Back Pain Home remedies: कमी वयातच होऊ लागली आहे पाठदुखीची समस्या? हे करा घरगुती उपाय

तब्येत पाणी
Updated Apr 13, 2023 | 21:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Back Pain Cure : कंबर दुखी वा पाठ दुखीचा त्रास म्हणजे माणूस बेजार होतो. जर तुमचे वय कमी आहे आणि तरीही तुम्हाला या प्रकारच्या समस्येला तोंड द्यावे लागत असेल तर त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. पाठदुखीपासून बचाव करण्यासाठी अतिशय सहज आणि परिणामकारक असा घरगुती उपाय आम्ही इथे सांगत आहोत. हे नियमित केल्यास तुमची पाठदुखीची समस्या झटक्यात दूर होईल.

Home remedies for Back Pain
आजकाल तरुणांमध्येही पाठ, कंबर आणि मानदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आजकाल तरुणांमध्येही पाठ, कंबर आणि मानदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
  • जर तुमचे वय कमी आहे आणि तरीही तुम्हाला या प्रकारच्या समस्येला तोंड द्यावे लागत असेल तर त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.
  • पाठदुखीपासून बचाव करण्यासाठी अतिशय सहज आणि परिणामकारक असा घरगुती उपाय आम्ही इथे सांगत आहोत.

Home remedies for Back Pain: संपूर्ण दिवस लॅपटॉप घेऊन एकाच जागी बऱ्याच वेळ चुकीच्या पद्धतीमध्ये बसत आहात? तुमच्या शरीरात पोषक घटकांचा अभाव आहे? वजन वाढीची काळजी वाटते? या सगळ्यांचे उत्तर जर हो, असेल तर तुम्हाला पाठदुखीची समस्या होणे स्वाभाविकच आहे. पाठदुखी या सामान्य वाटणाऱ्या समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते.  (back pain happened at an early age do this home remedies)

अधिक वाचा : ​देशात प्रथमच नदीखालून धावली ट्रेन

आजकाल तरुणांमध्येही पाठ, कंबर आणि मानदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असं होण्यामागे कारण म्हणजे दिवसभर हालचाल न करता चुकीच्या पद्धतीमध्ये जास्तकाळ बसून राहणे आणि मान वाकवून काम केल्याने पाठीच्या कण्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे कंबर, पाठ आणि मान दुखण्याच्या समस्या होऊ शकतात.

चुकीची जीवनपद्धती आणि वजन वाढीमुळे तुम्हाला  पाठदुखीची समस्या भेडसावत असेल, तर हे घरगुती उपाय तुम्हाला खूप चांगला फायदा मिळवून देऊ शकतात. ज्याचा वापर केल्याने तुमची पाठ आणि कंबरदुखीची समस्या तर कमी होईलच,  पण याचा वापर नियमितपणे केल्यास ती मुळापासून नष्ट देखील होऊ शकेल. 

अधिक वाचा : ​केडीच्या सेटवर संजय दत्त जखमी

सहसा आपण दुखणे तात्काळ थांबवण्यासाठी पेन किलर किंवा एंटी बायोटीक ढोसचे सेवन करतो, मात्र तुमच्या आरोग्यासाठी ते खूप हानिकारक असू शकते. म्हणूनच पाठ आणि कंबर दुखीपासून मुक्त होण्यासाठी हे रामबाण घरगुती उपाय एकदा तरी नक्की ट्राय करून पहा.

हळदीचे दूध

पाठदुखीसाठी हळद खूप गुणकारी आहे. हळदीमध्ये अनेक एंटी-बॅक्टेरियल, एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे वेदना कमी करण्याचे काम करतात. जर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होत असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी गरम किंवा थंड दुधात एक चमचा हळद टाकून त्याचे सेवन करा. 

आले

आल्याचा वापर केवळ मसाल्यासाठी होत नाही, तर वेदना कमी करण्यासाठीदेखील आले फायदेशीर आहे. आल्यामध्‍ये पाठदुखी नष्ट करणारे गुणधर्म आहेत, आल्यातील जिंजरॉन आणि जिंजरॉल यांसारखी रसायने वेदना कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. पाठदुखीच्या समस्येपासून निवारण करण्यासाठी आल्याचा एक छोटा तुकडा घेऊन तो सोलून पाण्यात चांगले उकळून घ्या, आणि त्यानंतर ते थंड झाल्यावर गाळून घ्या. आल्याचे हे पाणी दहा मिनिटे असेच राहू द्या, नंतर त्यात मध किंवा लिंबाचा रस घालून प्या.

गलांगल

आल्यासारखा दिसणारा हा पदार्थ पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी वापरता येईल. तुम्ही आल्याच्या ऐवजी गलांगल रूटचा चहा बनवू शकता, यासाठी तुम्हाला फक्त गलांगल रूटचा एक छोटा तुकडा घ्यावा लागेल आणि काही मिनिटे पाण्यात उकळवावा लागेल. नंतर ते पाणी गाळून त्यात चवीनुसार साखर व मध टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी ते प्यावे. असे केल्याने पाठदुखीची समस्या ताबडतोब दूर होईल.

अधिक वाचा : ​उत्तरप्रदेशातील गँगस्टर अतीकचा मुलगा असदचा एन्काऊंटर

लॅव्हेंडर

जांभळ्या रंगाचे हे फूल तुमच्या शरीरातील स्नायूंचा जडपणा आणि कडकपणा दूर करण्याचे महत्वपूर्ण काम करते. पाठदुखीसाठी तुम्ही लॅव्हेंडरचे तेल तुमच्या पाठ आणि कंबरेसाठी वापरू शकता. लॅव्हेंडर तेल नारळ किंवा अन्य तेलात चांगले मिसळून लावल्याने वेदना कमी होतात.

लाल मिरची

शरीरातील वेदना कमी करण्यासाठी लाल मिरची देखील गुणकारी माध्यम आहे. घरच्या घरी पाठदुखीवर उपचार करायचा असल्यास लाल मिरचीचे तेल लावणे फायदेशीर ठरू शकते. तसेच स्नायू आकडणे आणि सूज येणे यांसारख्या समस्यांपासून, लाल मिरचीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी, फ्लेव्होनॉइड्स, पोटॅशियम आणि मॅंगनीज या गुणधर्मामुळे तात्काळ आराम मिळतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी