतो. तर जास्त मद्यपान करणाऱ्यांसाठी हा धोका 30 पटीने वाढतो.

WHO ची महत्त्वाची शिफारस

दारूमुळे होणारा कर्करोग टाळण्यासाठी काही आवश्यक पावलं उचलावी यासाठी डब्ल्यूएचओने शिफारस केली आहे. ज्यामध्ये दारूची किंमत वाढवणे, सर्व मीडिया सोर्सकडील मार्केटिंग थांबवणे, दारूची उपलब्धता कमी करणे या सारख्या गोष्टींचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी