Ayurvedic body detox : बॉडी डीटॉक्स करण्याची आयुर्वेदातील प्रभावी आणि सोपी पद्धत

Simple And Effective Ways To Detox Body : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तणाव, प्रदूषण, धूम्रपान, मद्यपान, दीर्घकाळ एका ठिकाणी बसून काम करणे यामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, थायरॉइड अशा समस्या त्रास देऊ लागतात

Ayurveda Doctor Share 4 Simple And Effective Ways To Detox Body Naturally
बॉडी डीटॉक्स करण्याची आयुर्वेदातील प्रभावी आणि सोपी पद्धत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बॉडी डीटॉक्स करण्याची आयुर्वेदातील प्रभावी आणि सोपी पद्धत
  • शरीरात विषद्रव्ये जमा होण्याचे प्रमुख कारण
  • नेती आणि नस्य केले तर सायनस, सर्दी, खोकला या समस्यांतून बरे होण्यास मोठी मदत

Simple And Effective Ways To Detox Body : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तणाव, प्रदूषण, धूम्रपान, मद्यपान, दीर्घकाळ एका ठिकाणी बसून काम करणे यामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, थायरॉइड अशा समस्या त्रास देऊ लागतात

प्रामुख्याने चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे हे आजार लवकर बरे व्हावे यासाठी बॉडी डीटॉक्स करणे आवश्यक आहे. डीटॉक्स करून विषद्रव्ये शरीराबाहेर टाकल्यास तब्येतीत लवकर सुधारणा होण्यास मदत होऊ शकते. ( Ayurveda Doctor Share 4 Simple And Effective Ways To Detox Body Naturally )

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

बॉडी डीटॉक्स कशी करावी याचे शास्त्रशुद्ध तंत्र आहे. आयुर्वेदात तर बॉडी डीटॉक्स करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. यापैकी एक आयुर्वेदिक पद्धत बॉडी डीटॉक्स करण्यासाठी लाभदायी आणि सर्वाधिक प्रभावी समजली जाते. 

शरीरात विषद्रव्ये जमा होण्याचे प्रमुख कारण

आयुर्वेदानुसार शरीरात वात, कफ, पित्त हे त्रिदोष सामावलेले असतात. जेव्हा वात, कफ, पित्त यांच्यातील किमान एका घटकाची पातळी वाढते तेव्हा आपोआप उर्वरित दोन पैकी किमान एका घटकाची पातळी कमी होते आणि शरीरात समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते. त्रिदोषांचे संतुलन बिघडते तेव्हाच शरीरात विषद्रव्ये निर्माण होण्यास सुरुवात होते. 

एका आठवड्यात वजन झटपट घटविणारा प्रभावी डाएट प्लॅन

नेती आणि नस्य केले तर सायनस, सर्दी, खोकला या समस्यांतून बरे होण्यास मोठी मदत होते. नेतीसाठी नेती पॉट नावाचे भांडे मिळते. या भांड्यातील पाणी एक नाकपुडीवाटे शरीरात घेऊन दुसऱ्या नाकपुडीवाटे शरीराबाहेर टाकता येते. 

लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी रोज करा या फळांचे सेवन

धौती क्रिया

जास्तीत जास्त पाणी प्यावे आणि नैसर्गिकरित्या उलटी होण्यास सुरुवात होताच उलटी होऊ द्यावी. या पद्धतीने पोटातील विषद्रव्ये वेगाने शरीराबाहेर टाकता येतात. या क्रियेसाठी सकाळची वेळ योग्य आहे. धौती केल्यास पोटाशी संबंधित अनेक विकारांचा त्रास टाळणे शक्य आहे. 

ऑइल पुलिंग

नारळाचे तेल अथवा लवंग तेलाचा वापर करून दातांना मसाज करणे. तेलाने एक-दोन वेळा चुळ भरणे असे उपाय करून दातांचे आणि तोडांचे आरोग्य जपणे शक्य आहे.

सलग काही मिनिटे एक चमचा तेल तोंडात धरून ठेवून नंतर चुळ भरल्यास शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. तोंडाचे विकार, दातांच्या समस्या बऱ्या होण्यास मदत होते. 

कपालभाती

श्वसन नियंत्रणाचा हा व्यायाम करून शरीरात जास्तीत जास्त ऑक्सिजन सामावून घ्यावा. एका नाकपुडीने श्वास घेणे आणि दुसऱ्या नाकपुडीने नियंत्रित पद्धतीने श्वास सोडणे हा व्यायाम करून शरीरातील उर्जा आणि उत्साह वाढवू शकता. श्वसन विकार, पोटाचे आजार, रक्तदाब, मधुमेह, हृद्यविकार यावर कपालभाती हा एक प्रभावी उपाय आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी