Aloe Vera: कोरोनाच्या काळात (Corona pandemic) भारतीय आयुर्वेद (Ayurved) पुन्हा एकदा महत्व (significance) मिळवत आहे. आपल्या देशाचा विचार करायचा तर जिथे लोकांनी काढे, च्यवनप्राश खाल्ले नसेल असे घर क्वचितच मिळेल. त्यामुळे आज या लेखात आम्ही कोरफडीतील (Aloe Vera) आयुर्वेदिक आणि औषधी गुणांबद्दल (medicinal qualities) सांगणार आहोत. कोरफडीचे नियमित सेवन (regular consumption) केल्याने आपण अनेक आजार (diseases) आणि रोगांपासून (ailments) दूर राहाल. इतकेच नव्हे, तर कोरफडीमुळे आपल्या चेहऱ्यावर (face) आणि त्वचेवर (skin) तजेला (freshness) येईल. आपल्या एकंदर आरोग्यासाठी (health) कोरफड अतिशय लाभदायक (beneficial) आहे.
कोरफड ही खूप कामाची गोष्ट आहे. आयुर्वेदात हिचा उपयोग एक महत्वपूर्ण औषध म्हणून केला जातो आणि यापासून 200पेक्षा जास्त रोगांचा इलाज करणे शक्य आहे. जीवनसत्व अ, क, आणि ई यात मुबलक प्रमाणात असते. यामुळे पेशींची वाढ आरोग्यपूर्ण होते आणि आपले केसही चमकदार होतात. यामुळे पोटाचे आजार दूर राहतात आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
बीएचयूचे पंचकर्म विभागाचे प्रमुख डॉ. जे. पी. सिंह सांगतात की कोरफडीत जीवनसत्व अ, क आणि ई, फोलिक आम्ल, कोलीन, बी1, बी2, बी3 और बी6 आढळून येते. यात साधारण 20 प्रकारचे मिनरल्स आढळतात ज्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, जिंक, क्रोमियम, सेलेनियम, सोडियम, आयरन, पोटॅशियम, कॉपर आणि मँगनीजचा समावेश आहे.
आपल्या शरीराला साधारम 22 अमिनो आम्लांची गरज असते ज्यातील 8 अतिशय गरजेची असतात. यापैकी 18-20 अमिनो आम्ले ही कोरफडीत आढळतात. यातील गरजेची असलेली 8ही त्यात असतात. कोरफड ही त्वचा, रोगप्रतिकारशक्ती, सूज यासाठीही लाभदायक आहे. कोरफडीचा गरही डोळ्यांसाठी चांगला असतो. तसेच खोकल्यापासूनही आराम मिळतो. कोरफडीच्या पानांचा रस आणि थोडा मध घेऊन चिनी मातीच्या भांड्यात एक आठवड़ा ठेवून त्याचे सेवन केल्याने यकृताशी संबंधित आजारांपासूनही आराम मिळतो. गरात साखर मिसळून खाल्ल्यानेही अनेक फायदे होतात.