ayurveda tips, eat lauki, stay healthy; know the benefits of eating lauki : ताज्या भाज्या शरीराला अनेक पोषक घटकांचा पुरवठा करतात. यामुळे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते; असे आयुर्वेद सांगते. आयुर्वेदानुसार दुधी ही भाजी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. दुधीत भरपूर पोषणमूल्ये आहेत.
दुधी ही सहज पचणारी रुचकर हिरवी भाजी आहे. ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांना दुधीची भाजी खाण्याने फायदा होईल. रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात राहण्यास मदत होईल. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी रक्तदाब नियंत्रणात येईपर्यंत दररोज दुधीचा रस किंवा दुधीची भाजी अशा स्वरुपात दुधीचे सेवन करणे हिताचे आहे.
Ghee in winter: जेवणात मनसोक्त खा तूप, हिवाळ्यात राहाल फिट अँड फाईन!
दुधीचे नियमित सेवन केल्याने केस आणि त्वचेला लाभ होतो. अकाली टक्कल पडणे, अकाली केस पांढरे होणे या समस्यांनी पीडित असलेल्यांनी नियमित दुधीचा रस किंवा दुधीची भाजी अशा स्वरुपात दुधीचे सेवन करणे हिताचे आहे. केसांच्या समस्येवर थेट उपाय म्हणून टाळूवर दुधीचा रस लावून किमान अर्धा तास ठेवावे नंतर डोकं स्वच्छ धुवून घ्यावे.
दुधीचा रस नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करतो आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतो. शरीरातील आतडे अर्थात इंटेसस्टाइन (intestines) हा महत्त्वाचा अवयव निरोगी राहावा तसेच आतड्याने पूर्ण क्षमतेने काम करावे यासाठी नियमित दुधीचा रस किंवा दुधीची भाजी अशा स्वरुपात दुधीचे सेवन करणे हिताचे आहे.
दुधी एक कार्डिओ-टॉनिक आणि लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. अल्सर, ताप आणि श्वसन विकारांवर उपचार करण्यासाठी दुधीचे सेवन करणे हिताचे आहे. दुधीचे सेवन शरीरातील वातदोष आणि कफदोष नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. पोट किंवा आतड्यांशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर दुधीचा रस उकळवून नंतर पिणे आरोग्यासाठी हिताचे आहे.