apple as bad cholesterol lowering food fruit, how and when to eat, fat burning tips : आपल्या शरीरात अपायकारक असे कोलेस्टेरॉल वाढत असले तर आपल्या हृदयाला धोका आहे. पण दररोज एक पूर्ण सफरचंद व्यवस्थित चावून खाल्ले तर शरीरातले अपायकारक असलेले कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होईल. तसेच अपायकारक कोलेस्टेरॉलमुळे हृदयाला असलेला धोका पण कमी होईल. हृदयाशी संबंधित आजारांपासून आपले संरक्षण होईल.
सफरचंद या फळात पेक्टिन फायबर एलडीएल म्हणजेच अपायकारक कोलेस्टेरॉल कमी करणारा एक घटक आहे. तसेच सफरचंद या फळात व्हिटॅमिन सी आणि फायबर आहे. याच कारणामुळे सफरचंद हे फळ वजन कमी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना तसेच पोटाच्या विकारांनी त्रस्त असलेल्यांना खाण्याचा सल्ला दिला जातो. दररोज एक सफरचंद व्यवस्थित चावून खाल्ल्यास संबंधित व्यक्ती आजारी पडत नाही. नियमित मर्यादीत प्रमाणात सफरचंद खाल्ल्यास रक्ताभिसरण अर्थात शरीरातील रक्ताचे वहन सुरळीत होते. हृदयाला असलेला धोका कमी होण्यास मदत होते.
दररोज सकाळी नाश्ता करण्याच्या वेळी एक पूर्ण सफरचंद व्यवस्थित चावून खावे. खाण्याआधी सफरचंद व्यवस्थित धुवून घ्यावे. आपण इच्छा असल्यास सफरचंद आणि ओट्स यांचे मिश्रण करून ते खाऊ शकता अथवा सफरचंदाच्या ज्युस करून पिऊ शकता.