Benefits of Guava Leaves : पेरूच्या पानांमुळे नियंत्रणात राहील तुमच्या रक्तातील साखरेची पातळी... इतर आजारांवरदेखील गुणकारी

Health Tips : पेरूमध्ये अनेक औषधी आणि आरोग्यासंदर्भातील मोठे फायदे असतात हे तुम्हाला माहित आहे का? पेरूचे फळ तर आरोग्यदायी असतेच मात्र याची पानेदेखील (Guava Leaves) खूप फायद्याची असतात. पेरूच्या पानांचा वापर रोगांवर पारंपारिक औषध म्हणून देखील केला जातो. पेरूची पाने उकळवून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

Guava Leaves
पेरूच्या पानांचे फायदे 
थोडं पण कामाचं
  • पेरूच्या पानांचे औषधी गुणधर्म
  • मधुमेहावर पेरूच्या पानांचा काढ्याचे फायदे
  • विविध आजारांवरील पेरूच्या पानांच्या काढ्याचा उपयोग

Benefits of Boiled Guava Leaves :नवी दिल्ली : पेरू हे फळ बहुतेकांना आवडते. पेरू (Guava) नियमितपणे खाल्लादेखील जातो. मात्र याच पेरूमध्ये अनेक औषधी आणि आरोग्यासंदर्भातील मोठे फायदे असतात हे तुम्हाला माहित आहे का? पेरूचे फळ तर आरोग्यदायी असतेच मात्र याची पानेदेखील (Guava Leaves) खूप फायद्याची असतात. पेरूच्या पानांचा वापर रोगांवर पारंपारिक औषध म्हणून देखील केला जातो. पेरूच्या पानांचा काढा प्यायल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण ठेवण्यापासून ते अॅलर्जीची समस्याही दूर करू होते. याशिवाय पेरूची पाने उकळवून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. यासंदर्भात जाणून घेऊया. (Amazing benefits of Guava Leaves for diabetes and other diseases)

अधिक वाचा : Jitendra Awhad यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, काय झाली चर्चा?

पेरूच्या पानांचे जबरदस्त फायदे - (Guava Leaves benefits)

योग्य वेळी घेणे महत्त्वाचे
पेरूच्या पानांचा मोठा औषधी उपयोग असतात. मात्र त्याचे सेवन तुम्ही नेमके कधी करता ते महत्त्वाचे असते. सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात पेरूची पाने उकळून त्याचे सेवन केल्याने आरोग्याला मोठे फायदे मिळतात. पेरूच्या पानांमध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, सूक्ष्म आणि पोषक तत्त्वांनी युक्त असतात. 

आरोग्याचा खजिना
पेरूच्या पानांमध्ये अद्भूत फायदे असतात. ही पाने अँटिऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म तसेच प्रथिने, व्हिटॅमिन सी, गॅलिक अॅसिड आणि फिनोलिक संयुगे यासारख्या घटकांचा उत्कृष्ट स्रोत आहेत.

अधिक वाचा: SBI Update : स्टेट बॅंकेच्या ग्राहकांना खूशखबर! बॅंक ग्राहकांना देतेय 35 लाखांचा फायदा, पाहा कसे

रक्तातील साखरचे नियंत्रण 
पेरूच्या पानांचा उपयोग डायबेटीजमध्येदेखील होतो. या पानांची चव तुरट असते. ही पाने मधुमेहाच्या रुग्णांमध्ये उच्च रक्तातील साखर कमी करण्यासाठी आणि त्याचे नियंत्रण करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. 

हृदयाची काळजी घ्या 
पेरूच्या पानांचे पाणी खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी गुणकारी असते. ज्यांना  उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका आहे त्यांच्यासाठी ही पाने फायद्याची असतात. हा धोका कमी करण्यासाठी त्याच्या पानांचे पाणी म्हणजेच काढादेखील अत्यंत उपयुक्त असतो. 

वजन कमी करण्यासाठी 
पेरूच्या पानांचा काढा पचनासाठी प्रभावी असतो. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी पेरूच्या पानांचा उपयोग होतो. 

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी 
अ‍ॅनिमिया किंवा अॅनिमियाच्या रुग्णांसाठी पेरूच्या पानांचे हे पाणी खूप फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन वाढते. शिवाय प्लेटलेट्स वाढवण्यासाठीही याचा उपयोग होतो. डेंग्यूच्या रुग्णांना याचा उपयोग होतो. लाल रक्तपेशी वाढण्यासाठीही हे फायदेशीर असते. 

तोंड येण्यावर किंवा तोंडातील छाल्यांसाठी 
शरीरातील उष्णतेमुळे तोंडावर व जिभेवर फोड येतात. त्याच्यावर पेरूच्या पाण्याने गुळण्या केल्याने आणि पाण्याचे सेवन केल्याने मोठा फायदा होतो. 

अधिक वाचा: Shraddha Murder case: क्राईम सीरिज पाहून गर्लफ्रेंडचे 35 तुकडे केले, असं काय आहे या अमेरिकन टीव्ही शोमध्ये? 

त्वचेसाठी उपयुक्त
पेरूच्या पानांचे पाणी हे नैसर्गिक रक्त शुद्ध करणारे पेय आहे. यामुळे तुमच्या शरीरातील विषारी आणि हानिकारक पदार्थ बाहेर टाकले जातात. त्वचेच्या समस्यांसाठी खासकरून पिंपल्स आणि डाग दूर करण्यासाठी या पानांचा फायदा होतो. शिवाय पेरूच्या पाण्यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत करते.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी