Food to avoid in dinner: रात्रीच्या जेवणात ‘या’ पाच गोष्टी विषासमान, वाचा आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला

खाद्या पदार्थाचे पोषणमूल्य जितके महत्त्वाचे असते, तितकीच तो पदार्थ खाण्याची वेळ ही महत्त्वाची असते. दुपारच्या जेवणात ज्या गोष्टी आरोग्यासाठी पोषक ठरतात, त्यातील बऱ्याच गोष्टी या रात्रीच्या जेवणात घेणे आरोग्यासाठी हानिकारक ठरण्याची शक्यता असते.

Food to avoid in dinner
रात्रीच्या जेवणात ‘या’ पाच गोष्टी विषासमान  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रात्रीच्या जेवणात काही पदार्थ ठरतात बाधक
  • दिवसा पौष्टिक ठरणारे पदार्थ रात्री होतात विषासमान
  • दही, तेलकट पदार्थ आणि फळे न खाण्याचा सल्ला

Food to avoid in dinner: जसे खाल, तसे दिसाल ही म्हण आपल्याकडे अनेकदा वापरली जाते. आपलं आरोग्य (Health) हे पूर्णतः आपल्या खाण्यापिण्यावर (Eating patterns) अवलंबून असतं. जर आपण पौष्टिक अन्न खात नसू, तर त्याचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. अयोग्य प्रकारच्या आहारामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत असतं. मात्र त्याचप्रमाणे जर चुकीच्या वेळी एखादी गोष्ट खाल्ली, तरी त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. एखाद्या पदार्थाचे पोषणमूल्य जितके महत्त्वाचे असते, तितकीच तो पदार्थ खाण्याची वेळ ही महत्त्वाची असते. दुपारच्या जेवणात ज्या गोष्टी आरोग्यासाठी पोषक ठरतात, त्यातील बऱ्याच गोष्टी या रात्रीच्या जेवणात घेणे आरोग्यासाठी हानिकारक ठरण्याची शक्यता असते. आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार काही पदार्थ रात्रीच्या जेवणातून टाळणे आवश्यक आहे.

रात्रीच्या जेवणात काय खावे?

रात्रीच्या जेवणा संदर्भात आयुर्वेदात काही नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. रात्रीचे भोजन हे हलके आणि पचायला सोपे असावे. हा नियम पाळला नाही तर छातीत जळजळणे, पोट जड होणे यासारख्या त्रासांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. असे कुठले पदार्थ रात्रीच्या जेवणात त्रासदायक ठरतात, ते पाहूया.

दही

दही हा पोटासाठी अत्यंत उपयुक्त पदार्थ. मात्र रात्रीच्या जेवणात दही खाणं आरोग्याला हानिकारक ठरतं. दही पचवण्यासाठी शरीराला अधिक मेहनत घ्यावी लागते. त्याचप्रमाणे दह्याची प्रकृती थंड असल्यामुळे रात्रीच्या जेवणात त्याचा त्रास होऊ शकतो.

अधिक वाचा - Stamina Tips for Men: हा घरगुती उपाय वाढवतो 'स्टॅमिना' , पुरुषांसाठी 'रामबाण' मानला जातो

तळलेले पदार्थ

जर तुम्हाला पुरी भाजी किंवा छोले भटूरे खाण्यात रस असेल, तर रात्रीची वेळ त्यासाठी अयोग्य आहे. हे पदार्थ पचायला जड असतात. त्यामुळे रात्रीच्या जेवणात ते खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. रात्रीच्या जेवणात सातत्याने तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात विषारी घटक जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता असते.

रेड मीट

हिवाळ्यात अनेक जण रात्रीच्या जेवणात रेड मीट खाणं पसंत करतात. मांसाहार केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. मात्र कुठलेही मटण हे उष्ण असते तरी पचायला तितकेच जड असते. शरीरातील पित्त आणि कफ हे दोष असंतुलित करण्याचे काम मांसाहार करू शकतो. त्यामुळेच आयुर्वेदिक डॉक्टर रात्रीच्या वेळी मांसाहार न करण्याचा सल्ला देतात.

अधिक वाचा - Benefits of cinnamon milk : दुधात हा पदार्थ टाकून प्यायल्यास दूर होतील चेहऱ्यावरील पुळ्या अन् नाकातील सर्दी

थंड प्रवृत्तीची फळे

फळे खाणे हे आरोग्यासाठी वरदान मानले जाते. मात्र रात्रीचे वेळी फळे खाणे हे विषासमान असते. फळे हलकी आणि थंड प्रवृत्तीची असतात. रात्रीच्या वेळी ती खाण्यामुळे सर्दी खोकला होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे रात्री केवळ फलाहार केल्यामुळे पोट भरत नाही आणि वारंवार भूक लागण्याची शक्यता असते.

पाकीटबंद पदार्थ

झोपण्यापूर्वी अनेकांना प्रोसेस्ड फूड किंवा गोड पदार्थ खाण्याची सवय असते. यामुळे आपले वजन वाढण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे पोटही बिघडू शकते.

डिस्क्लेमर: रात्रीच्या जेवणात न खाण्याच्या पदार्थांबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर प्रश्न अथवा समस्या असतील, तर तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी