Avoid With Tea : चहा हे जवळपास प्रत्येक भारतीय कुटुंबात तयार होणारं पेय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या निमित्तानं घराघरात चहाचं आदण टाकलं जातं. काहीजण दिवसातून एकदा किंवा दोनदा चहा पितात, तर काहीजणांना तासातासाला चहा पिण्याचीही सवय असते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, तसाच चहाचाही अतिरेक वाईटच ठरतो. मात्र काहीजण चहा प्रमाणात पित असूनही त्यांचे दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर होताना दिसतात. आपण चहा प्रमाणात पित असूनही आपल्याला त्याचा त्रास का होत असेल, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. वास्तविक, चहामुळे जितकं शरीराचं नुकसान होतं, त्यापेक्षा कित्येक पट अधिक नुकसान चहासोबत चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळे होतं. त्यामुळे चहासोबत कुठले पदार्थ खाऊ नयेत, याची माहिती असणं गरजेचं आहे. जाणून घेऊया असेच काही पदार्थ.
चहासोबत अनेकांना शेंगदाणे खाण्याची सवय असते. शक्यतो खारे शेंगदाणे आणि चहा हे कॉम्बिनेशन अनेकांच्या आवडीचं असतं. मात्र शेंगदाण्यात मोठ्या प्रमाणात लोह असतं. चहासोबत लोह असणारे कुठलेही पदार्थ खाणं शरीरासाठी घातक ठरू शकतं.
अधिक वाचा - Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? डाएटमध्ये बाजरीसोबत या पिठांचाही करा समावेश
चहासोबत आयर्नने संपन्न असणाऱ्या भाज्या खाणं टाळायला हवं. चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सालेट हे दोन घटक असतात. या घटकांमुळे भाज्यांमधील लोह शरीरात शोषून घेण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे या घटकांचा शरीराला काहीच फायदा होत नाही आणि ते पचवण्यासाठी शरीराची ऊर्जा मात्र नाहक खर्च होते. त्यामुळे आयर्न असणारे कुठलेही पदार्थ चहासोबत खाणं टाळण्याचा सल्ला देण्यात येतो.
चहासोबत लिंबू कधीही खाऊ नये. लेमन टी पिण्याचा सल्ला फिटनेस इंडस्ट्रीत अनेकदा दिला जातो. चहा आणि लिंबू यांच्या मिश्रणामुळे वजन कमी व्हायला मदत होते, असंही सांगितलं जातं. मात्र चहात लिंबू मिसळल्यानंतर ॲसिडिक मिश्रण तयार होतं, हे समजून घेण्याची गरज आहे. यामुळे शरीरातील वेगवेगळ्या भागांना सूज येण्याची शक्यता असते. रिकाम्या पोटी जर लिंबू आणि चहा हे मिश्रण घेतलं तर हार्टबर्नसारखी समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकारचा चहा टाळण्याचाच सल्ला आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून दिला जातो. लिंबूचे सेवन करायचेच असेल तर स्वतंत्रपणे करावे, चहासोबत नको, असा सल्ला दिला जातो.
अधिक वाचा - Liver Health : दारु आणि सिगरेटप्रमाणे ‘या’ गोष्टींमुळेही खराब होतं यकृत, वाचा सविस्तर
भजी किंवा कुठल्याही तळलेल्या पदार्थासोबत चहाचा आस्वाद घेण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. आपल्यापैकी बहुतांश लोक असाच चहा पिणं पसंत करतात. मात्र चहासोबत डाळीच्या पिठाचे कुठलेही पदार्थ खाल्ले तर पचनाची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचं आहार तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे शरीरात येणारी पोषक द्रव्यं शोषून घेण्याची शरीराची क्षमता कमी होते.
चहासोबत हळद असणारा कुठलाही पदार्थ खाऊ नये. त्यामुळे प्रचंड प्रमाणात ॲसिडिटी होण्याची शक्यता असते.
अधिक वाचा - Worst Food for Men : पुरुषांनो, सावधान! हे पदार्थ हळूहळू कमी करतायत ‘मर्दानगी’, जाणून घ्या सविस्तर यादी
थंड वस्तू आणि गरम चहा असं कॉम्बिनेशन खाणं हे सर्वात चुकीचं असल्याचं डॉक्टर सांगतात. यामुळे पचनाशी संबंधित विकार उद्भवू शकतात. गरम चहा प्यायल्यानंतर किमान अर्धा तास कुठलाही थंड पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो.