Eye care tips: या चुकीच्या सवयींमुळे होतं डोळ्यांचं नुकसान, आजच सोडा!

आपल्या नकळत अनेक चुकीच्या सवयी आपल्या डोळ्यांचं आरोग्य धोक्यात आणत असतात. अशा सवयी ओळखून त्या वेळीच बदलायला हव्यात.

Eye care tips
या चुकीच्या सवयींमुळे होतं डोळ्याचं नुकसान  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • चुकीच्या सवयींमुळे डोळे होतात खराब
  • घाण हाताने डोळे चोळण्याची सवय घातक
  • धुम्रपान केल्याने होते नजर कमी

Eye care tips: डोळे (Eyes) हा आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव (Important organ) आहे. शरीराच्या अनेक नाजूक अवयवांपैकी डोळे हा अवयव मानला जातो. डोळ्यांनी आपण आपल्या आजूबाजूचं जग पाहत असतो आणि डोळ्यांमुळेच आपल्या आयुष्याला विशेष अर्थ असतो. मात्र अनेकांना डोळ्यांबाबत वेगवेगळे त्रास असल्याचं दिसतं. काहींना डोळ्यांबाबत काही अनुवांशिक त्रास होण्याची शक्यता असते, तर काहींजणांना चुकीच्या सवयींमुळे (Bad habits) डोळ्यांचा त्रास सुरू होतो. धावपळीच्या आयुष्यात आपण आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे डोळ्यांचं नुकसान करत आहोत, हे अनेकांच्या लक्षात येत नाही. या सवयी जर वेळीच बंद केल्या नाहीत, तर डोळ्यांचं कायमस्वरुपी नुकसान होण्याची शक्यता असते. जाणून घेऊया अशा काही सवयी, ज्या डोळ्यांचं नुकसान करणाऱ्या ठरतात. 

घाण हातांनी डोळे चोळणे

अनेकजण डोळ्यांना खाज आल्यानंतर आपल्या हातांनी डोळे चोळतात. प्रवासात असताना, कामाच्या ठिकाणी असताना आपले हात स्वच्छ नसण्याची शक्यता असते. हातांची सफाई न करताच ते डोळ्यांना लावले जातात. त्यामुळे डोळ्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. 

कॉन्टॅक्ट लेन्स

सध्या अनेकजण फॅशन म्हणून कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतात. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या लेन्स फॅशन म्हणून वापरल्या जातात. मात्र या लेन्सची जर योग्य प्रकारे स्वच्छता केली नाही, तर डोळ्यांचं नुकसान होण्याची शक्यता असते. झोपण्यापूर्वी लेन्स काढून ठेवणं आवश्यक असतं. लेन्स घालून झोपण्यामुळे त्या डोळ्यांना चिकटतात. त्यामुळे बुब्बुळाला गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. 

पाणी कमी पिणे

डोळे तरतरीत, आरोग्यपूर्ण दिसण्यासाठी दररोज मुबलक पाणी पिण्याची गरज असते. जर तुमच्या शरीरात पाण्याचं प्रमाण कमी असेल, तर डोळे कमकुवत आणि निस्तेज दिसू लागतात. त्याचप्रमाणे डोळ्यांची वरचेवर तपासणी करणंही आवश्यक असतं. 

धूम्रपान

एका रिसर्चनुसार धुम्रपान करणाऱ्या लोकांच्या डोळे इतरांच्या तुलनेत अधिक कमकुवत असतात. त्यांची दृष्टी इतरांपेक्षा कमी असल्याचं दिसून आलं आहे. धुम्रपान केल्यामुळे मोतिबिंदू, डोळे कोरडे पडणे यासारख्या समस्या अधिक वेगाने आणि कमी वयात उद्भवू शकतात. त्याशिवाय धुम्रपानामुळे शरीरावरही गंभीर परिणाम होऊन वेगवेगळे रोग जडण्याची शक्यता निर्माण होते. 

अधिक वाचा - Signs of bad stomach : तुमच्या पोटात ‘ऑल इज नॉट वेल’! सांगतात ‘ही’ लक्षणं

योग्य आहार गरजेचा

डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आणि सकस आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. रोजच्या आहारात मिनरल्स आणि प्रोटिन्स असतील, याची काळजी घ्यावी. ताजी फळं आणि भाज्या यांचा समावेश रोजच्या जेवणाता करण्याचा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञ देतात. त्याचप्रमाणे मोबाईल आणि टीव्ही यांच्या अतिवापरामुळेदेखील डोळ्यांवर ताण येण्याची शक्यता असते. त्यामुळे कामाव्यतिरिक्त स्क्रीनटाईम कमी करण्याचा सल्ला दिला जातो. 

डिस्क्लेमर - डोळ्यांच्या आरोग्याबाबतीत या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी