Asafoetida cures five ailments of women : हिंग हा मसाला आहे. स्वयंपाक करताना हिंगाचा वापर पदार्थाला चव यावी यासाठी करतात. पण हिंग हा मसाला एक गुणकारी औषध आहे हे तुम्हाला माहिती आहे का.... आयुर्वेदानुसार हिंग अनेक आजार बरे करण्यास मदत करते. यामुळे हिंग नियमित पण मर्यादीत प्रमाणात खाणे आवश्यक आहे.
तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य
Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १९०३ कोरोना Active, आज ३२६ रुग्ण
भारतात प्रामुख्याने हिंग इराण, अफगाणिस्तान या देशांमधून येते. हे हिंग प्रभावी आणि गुणकारी असते. दमा हा आजार बरा करण्यासाठी हिंग उपयुक्त आहे अस आयुर्वेद सांगते. महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीनेही हिंग उपयुक्त आहे, असे आयुर्वेद सांगते. चला तर मग जाणून घेऊ हिंग या मसाल्याचा महिलांशी संबंधित कोणकोणत्या समस्यांमध्ये औषधासारखा वापर होतो.
लक्षात ठेवा हिंगाचे अतिसेवन गरोदर महिला आणि स्तनदा महिला यांना त्रासदायक ठरू शकते. यामुळे हिंगाचा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हिंगाचे आरोग्याला होणारे इतर लाभ : पोटाशी संबंधित विकार दूर करण्यास मदत करते, डोकेदुखी आणि मायग्रेन बरे करण्यास मदत करते, सर्दी बरी करण्यास मदत करते, तीव्र थकवा दूर करण्यास मदत करते, सूज कमी करण्यास मदत करते, पोटात गॅस (वायू) झाल्यास ही समस्या दूर करण्यास मदत करते