Health Tips: हृतिक रोशनच्या आईचा भन्नाट फिटनेस, ६७व्या वर्षी मारतायेत पुशअप

Pinky Roshan Exercise Tips: वयाच्या ६७व्या वर्षीही हृतिक रोशनची आई पिंकी रोशन या फिटनेसकडे खूप लक्ष देतात. त्यासाठी त्या बरीच मेहनत घेतात. व्यायामापासून योगापर्यंत अनेक गोष्टी न चुकता करतात.

at the age of 67 hrithik roshan mother pinky roshan keeps herself fit does pushups in morning
हृतिक रोशनच्या आईचा भन्नाट फिटनेस, ६७व्या वर्षी मारतायेत पुशअप  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • वयाच्या ६७व्या वर्षीही हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांनी स्वतःला ठेवलंय प्रचंड फिट
  • फिटनेससाठी त्या जास्तीत जास्त वेळ घालवतात जिममध्ये
  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर फॅन्ससोबतचा व्यायाम करतानाच फोटो केला शेअर

Pinky Roshan Health Care Tips: बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्याच्या फिटनेसबद्दल (Fitness) नेहमीच चर्चेत असतो. तो आपला बहुतेक वेळ त्याच्या व्यायाम आणि वर्कआउटमध्ये (Workout) घालवतो, परंतु तुम्हाला माहित आहे का की, हृतिक रोशनपेक्षा त्याची आई पिंकी रोशन (Pinky Roshan) त्याच्यापेक्षा अधिक फिटनेस फ्रीक आहेत. (at the age of 67 hrithik roshan mother pinky roshan keeps herself fit does pushups in morning)

वयाच्या ६७ व्या वर्षीही हृतिक रोशनची आई पिंकी रोशन स्वतःला एवढ्या फिट आहेत की त्यांच्या वयाचा अंदाजही लावता येणार नाही. यासाठी त्या जास्तीत जास्त वेळ जिममध्ये घालवतात. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्या त्यांच्या व्यायामाचा प्रत्येक फोटो चाहत्यांसाठी शेअर करतात. त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट त्यांच्या फिटनेसचे फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे. 

अधिक वाचा: Amruta Fadnavis: प्लॅस्टिक सर्जरी केलीय का मॅडम? या प्रश्नावर अमृता फडणवीसांनी स्पष्टचं दिलं उत्तर

त्यांच्या या व्यायामाची क्रेझ चाहत्यांना देखील आवडते. खास गोष्ट म्हणजे त्या वर्कआउट फॅशनचा पूर्णपणे आनंद घेतात, चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या फिटनेसचे रहस्य.

अधिक वाचा: रणवीर सिंह नंतर आता मलायका अरोरा आणि उर्फी जावेदवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप

पुशअपचे अनेक फायदे

पिंकी रोशन या फिट राहण्यासाठी पुशअप करतात. पुशअप्स करण्याचे अनेक फायदे आहेत. असे केल्याने शरीरातील सर्व स्नायू मजबूत राहतात. यामुळे शरीराचा वरचा भाग मजबूत होतो. हा सर्वोत्तम आणि सोपा व्यायाम आहे. असे केल्याने केवळ वजन कमी होत नाही तर संपूर्ण शरीरासाठी ते फायदेशीर ठरते.

योग करणे आवश्यक आहे

पुश अप्स आणि किक बॉक्सिंगसोबतच पिंकी रोशन योगाकडेही विशेष लक्ष देतात. शरीर, मन आणि मेंदू ताजातवाना राहावा यासाठी त्या रोज सकाळी उठून योगा करतात. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी योग सर्वोत्तम आहे. 

योगासने नियमितपणे केली तर व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहते. पिंकी रोशन यांचे मत आहे की, फक्त फिट राहण्यासाठी व्यायामशाळेत जाणे आवश्यक नाही. यासाठी योगासनही तितकेच महत्त्वाचे आहे. त्या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर योगाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो नेहमी शेअर करतात.

(टीप: या लेखातील टिप्स आणि सल्ले केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून त्याचा अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी