सावधान! आपल्या स्वयंपाकघरातील ही फळं विषारी तर नाहीत ना!

तब्येत पाणी
Updated May 20, 2019 | 15:38 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Alert: आजकाल सुंदर सजवून ठेवलेले चमकदार फळं आपण बाजारात बघतो. अशी सुंदर फळं आपल्याला खाण्याचा मोह आवरत नाही. मात्र सावधान ही चमकणारी फळं विषारी सुद्धा असू शकतात. जाणून घ्या कसे ओळखायचे केमिकल युक्त फळ...

Ripe Fruits
अशी ओळखा केमिकलयुक्त फळं  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबई: आजकाल भाजी आणि फळं ताजी दिसण्यासाठी अनेक केमिकल्सचा सर्रास वापर केला जात असल्याचं आढळून आलं आहे. एव्हढंच नव्हे तर अनेकदा फळं नैसर्गिकरित्या नाही तर कृत्रिम पद्धतीनं पिकवली जातात. आपण एखादा फळांचा ठेला पाहिला, त्या ठेल्यावरील सुंदर ताजी दिसणारी फळं आपलं मन मोहून घेतात. ही फळं कधी एकदा घरी नेतो आणि खातो, असं आपल्याला होऊन जातं. पण सावध व्हा... ही फळं केमिकलनं पिकवलेली असू शकतात. आजकाल फळं लवकर बाजारात आणण्यासाठी अनेक जण ती केमिकलमध्ये पिकवत असल्याचं दिसून आलंय.

असे केमिकलयुक्त फळ आपण खाल्ल्यास त्यापासून अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. एखादी अॅलर्जी, फूड पॉयझनिंग सोबतच पॅरालिसिस आणि कँसर सारखे गंभीर आजार अशा केमिकलयुक्त फळामुळे होऊ शकतात.

फळं पिकविण्यासाठी या केमिकल्सचा होतोय सर्रास वापर

फळं कृत्रिमरित्या पिकविण्यासाठी ऍथिलिन गॅसपासून तर कार्बाइड आणि इथ्रेल-३९ सारख्या केमिकल्सचा वापर केला जातोय. या तिन्ही केमिकल्स पैकी ऍथिलिन गॅस सर्वात कमी नुकसान करणारं आहे. कारण फळांवर ही गॅस चिपकून राहत नाही. मात्र ही गॅस महाग असल्यामुळे खूप कमी शेतकरी याचा वापर करतात. स्वस्त असलेल्या कार्बाइडचा वापर अधिक होतो. फळांच्या पेटीमध्ये किंवा बंद खोलीत हे कॅल्शिअम कार्बाइड ठेवलं जातं. यातून निघणाऱ्या गॅसमुळे २४ तासांमध्ये फळं पिकतात. कॅल्शिअम कार्बाइड या केमिकलमध्ये आर्सेनिक हायड्राईड आणि फॉस्फरस हायड्राईड सारखे रसायन असतात, ज्यामुळं कँसर सारखा भयंकर आजार होऊ शकतो. कधी-कधी हे लोक कार्बाइडचं पावडर सुद्धा फळांवर शिंपडतात. तर इथ्रेल ३९ या केमिकलचा वापर पाण्यात मिसळून केला जातो. केमिकल पाण्यात टाकून त्यात फळं ठेवली जातात. देशात अन्न सुरक्षा आणि माणक प्राधिकरणानं फक्त ऍथिलिन गॅसचा वापर करून फळं पिकविण्याला परवानगी दिलीय. मात्र फळं पिकविण्यासाठी इतर केमिकल्सचा वापर करून हे लोक समाजातील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत.

कार्बाइड केमिकलमुळे हे आजार होतात.

कँसरसारख्या आजारासोबतच कार्बाइडमुळे अजूनही भयंकर आजार होतात. कार्बाइडनं पिकवलेली फळं खाल्ल्यास डोकेदुखी, चक्कर येणं, मेंदूचे विकार, खूप झोप येणं, मानसिक आजार, भ्रम निर्माण होण्यासारखे गंभीर परिणाम होतात.

अशी कराल केमिकलयुक्त फळांची ओळख

  • केमिकल घालून पिकवलेल्या फळांवर भरपूर डाग असतात. ही फळं खूप चमकदार दिसतात. केळींवर मात्र डाग असणं हे नैसर्गिक आहे. इतर फळांवर डाग असले की ते केमिकलयुक्त असू शकतात, हे समजावं.
  • कार्बाइडनं पिकवलेले आंबे आणि पपई जास्तीत जास्त दोन दिवस टिकू शकतात. काळी पडल्यावर मात्र लगेच सडायला लागतात.
  • कार्बाइडनं पिकवलेल्या फळांमध्ये नैसर्गिकरित्या असलेला गोडवा कमी असतो. अशी फळं काही ठिकाणी गोड तर काही ठिकाणी आंबट असतात. तसंच अशा फळं काही ठिकाणी पिकलेली आणि बाजूला कच्ची अशी असतात.
  • नैसर्गिकरित्या पिकवलेल्या केळ्यांवर भरपूर काळे डाग असतात आणि त्यांचे देढ काळे पडलेले असते. तर केमिकलनी पिकवलेली केळी पिवळी धम्मक आणि डागाळलेली नसतात. तसंच त्यांचे देढ हिरवे असते.
  • जी सफरचंद अधिक चमकदार दिसतात त्यांच्यावर मेण फिरवलेले असू शकते. त्यांना नखानं खरडवून तपासणं गरजेचं आहे. नखामध्ये मेणासारखं काही लागलं तर अशी सफरचंद विकत घेऊ नका.
  • फळं आणि भाज्या सोलून खा
  • फळं आणि भाज्या खाण्याआधी त्यांच्या वरचा भाग पाण्यात भिजवून ठेवावा आणि मग साफ पाण्यानं स्वच्छ धुवून आणि सोलून घ्यावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सावधान! आपल्या स्वयंपाकघरातील ही फळं विषारी तर नाहीत ना! Description: Alert: आजकाल सुंदर सजवून ठेवलेले चमकदार फळं आपण बाजारात बघतो. अशी सुंदर फळं आपल्याला खाण्याचा मोह आवरत नाही. मात्र सावधान ही चमकणारी फळं विषारी सुद्धा असू शकतात. जाणून घ्या कसे ओळखायचे केमिकल युक्त फळ...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola