Weight Loss Mistakes : वजन कमी करताना या 5 चुका फिरवतात मेहनतीवर पाणी...जाणून घ्या योग्य पद्धत

Weight Loss Tips : अनेकदा वजन कमी करताना (Weight Loss) हमखास काही चुका नेहमीच केल्या जातात. परिणामी आहारावर विशेष लक्ष दिल्यानंतर आणि व्यायाम केल्यावरदेखील अनेकांचे वजन कमी होत नाही. याचाच अर्थ तुमच्याकडून काहीतरी चूक होते आहे. योग्य जीवनशैली, आहारविहार, व्यायाम सर्व करूनसुद्धा वजन कमी करण्यात यश येत नसेल तर तुम्ही काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष दिले पाहिजे.

Weight Loss Tips
वजन कमी करण्याच्या टिप्स 
थोडं पण कामाचं
  • वजन वाढणे ही मोठी समस्या
  • वजन कमी करताना नेहमीच चुका केल्या जातात
  • वजन करताना कसले भान ठेवायचे

Common Mistakes in Weight Loss Journey:नवी दिल्ली : वजन कमी करणे ही काही सोपी गोष्ट नसते. त्यातही अनेकदा वजन कमी करताना (Weight Loss) हमखास काही चुका नेहमीच केल्या जातात. परिणामी आहारावर विशेष लक्ष दिल्यानंतर आणि व्यायाम केल्यावरदेखील अनेकांचे वजन कमी होत नाही. याचाच अर्थ तुमच्याकडून काहीतरी चूक होते आहे. सर्वसाधारणपणे 5 चुका (Mistakes in weight loss) अनेकांकडून होत असतात. जर तुम्ही योग्य जीवनशैली, आहारविहार, व्यायाम सर्व करूनसुद्धा वजन कमी करण्यात यश येत नसेल तर तुम्हाला या मुद्द्यांकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्ही या 5 चुकांपैकी काही चुका करत असण्याची शक्यता आहे. तज्ज्ञ या चुकांबद्दल नेहमी सांगतात. या चुका कोणत्या आहेत आणि वजन कमी करताना कोणत्या गोष्टींचे भान ठेवायचे याबद्दल जाणून घेऊया. (Avoid these common mistakes in weight loss journey)

अधिक वाचा  : बुलडोझरच्या भीतीपोटी राणे पाडताय अधीश बंगल्याचं बांधकाम

वजन कमी करताना टाळायच्या 5 चुका-

बारीक असण्यापेक्षा तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे
तज्ज्ञांच्या मते वजन कमी करण्याचा अर्थ किलोमध्ये वजन कमी होणे असा नसतो. आपल्या आरोग्याची, शारीरिक तंदुरुस्तीची काळजी घेणे महत्त्वाचे. यात सामर्थ्य, सहनशक्ती, लवचिकता आणि अगदी कंबर-टू-हिप गुणोत्तर सर्वकाही समाविष्ट आहे. त्यामुळे वजन कमी करण्याच्या ज्या पद्धती तुम्हाला आवडत नसतील त्यामुळे तुम्हाला फक्त त्रासच होतो. 

अधिक वाचा  : दर गुरुवारी म्हणा साई बाबांची आरती

मागील अनुभवांशी तुलना नका.
वजन कमी करण्याचा प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. शिवाय एकाच व्यक्तीचे वेगवेगळ्या वेगळेच याचे अनुभव वेगवेगळे असतात. एखाद्या वेळेस जो आहार उपयुक्त ठरतो तो दुसऱ्या वेळेस उपयुक्त ठरेलच असे नाही. चांगला आहार तुमच्या शरीराचे पोषण, तणावाची पातळी आणि लागणारी भूक या सर्व घटकांचा विचार करतो.

वजन कमी करताना या गोष्टी लक्षात घ्या
वजन कमी करताना सर्वांचे लक्ष वजन कमी करण्यावरच असते. मात्र वजन कमी करणे म्हणजे शरीरातील मेद कमी करणे. काहीवेळा तुमचे वजन कमी होणार नाही मात्र तुमच्या कमरेचा घेर कमी होतो. असे झाले तरी तुमची योग्य प्रगती होत असल्याचे चिन्ह आहे. तुमच्या शरीरातील बदल पाहण्यासाठी किमान 3 महिने वाट पाहावी लागते. म्हणजेच जर तुमचे वजन कमी होत नसेल पण तुमच्या कंबर आणि नितंबांमध्ये 10 इंचांचा फरक असेल तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात. याशिवाय छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतला पाहिजे.

अधिक वाचा : बाळा नांदगावकरांचा संताप,"त्याचा ऑन द स्पॉट एन्काऊंटर करावा" 

वजन कमी करण्याची घाई नको
वजन काही झटपट कमी होत नाही. यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. साधारणपणे एक वर्षाच्या कालावधीत तुमच्या शरीराच्या वजनापैकी सुमारे 10 टक्के वजन कमी करणे हे निरोगी आणि शाश्वत वजन कमी मानले जाऊ शकते. 

वजन कमी करणे ही शिक्षा नाही
अनेकजण वजन कमी करणे म्हणजे शिक्षा समजतात. यासाठी ते व्यायाम करतात आणि कमी खातात. मात्र व्यायाम आणि आहाराचे संतुलने राखले पाहिजे. योग्य त्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच यावर काम केले पाहिजे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी