Cholesterol Control Tips: थंडीत कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' 5 पदार्थांचे सेवन करा

तब्येत पाणी
Updated Nov 06, 2022 | 17:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

How to control bad cholesterol: खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे सध्या कोलेस्ट्रॉल वाढल्याची ( bad cholesterol) तक्रार सगळेच करू लागले आहेत. कोलेस्ट्रॉलची पातळी हिवाळ्यात वाढतेच आणि म्हणूनच कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी (Cholesterol Control Tips) योग्य पदार्थांचा आहारात वापर करा.

Bad Cholesterol Control Tips in winter
बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वापरा 'हे' पदार्थ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एवोकॅडोमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स असतात जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात.
  • बदाम आणि इतर ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते.
  • ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडच्या सेवनामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते

Food to reduced high cholesterol in winter: आपल्या शरीरातील पेशी, जीवनसत्त्वे आणि संप्रेरकांच्या निर्मितीमध्ये कोलेस्ट्रॉलची (cholesterol) भूमिका महत्त्वाची असते, परंतु त्याचे जास्त प्रमाण शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत. High density cholesterol (HDL) आणि low density cholesterol (LDL). एलडीएल कोलेस्टेरॉलला बॅड कोलेस्टेरॉल म्हणतात कारण ते रक्ताच्या धमन्यांमध्ये जमा होते आणि रक्तप्रवाह रोखते, ज्यामुळे हृदयावर अनावश्यक दबाव पडतो आणि अनेक रोग होतात. (Bad Cholesterol Control Tips in winter)

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी टाळल्याने बॅड कोलेस्टेरॉल वाढते. सॅच्युरेटेड फॅटपासून बनवलेल्या वस्तू जसे की पाम तेल, खोबरेल तेल, शुद्ध तेल यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढते. बॅड कोलेस्ट्रॉल  वाढल्याने हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, स्ट्रोक इत्यादींचा धोका वाढतो. थंडीत कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता जास्त असते. 

अधिक वाचा : प्रशांत दामलेंचा 12 हजार 500 प्रयोगांचा विक्रम

थंडीत वाढणाऱ्या कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवण्यासाठी या पदार्थांचा वापर करा

1. बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दलिया खूप फायदेशीर आहे. दलियामध्ये विरघळणारे फायबर असते जे एलडीएल कमी करते. ओटमील व्यतिरिक्त, मोड आलेले कडधान्य, सफरचंददेखील 
कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. सकाळी न्याहारी करताना या गोष्टींचे सेवन करू शकता.

2. ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स सेवन केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. तेलकट माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय हे रक्तदाब आणि रक्त गोठण्याची समस्या दूर करते. शरीरात पुरेशा प्रमाणात ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड असल्‍याने अचानक होणाऱ्या मृत्यूचा धोका खूप कमी होतो. माशांव्यतीरिक्त, ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड चिया बियाणे, मोहरीचे दाणे, फ्लेक्ससीड यामध्येही असते. यामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल किंवा निरोगी कोलेस्ट्रॉल वाढवण्याची क्षमता असते. सॅल्मन, ट्युना फिशमध्ये सर्वाधिक चांगले कोलेस्ट्रॉल असते. हिवाळ्यात नाचणी, जवसाच्या बिया, ज्वारी, बाजरी इत्यादी बिया असलेली फळे खावीत.

अधिक वाचा : आलिया-रणबीरला 'मुलगी झाली हो'

3. बदाम आणि ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. ज्यांना हृदयाच्या आजारांचा त्रास आहे त्यांनी आक्रोड खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. अक्रोडमध्ये मल्टीव्हिटामिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. 
त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊन चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. ड्रायफ्रूट्समध्ये कॅलरीज जास्त असतात त्यामुळे बदाम जास्त खाऊ नयेत. 


4. एवोकॅडोमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स असतात जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात. एवोकॅडोचे दररोज सेवन केल्याने हृदय निरोगी राहते आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. लठ्ठपणाने त्रस्त लोकांसाठी वजन कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. एवोकॅडो सॅलड म्हणून खाऊ शकतो.

5. हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.  हिरव्या भाज्याांच्या सेवनाने  अनेक आजारांपासून बचाव होतो. पालक, फ्लॉवर, कोबी, टोमॅटो इत्यादी बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यासोबतच दारू आणि सिगारेटचे सेवन सोडून द्या. आणि रोज व्यायाम करा.


( डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही. )

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी