गोल मटोल पोटाची लाज वाटते? आजपासून सब्जाचे सेवन करा, घेण्याची ही योग्य पद्धत फॉलो करा

तब्येत पाणी
Updated Apr 11, 2023 | 15:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Chia seeds effective for weight loss : : सब्जा तुमच्या पोटाची अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. पण ते कसे, याबद्दल आपण जाणून घेऊया

 सब्जाचे सेवन करण्याची योग्य पद्धत
पोट घालवण्यासाठी सब्जाचे सेवन करा  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • लटकते पोट तूमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाच्या आड येत आहे, तर हा करा उपाय
  • वेट लॉस साठी सब्जा गुणकारी
  • सब्जाच्या बियांचे सेवन केल्याने तुमची भूक आणि तूमचे हार्मोनल आरोग्य संतुलित राहण्यास ही मदत होते.

Chia seeds for weight loss :  वजन कमी करण्यासाठी सब्जा अनेक प्रकारे मदत करते. सब्जा केवळ तुमच्या पोटाचे कार्य गतिमान करत नाही तर तुमच्या शरीरात असलेली निरुपयोगी चरबी शरीराबाहेर टाकून देण्याचे देखील काम करते. तसेच सब्जा ची आणखीन एक खासियत म्हणजे ते एकप्रकारचे लॅक्सटेसिव आहे जे पोट साफ करण्यामध्ये अत्यंत गुणकारी आहे. (Are you ashamed of your round belly eat chia seeds)

या बियांचे सेवन केल्याने तुमची भूक आणि तूमचे हार्मोनल आरोग्य संतुलित राहण्यास ही मदत होते. चला तर मग, वजन कमी करण्यासाठी सब्जाचे सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया.

अधिक वाचा : ​Eknath Shinde Death Threat: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी 

वेट लॉस साठी सब्जा घेण्याची योग्य पद्धत- How to use chia seeds to lose belly fat:

वेट लॉससाठी सब्जाच्या बिया आणि एप्पल सिडर वीनेगर खूप प्रभावी माध्यम आहे. यासाठी तुम्हाला एप्पल सिडर वीनेगरमध्ये सब्जाच्या बिया भिजत ठेवायच्या आहेत. त्यानंतर एक तासाने यात पाणी टाकून ते प्यायचे आहे. 

अधिक वाचा : ​Swatantryaveer Gaurav Divas : महाराष्ट्रात 28 मे हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरा करणार

वेट लॉस साठी सब्जाच्या बिया आणि एप्पल सीडर वीनेगर - Apple cider vinegar with chia seeds benefits

  1. भूक नियंत्रित करतात - वेट लॉस साठी एप्पल सिडर वीनेगर आणि सब्जाच्या बिया दोन्ही ही तुमची भूक नियंत्रित करतात. सब्जाच्या बिया भरपूर प्रथिने आणि फायबरने परिपूर्ण आहे, ज्यामुळे पोट भरलेले राहते.  तूमचे हार्मोनल आरोग्य योग्य ठेवून भुकेची तलप नियंत्रित करण्यास त्यामुळे मदत मिळते. अशा तऱ्हेने वेट लॉस साठी सब्जा महत्वपूर्ण कार्य करतो. 
  2. चरबी जाळून टाकते- सब्जाच्या बिया जेव्हा तुम्ही एप्पल सिडर मध्ये मिसळून त्याचे सेवन करता तेव्हा तूमचे वजन जलद कमी होते. सर्वप्रथम तर मेटाबॉलिक रेट वाढवतो आणि अतिरिक्त चरबी जाळून टाकण्यास मदत करतो. एप्पल सिडर वीनेगर चरबी जाळण्याच्या क्रियेला गति देते आणि पोटाची चरबी कमी होते.
  3. दोन्ही घटक मिळून शरीराला डिटॉक्स करतात- सब्जाच्या बिया आणि एप्पल सिडरचे एकत्र सेवन केल्याने त्यामधील घटक तूमचे शरीर डिटॉक्स करू लागते. आतड्याची हालचाल गतिमान करून पोट डिटॉक्सिफाय करते. अशाप्रकारे, हे दोन्ही मिळून अतिरिक्त चरबी घटवण्यास मदत करू शकतात.  

*टीप- (सदर लेख हा तुमच्या सामान्य माहितीसाठी देण्यात आला आहे. वरील कोणतेही उपाय करू पाहण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)        

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी