Bad Breath Can Be Sign Of Diabetes, Lungs And Gut Health Try These 5 Tips To Lower The Risk : तोंडाची दुर्गंधी हा आजारांशी संबंधित संकेत असू शकतो असे आयुर्वेद सांगते. तोंडाची स्वच्छता व्यवस्थित केली नाही तर दातांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकते. पोटाचे विकार होऊ शकतात. अॅसिडिटी अर्थात पित्ताचा त्रास होऊ शकतो. मधुमेह होऊ शकतो. फुफ्फुसांशी संबंधित त्रास होऊ शकतो. धूम्रपान, मद्यपान, तंबाखू-मावा-गुटखा याचे सेवन यामुळेही तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. यामुळे तोंडाची स्वच्छता राखणे, व्यसने टाळणे आणि आरोग्याची काळजी घेणे मुखदुर्गंधी घालविण्यासाठी आवश्यक आहे.
तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य
दीर्घकाळ तोंडाला दुर्गंधी येणे हे आजाराचे लक्षण आहे. यामुळे तोंडाची दुर्गंधी जात नसल्यास वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे. आयुर्वेदाचार्यांच्या मते तोंडाला दुर्गंधी येत असल्यास तोंडाच्या स्वच्छतेवर भर द्या. तसेच व्यसने करणे टाळावे. पचायला हलका असा आहार घेण्यावर भर द्यावा. आयुर्वेदाचार्यांच्या मते तोंडाची दुर्गंधी घालविण्याचे पाच सोपे उपाय आहेत... जाणून घ्या हे उपाय...