Heart Attack : कंबरेची चरबी वाढल्याने वाढतो हृदयविकाराचा धोका...ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संशोधन

Health Tips : अलीकडच्या काळात हृदयविकाराचा धोका (Heart Attack) झपाट्याने वाढत आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. खासकरून जीवनशैलीतील (Lifestyle) बदल हे एक महत्त्वाचे कारण आहे. नुकतेच ऑक्सफर्ड विद्यापीठाने (Oxford University) एक संशोधन प्रसिद्ध केले आहे. संशोधनात असे म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीच्या कमरेवर जास्त चरबी असल्यास असल्यास हृदयाच्या समस्यांचा धोका 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. अयोग्य आहार विहाराच्या सवयींमुळे वजन वाढणे, पोट सुटणे यासारख्या समस्या वाढल्या आहेत.

Heart Attack
ह्रदयविकाराचा झटका 
थोडं पण कामाचं
  • हृदयविकाराचा धोका (Heart Attack) झपाट्याने वाढत आहे.
  • एखाद्या व्यक्तीच्या कमरेवर जास्त चरबी असल्यास असल्यास हृदयाच्या समस्यांचा धोका 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
  • जास्त वजन असलेल्या लोकांपेक्षा मोठ्या कंबर असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराची शक्यता जास्त असते.

Heart Attack Causes :नवी दिल्ली : अलीकडच्या काळात हृदयविकाराचा धोका (Heart Attack) झपाट्याने वाढत आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. खासकरून जीवनशैलीतील (Lifestyle) बदल हे एक महत्त्वाचे कारण आहे. नुकतेच ऑक्सफर्ड विद्यापीठाने (Oxford University) एक  संशोधन प्रसिद्ध केले आहे. संशोधनात असे म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीच्या कमरेवर जास्त चरबी असल्यास असल्यास हृदयाच्या समस्यांचा धोका 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. अयोग्य आहार विहाराच्या सवयींमुळे वजन वाढणे, पोट सुटणे यासारख्या समस्या वाढल्या आहेत. याची परिणती पुढे मोठ्या आजारांमध्ये होते. त्यातील एक महत्त्वाचा आजार म्हणजे ह्रदयविकार. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधन काय म्हणले आहे ते जाणून घेऊया. (As per Oxford University research risk of heart attack rises due to fatty waist)

अधिक वाचा : Gautam Adani Update : जगात नंबर 3! संपत्तीत गौतम अदानींनी बर्नार्ड अर्नॉल्टला टाकले मागे; टॉप 3 मध्ये स्थान मिळवणारा पहिला आशियाई

कंबरवरील जास्तीच्या चरबीमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका

37 इंच कंबर असलेल्या व्यक्तीपेक्षा 41 इंच कंबर असलेल्या व्यक्तीला हृदयविकार होण्याची शक्यता 40 टक्के जास्त असते, असा या अभ्यासाचा अर्थ आहे. शिवाय, संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जास्त वजन असलेल्या लोकांपेक्षा मोठ्या कंबर असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराची शक्यता जास्त असते.

आघाडीचे संशोधक काय म्हणतात?

अभ्यासाचे प्रमुख संशोधक, डॉ अयोडिपुपो ओंगुटाडे  यांनी स्पष्ट केले की 'ट्रंक फॅट' एखाद्या व्यक्तीच्या हृदयाची स्थिती विकसित होण्याचे प्रमुख सूचक आहे. तसेच डॉ. ओगुंटाडे म्हणाले की शरीरातील लठ्ठपणा आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जोखीम यांच्यावर अभ्यास केल्याने असे लक्षात आले की कंबरेभोवतीची चरबी ह्रदयविकाराला चालना देते. 

अधिक वाचा : Suicide in Maharashtra : आत्महत्येत देशात महाराष्ट्राचा क्रमांक प्रथम, तब्बल ६ टक्क्यांनी आत्महत्यांमध्ये वाढ

याव्यतिरिक्त, त्यांनी सांगितले की, मोठी कंबर म्हणजे कंबरेवर जास्त चरबी असलेल्या व्यक्तीला उच्च बॉडी मास इंडेक्स असलेल्या व्यक्तीपेक्षा हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता 3.21 पट जास्त असते. तर जास्त वजनाच्या व्यक्तीमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचा धोका 2.65 पट होता.

अशा प्रकारे होतो हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम 

शास्त्रज्ञांच्या मते, कंबरेचा आकार मोठा असणे हे लक्षण सांगते की एखाद्या व्यक्तीमध्ये जास्त व्हिसेरल चरबी असते. ही अतिरिक्त चरबी पोटाभोवती जमा होते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची हालचाल होते. हालचाल विस्कळीत झाली की हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो. 

अधिक वाचा : Ganesh Chaturthi 2022:  गणेश चतुर्थीला बाप्पाच्या या रंगाच्या मूर्तीची करा स्थापना, प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

भारतात हृदयरोगींची संख्या झपाट्याने वाढते आहे. याला लोक स्वतःच जबाबदार आहेत कारण ते त्यांच्या खाण्याच्या सवयींवर (Food Habits) नियंत्रण ठेवू शकत नाहीत. हृदयविकाराची (Heart Disease) सुरुवात सर्वसाधारणपणे उच्च कोलेस्टेरॉलने होते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे रक्त हृदयापर्यंत पोचण्यासाठी जोर लावावा लागतो.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी