Reasons of Pimples : चेहऱ्यावर मुरुम येण्यामागची ही कारणे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

Pimples Problem : मुरुम (Pimples) तुम्हाला वारंवार त्रास देतात का? त्यामुळे तुम्हाला त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत असतील. अनेकवेळा एखाद्या उत्पादनाची जाहिरात पाहिल्यानंतर आपण इतके प्रभावित होऊन जातो की, कोणताही विचार न करता त्याचा वापर सुरू करतो. मात्र त्यातून आपल्याला अपेक्षित परिणाम साधत नाही. किंबहुना त्वचेच्या नवीन समस्या उद्भवतात.

Skin Care tips
त्वचेची निगा 
थोडं पण कामाचं
  • त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे असते
  • आपल्या त्वचेची स्वच्छता करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक
  • मुरुम होऊ न देण्यासााठीच्या टिप्स

Skincare Tips : नवी दिल्ली : आपला चेहरा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. चेहऱ्याची त्वचा (Skin), चेहऱ्यावरील तजेला याचा मोठा प्रभाव असतो. मात्र अनेकजणांना मुरुमाचा त्रास असतो. यामुळे ते त्रस्त असतात. मुरुम (Pimples) तुम्हाला वारंवार त्रास देतात का? त्यामुळे तुम्हाला त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत असतील. अनेकवेळा एखाद्या उत्पादनाची जाहिरात पाहिल्यानंतर आपण इतके प्रभावित होऊन जातो की, कोणताही विचार न करता त्याचा वापर सुरू करतो. मात्र त्यातून आपल्याला अपेक्षित परिणाम साधत नाही. किंबहुना त्वचेच्या नवीन समस्या उद्भवतात. तुम्ही त्वचेची काळजी घेताना करत असलेल्या चुकांबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. यासंदर्भात विस्ताराने जाणून घ्या. (Are you facing problems of pimples, do this for skin care)

अधिक वाचा  : तुरुंगात बाहेर येताच संजय राऊतांना कोणाचा फोन?

तांदळाचा फेसमास्क नको

अनेकदा चेहरा स्वच्छ करण्यासाठी अनेकजण तांदळाचा फेसमास्क लावतात. जर तुम्हाला त्वचेच्या समस्या टाळायच्या असतील तर तांदळापासून बनवलेला घरगुती फेसमास्क कधीही चेहऱ्यावर लावू नका. कारण तांदळाची भुकटी खरखरीत असते. परिणामी ती प्रत्येकाच्याच त्वचेला योग्य ठरेल असे नाही. या कारणामुळे मुरुम होण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - Diabetes Control : वयाच्या 40-50 व्या वर्षी फास्टिंग शुगर 100-125mg/dl असेल तर आहे मधुमेहाचा धोका...पाहा कसे कराल नियंत्रण

स्क्रब जास्त वेळ नको 

चेहरा स्वच्छ करण्यासाठी स्क्रबिंग केले जाते. याची योग्य पद्धत म्हणजे क्लिंझर लावल्यानंतर स्क्रब करणे. अनेकदा आपण हलक्या हातांनी चेहऱ्यावर स्क्रब घासतो. मात्र स्क्रब लावल्यानंतर चेहऱ्यावर स्क्रब सोडायचा नाही. यामुळे पिंपल्सचा धोका वाढतो.

क्रीम आधारित मॉइश्चरायझर

ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांना मुरुम होण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच अशी त्वचा असलेल्यांनी क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर नाही तर चेहऱ्यावर जेल बेस्ड मॉइश्चरायझर लावले पाहिजे.

अधिक वाचा : Earthquake:देशात भूकंपाचे धक्के, दिल्ली-यूपीसह 7 राज्यांमध्ये हादरे; नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू

तेलाची मालिश

चेहऱ्यावर तेलाने मालिश केल्यामुळे देखील मुरुम होतात. आपल्या त्वचेचा पोत लक्षात घेऊन चेहऱ्याला तेल लावले पाहिजे. यामुळे त्वचेची उघडी छिद्रे आणि मुरुम अशा दोन्ही समस्या उद्भवतात.

चेहऱ्यावर अनेक पुळ्या किंवा मुरुम होतात. यापासून चेहरा मुक्त ठेवण्यासाठी किंवा चेहऱ्यावर मुरुम होऊ नये यासाठी चेहरा स्वच्छ करणे आवश्यक असते. धूळ, घाम इत्यादी गोष्टींमुळे चेहरा खराब होतो. दररोज स्किनची (Daily skin care)  काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुमच्या स्किनच्या समस्या तर दूर होतातच शिवाय तुमची स्किन चमकदारही बनते. स्किनच्या कोरडेपणावर उपचार न केल्यास स्किन ड्राय वाटू लागते. अशावेळी काही सोपे घरगुती उपाय तुम्हाला फारच फायदेशीर ठरू शकतात.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी