Dahi for health : दही खाल्ल्यावर या पाच गोष्टींचं सेवन टाळा, बिघडू शकते तब्येत

दही हा रोजच्या जेवणातला घटक. त्यासोबत काही पदार्थ एकत्र खाल्ले तर मात्र आरोग्यावर विपरित परिणाम होतात.

Dahi for health
दही खाल्ल्यावर या पाच गोष्टी टाळा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दह्यानंतर काही पदार्थ लगेच खाऊ नयेत
  • काही घटकांच्या मिश्रणामुळे होतात पचनावर परिणाम
  • दही आणि तळलेले पदार्थ एकत्र खाण्याचे पचनक्रिया मंदावते

Dahi for health : कुठल्याही ऋतुमध्ये (SeasoN) जेवण करताना तर वाटीभर दही (dahi) त्यात असेल, तर जेवणाचा आस्वाद (Taste) वाढतो. वेगवेगळ्या पोषक घटकांनी समृद्ध असणारी दही हे भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनलं आहे. घराघरात वापरलं जाणं आणि वेगवेगळ्या वेळी सेवन केलं जाणारं दही व्हिटॅमिन बी-2, व्हिटॅमिन बी-12, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम यासारख्या घटकांमुळे शरीरासाठी पोषक ठरतं. मोठ्या प्रमाणात प्रो-बायोटिक असणारं हे दही आरोग्यासाठी उत्तम असलं तरी ते खाताना काही पथ्यं पाळणं गरजेचं असतं. दही खाल्ल्यानंतर काही गोष्टी लगेच खाल्ल्या, तर त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर दिसू शकतात. जाणून घेऊया, अशा काही गोष्टी ज्या दह्यानंतर लगेच खाऊ नये, असं सांगितलं जातं. 

मासे

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते एकाच वेळी भरपूर प्रोटिन असणाऱ्या गोष्टींचं सेवन करणं योग्य नसतं. दही आणि मासे या दोन्हींमध्ये प्रोटिन असतं. दही आणि मासे या गोष्टी एकत्रित पोटात गेल्या तर पचनाशी संबंधित विकार जडण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे त्वचेवर त्याचे परिणाम दिसायलाही सुरुवात होते. 

अधिक वाचा - Monkeypox: 'या' 6 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो मंकीपॉक्स

दूध

दूध आणि दही यांची जोडी अनेकदा ऐकायला आणि खायलाही चांगली वाटत असली तरी सातत्याने हे दोन्ही पदार्थ एकत्र खाऊ नयेत, असं सांगितलं जातं. दूध आणि दही एकत्र खाणं किंवा दही खाल्ल्यावर लगेच दूध पिण्यामुळे ॲसिडिटी वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणं मळमळ होणे, पोट फुगणे यासारखे त्रासही त्यामुळे सुरू होतात. दूध आणि दही या दोन्हीत मोठ्या प्रमाणात फॅट्स असतात. दोन्ही पदार्थ एकत्र न खाण्याचं हेदेखील एक महत्त्वाचं कारण मानलं जातं. 

आंबा

दही खाल्ल्यानंतर लगेचच आंबा खाल्ल्यामुळे शरीरात विषारी घटक तयार होतात. या दोघांचं एकत्रिकरण पोटात झालं तर वेगवेगळ्या प्रकारची ॲलर्जी होण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - Cholesterol: मेणाप्रमाणे वितळेल कोलेस्ट्रॉल, फक्त १ महिना करा या ड्रिंकचे सेवन

कांदा

जेवणात दही आणि कांदा एकत्र खाणं किंवा दही घालून कांद्याची कोशिंबीर तयार करणं चुकीचं असल्याचा सल्ला काही आयुर्वेदिक तज्ज्ञ देतात. दह्याची प्रकृती थंड असते तर कांद्याची गरम. थंड आणि उष्ण प्रवृत्तीचे पदार्थ एकत्र खाण्यामुळे शरीराचं स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - वयाच्या 60 व्या वर्षीही होणार नाही सांधेदुखी, आजपासून करा या 5 गोष्टी

तळलेले पदार्थ
दही खाल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणावर तळलेले पदार्थ खाणं चुकीचं असल्याचं सांगण्यात येतं. तळलेल्या पदार्थांसोबत दह्याचे मिश्रण झाल्यामुळे पचनाच्या क्रियेत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे पोट बिघडण्याची शक्यता असते. 

डिस्क्लेमर - ही केवळ घरगुती स्वरुपाची सामान्य माहिती आहे. हा कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय किंवा आयुर्वेदिक सल्ला नाही. याबाबत आपल्या आहारतज्ज्ञांशी किंवा डॉक्टरांशी चर्चा करूनच आहाराबाबतचे निर्णय घेणं गरजेचं आहे. पचनाशी संबंधित काही गंभीर त्रास तुम्हाला असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी