Summer Tips: नैसर्गिक ग्लोसाठी तेलकट त्वचेवर या 4 प्रकारे अप्लाय करा गुलाबजल

तब्येत पाणी
Updated Apr 13, 2023 | 21:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

गुलाबपाणी नैसर्गिक असल्याने ते त्वचेतील अतिरिक्त तेल काढून टाकते आणि त्वचा चमकदार होण्यास मदत करते. गुलाब पाण्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेला मऊ करतात आणि त्वचेच्या अनेक समस्या सहज दूर करतात.

Apply rose water on oily skin in these 4 ways for a natural glow
तेलकट त्वचेवर या 4 प्रकारे अप्लाय करा गुलाबजल   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • उन्हाळा आला की तेलकट त्वचेची समस्या खूप वाढते
  • तेलकटपणामुळे त्वचा अतिशय चिकट दिसते
  • रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो

Rose Water for Oily Skin: उन्हाळा आला की तेलकट त्वचेच्या समस्या खूप वाढते. या ऋतूमध्ये अतिरिक्त तेलकटपणामुळे त्वचा अतिशय चिकट दिसते. अनेक वेळा बाहेर जाण्यापूर्वीच त्वचा खूप तेलकट होते. या समस्येवर मात करण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारची उत्पादने वापरण्यास सुरुवात करतात. या रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो. (Apply rose water on oily skin in these 4 ways for a natural glow)

गुलाबपाणी नैसर्गिक असल्याने ते त्वचेतील अतिरिक्त तेल काढून टाकते आणि त्वचा चमकदार होण्यास मदत करते. गुलाब पाण्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेला मऊ करतात आणि त्वचेच्या अनेक समस्या सहज दूर करतात. गुलाब पाण्याचे अनेक फायदे आहेत. पण तेलकट त्वचेवर गुलाबपाणी कसे अप्लाय करावे हे अनेकांना माहित नसते. आज आम्ही तुम्हाला तेलकट त्वचेवर गुलाबपाणी कसे लावायचे ते सांगणार आहोत.

गुलाब जल आणि काकडीचा रस

गुलाबपाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. तेलकट त्वचेवर काकडीचा रस आणि गुलाबपाणी लावल्याने त्वचा थंड होते, अतिरिक्त तेलाची समस्या दूर होते आणि त्वचा चमकदार होते. गुलाबजल आणि काकडीचा रस वापरण्यासाठी 3 चमचे गुलाब पाण्यात 1 चमचे काकडीचा रस मिसळून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण त्वचेला तेलकट होण्यापासून थांबवेल.

अधिक वाचा: Best Manicure Tips: घरी मॅनिक्युअर करताना या स्टेप्स फॉलो करा

गुलाबजल आणि बेसन

तेलकट त्वचेसाठी बेसन खूप फायदेशीर मानले जाते. तसेच त्वचेवरील अतिरिक्त तेलकटपणा आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते. यासाठी 1 चमचे बेसनामध्ये 3 ते 4 चमचे गुलाबजल आणि 1 चिमूट हळद मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर चेहरा धुवा. हे मिश्रण लावल्याने त्वचा मऊ होण्यासोबतच डागहीन होते.

अधिक वाचा: Yoga for Period: पीरियड क्रॅम्प्सपासून आराम मिळवण्यासाठी बेस्ट वॉल योगा पोज

गुलाब जल आणि लिंबाचा रस

गुलाबपाणी आणि लिंबाचा रस त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. गुलाबपाणी आणि लिंबाचा रस लावण्यासाठी 3 चमचे गुलाब पाण्यात 1 चमचा लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा, आता ते कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटे ठेवा. त्यानंतर नॉर्मल पाण्याने धुवा. हे मिश्रण त्वचेवरील चिकटपणा दूर करण्याबरोबरच रंग सुधारेल आणि डाग दूर करण्यास देखील मदत करेल.

गुलाब पाणी आणि मध

मधामध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीवायरल गुणधर्मांमुळे ते तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यास तसेच त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. यासाठी, 3 चमचे गुलाब पाण्यात 1/2 चमचे मध मिसळून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर 10 मिनिटे ठेवा. तेलकट त्वचेची समस्या दूर झाल्यामुळे त्वचा चमकदार होईल. तेलकट त्वचेच्या समस्येवर मात करण्यासाठी या प्रकारे गुलाबपाणी लावू शकता. परंतु लक्षात गुलाबपाणी त्वचेवर अप्लाय करण्यापूर्वी, पॅच टेस्ट करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी