Benefits of Cashew: काजू आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात. यामध्ये आवश्यक असलेले पोषकतत्वे फायबर, कॅल्शियम व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी6, मॅगनीज, जिंक, आयर्न आणि फॉस्फरस आढळतात जे विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात. काजू जर दुधात भिजवून खाल्ले तर त्याचे आरोग्याला दुप्पट फायदे होतात. जाणून घ्या त्या संदर्भात अधिक... (amazing benefits of Cashew with milk read health news in marathi)
तुम्हाला जर हाडे मजबूत ठेवायची असतील तर दररोज दुधात काजू भिजवून त्याचे सेवन करा. अशा प्रकारे काजू खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. यासाठी एक ग्लास दुधात काजू भिजवून सकाळी नाश्ता करताना खावे. दुधात कॅल्शियम असते तर काजूमध्ये व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि मँगनीज यासारखे पोषकतत्त्वे आढळतात. या पोषकतत्वांमुळे हाडे मजबूत होतात. वयोवृद्ध आणि जेष्ठ नागरिकांना सांधेदुखी, हाडांच्या समस्यांपासून सुटका होऊ शकते.
हे पण वाचा : जुळी मुलं होण्याची ही आहेत लक्षणे
जर तुम्हाला बद्धकोष्टतेची समस्या जाणवत असेल आणि त्यातून सुटका हवी असेल तर दुधात भिजवलेले काजू खा. यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ देखील फायबरयुक्त गोष्टी खाण्याचा सल्ला देतात. याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यासाठी काजू दुधात भिजवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काजूचे सेवन करा. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळण्यास मदत होईल.
हे पण वाचा : सात दिवसात व्हा आयर्न मॅन, फक्त करावं लागेल हे डाएट
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दुधात भिजवलेले काजू खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. यामध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे हे दोन्हीही मोठ्या प्रमाणात असतात. जर तुम्ही काजूचे नियमित सेवन करत असाल तर आजारी पडू शकणार नाहीत.
यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लासमध्ये कोमट पाण्यात 5-7 काजू भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी काजूचे दूध चांगले उकळून प्यावे. दुधाला चांगली उकळ आल्यावर मग ते दूध घ्या. काजू हे गरम असते. त्यामुळे काजूचे जास्त सेवन करु नये.