Anemia Problem: शरीरात रक्ताची कमतरता असेल तर जाणून घ्या त्यावरील घरगुती उपाय

एनीमिया म्हणजेच रक्ताची कमतरता हे खूप खतरनाक असतं. ही कमतरता तुम्ही खाऊन पिऊनच सुधारू शकता. काही खाद्य पदार्श असे आहेत की ज्यामुळे सहज हिमोग्लोबिन वाढवता येतं. 

anemia
शरीरात रक्ताची कमतरता असेल जाणून घ्या त्यावरील घरगुती उपाय   |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • शरीरात रक्ताची कमतरता असल्यास जाणून घ्या घरगुती उपाय
  • अशक्तपणाची समस्या जास्त महिलांमध्येच असते
  • हे घरगुती उपाय तुमच्या हिमोग्लोबिनसाठीही करतात काम

शरीरात रक्ताची कमतरता ही समस्या जास्तकरून महिलांमध्येच असते. कारण खाण्यापिण्यात हलगर्जीपणा आणि दर महिन्यातील पिरियड्समुळे महिलांच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असते. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो म्हणजेच शरीरात रक्ताची कमतरता जाणवते आणि हे खूप खतरनाक असते. खाण्यापिण्यात आयरनची कमी असल्यानेच एनिमिया (अशक्तपणा) चं कारण बनतं. रक्ताक्षय ही एक जीव घेणारा आजारा मानला जातो. 

दरम्यान हिमोग्लोबिन कमी असल्याचं लक्षण सहज शरीरात दिसायला सुरूवात होते आणि हे लक्षण ओळखून खाणंपिणं योग्य करून सहजपणे हिमोग्लोबिन वाढवता येऊ शकतं. एनिमियामध्ये आयरन युक्त खाणंपिणं खूप गरजेचं असतं. भाजलेले चणे आणि गुळ यामध्ये इतका जोर आहे की हे एनिमिया या आजारातून सुटका करू शकतात.

गुळ आणि चण्यात आहे एनिमिया दूर करण्याची क्षमता

गुळ आणि चणा रक्तात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सर्वांत चांगलं काम करतात. चणे आणि गुळ केवळ रक्त वाढवण्यात मदत करत नाही तर हे खाण्याचे खूप फायदे आहेत. स्किनपासून दात आणि बद्धकोष्ठता सारखे आजारात देखील खूप मदत करते. विशेष म्हणजे, केवळ गुळ किंवा फक्त चणे खाण्याचे तितका फायदा होतं नाही तर तुम्ही जितकं दोन्ही एकत्र खालं त्याचा जास्त फायदा होत असतो. 

गुळात असते भरपूर आयरन 

गुळात सर्वांत जास्त आयरन असतं आणि अशक्तपणा आयरनेच कमी होतो. अशातच गुळ खाणं खूप फायदेशीर असतं. गुळात केवळ आयरनचं नाही तर सोडिअम, पोटॅशिअम आणि काही व्हिटामिन्स देखील असतात. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये जर का गुळाचा समावेश केलात तर त्याचे बरेच फायदे होतात. गुळ इम्यून देखील मजबूत करतात. 

चण्यात जास्त असतं कॅल्शियम आणि व्हिटामिनचं प्रमाण

चण्यात केवळ कॅल्शिअम आणि व्हिटामिनचं नाही तर फॉस्फोरस, प्रोटीन आणि आयरनचं देखील चांगलं स्रोस्त्र आहे. म्हणजेच चणे खाल्ल्यानं शरीरातील काही कमरता सहज दूर होतात. चणे ब्लड टिशूजच्या निर्मितीसाठी खूप काम करतात. इतकंच नाही तर हे किडनीसाठी खूप फायदेशीर आहे. 

गुळ आणि चणे हे एकत्र मिळून करतात औषधाप्रमाणे काम 

चणे आणि गुळाची वेगवेगळी क्षमता तुम्हाला समजली असेलच. मात्र जेव्हा हे दोन्ही एकत्रित खाल्लं जातं तेव्हा हे एका औषधाप्रमाणे काम करतं. विशेष गोष्ट म्हणजे, जेव्हा चणे आणि गुळ एकत्रित खाल्ले जातात तेव्हा शरीरातील पोषक तत्वांचा जवळपास सर्व भाग यामुळे पूर्ण होतात. त्यासाठी गुळ आणि चणे एनिमियाचं नाही तर काही अन्य आजारांसाठी देखील उपयुक्त आहे. 

Home Remedies For Anemia

एक मुठ चणे आणि गुळ खूप उपयुक्त 

पूर्ण दिवसभरात जर तुम्ही एक मुठ भाजलेले चणे आणि दोन मध्यम आकारचा गुळ खाल्लात, तर तुमची रोज तुम्हांला लागणारे गरजेचं पोषण हे पूर्ण करेल. चव आणि आरोग्या या दोन्ही साठी हे खूप मदत करते. 

जाणून घ्या गुळ- चण्याचे फायदे

  1. चण्यात प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. जेव्हा चणे गुळासोबत मिसळून खाल्ले जातात तेव्हा यामुळे मसल्स चांगले होतात. त्यासोबतच यामुळे मेटाबॉलिक रेट देखील चांगले होते आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा फायदा होतो. 
  2. चणे आणि गुळात झिंक असतात. हे स्किनसाठी खूप चांगलं असतं. यासोबतच यात व्हिटामिन बी-6 असतं, यामुळे स्मरणशक्ती तीव्र होते. 
  3. चणा आणि गुळ यामध्ये फायबर असतं आणि हे पचनक्रिया सुरळीत करतं. त्यासोबतचं बद्धकोष्ठता सारखा आजार देखील दूर करतं. 
  4. चणा आणि गुळात फॉस्फोरस आणि कॅल्शिअम असतं. त्यामुळे दात आणि हाडांसाठी हे फायदेशीर ठरतं. 

तर आपल्या डाएटमध्ये प्रत्येक दिवशी एक मुठ भाजलेले चणे आणि गुळाचा नक्कीच समावेश करायला विसरू नका कारण हे तुमची काही समस्यांमधून सुटका करतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी