Anti Aging foods : हे 5 पदार्थ दररोज खा, चेहऱ्यावर सुरकुत्या कधीच दिसणार नाही

Anti Aging foods: हे 5 पदार्थ दररोज खा, चेहऱ्यावर सुरकुत्या कधीच दिसणार नाही. खराब जीवनशैली आणि प्रदूषणामुळे लहान वयातच चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी या गोष्टींचा वापर करा.

Eat these 5 foods every day, wrinkles will never appear on the face
चेहऱ्यावर चमक कायम राहिल या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अँटी एजिंग फूड्स खा... सुरकुत्यांपासून संरक्षण करा
  • हे 5 पदार्थ रोज खा... चेहऱ्यावरील चमक कायम राहिल
  • अंडं, डार्क चॉकलेट, रताळं, गाजर, सिमला मिरची रोज खा

Anti Aging foods: नवी दिल्ली:  लोकांना नेहमी तरुण दिसावेसे वाटते, कारण वाढत्या वयाबरोबर चेहऱ्याची चमक आणि आकर्षकता कमी होत जाते. पण त्वचा नेहमी तरुण ठेवण्यासाठी आहारात काही चांगल्या पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर आहे हे त्यांना माहीत नाही. हे अँटी एजिंग फूड्स नियमितपणे खाल्ल्याने, तुम्हाला सुरकुत्या, मुरुम किंवा सैल त्वचेवर उपचार करण्यासाठी कोणत्याही क्रीमची गरज भासणार नाही.


त्वचा कायम तरुण ठेवण्यासाठी कोणते अँटी-एजिंग फूड खावे ते जाणून घेऊया.

Anti-ageing diet: Want to stay younger? Include these five food items in  your diet | The Times of India

तरूण आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी उत्कृष्ट अँटी-एजिंग फूड्स हे अँटी-एजिंग फूड नैसर्गिकरित्या बायोटिन, इलाजिक ऍसिड, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई प्रदान करतात आणि कोलेजनचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे त्वचेला घट्टपणा आणि चमक येते.

अंडे


अंड्यामुळे फक्त स्नायू मजबूत होत नाहीत तर त्वचा तरूण राहण्यासही मदत होते. पिवळ्या भागासह अंडी खाल्ल्याने शरीराला प्रोटीनसह बायोटिन मिळते. जे त्वचेसह केस आणि नखे निरोगी बनवण्यास मदत करते.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेला तीव्र सूर्य किरणांपासून बचावास मदत करतात. अनेक संशोधनांमध्ये असेही आढळून आले आहे की डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने त्वचेतील रक्तप्रवाह सुधारतो. म्हणून, सुरकुत्यांवर उपचार करण्यासाठी हा एक चवदार उपाय म्हणता येईल.


गाजर


अँटी एजिंग आहारात गाजराचा समावेश आवश्यक आहे. कारण, त्यात बीटा कॅरोटीन तत्व मुबलक प्रमाणात असते.  जे त्वचा आणि चेहरा चमकण्यास मदत करते. आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते.


रताळे


गाजराप्रमाणे रताळ्यामध्येही बीटा-कॅरोटीन असते. जे ग्लोइंग स्किनसाठी उत्तम अन्न बनवते. तुम्ही ते भाजून आणि मीठ घालूनही खाऊ शकता. यामुळे त्वचेवरील सुरकूत्या दूर होतात.


सिमला मिरची


सिमला मिरची खाणे बहुतेक लोकांना आवडत नाही. पण सिमला  मिरची त्वचेला कायम तरुण ठेवण्यास मदत करते, तेव्हा तुम्ही नक्कीच त्याचे सेवन कराल. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी सुरकुत्यांची समस्या दूर करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे.

व्यक्तीचे वय, त्याचे आरोग्य, त्याच्या ह्रदयाचे वय हे त्याने अंगीकारलेल्या जीवनशैलीवर अवलंबून असते. तुमचे ह्रदय जेवढे मजबूत तेवढेच तुम्ही तरुण.हृदयाच्या वयाची गणना केल्याने तुम्हाला स्ट्रोक किंवा हार्ट अॅटॅक याबाबतच्या धोक्याचा अंदाज घेऊन काळजी घेता येते. तुमचे वय, बीएमआय, रक्तदाब, कोलेस्टेरॉलचे स्तर, आहार, शारीरिक हालचाली आणि धूम्रपान यांसारख्या बाबींच्या आधारे हृदयाचे वय मोजले जाऊ शकते. हृदयाचे वय कमी असल्यास हृदयरोगाचा धोका कमी असू शकतो. जर तुमच्या हृदयाचे वय जास्त असेल तर तुम्हाला निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा लागेल.

त्वचा तजेलदार दिसण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, पालेभाज्या खाणे, व्यायाम करणे हे घटकदेखील तितकेच महत्त्वाचे असतात. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ताजेपणा येतो. शिवाय मन प्रसन्न असल्यास त्याचाही मोठा सकारात्मक परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी