मुंबई: वजन घटवणे(weight loss) काही सोपी गोष्ट नाही. आपले डाएट(diet) आणि खाण्यापिम्यात योग्य बदल केल्याने शरीराची चरबी विरघळण्यास सुरूवात होते. अशातच आपण आपल्या डाएटमध्ये जे काही सामील केले आहे त्यावर लक्ष द्यावे लागते. केळे एक असे फळ आहे जे साधारणपणे वजन वाढण्यास कारणीभूत ठरते.. एका केळ्यामध्ये साधारण १०५ कॅलरी असतात जी वजन घटवण्यास आणि वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे तुम्ही किती प्रमाणात केळे खात आहात यावर लक्ष देणे गरजेचे असते. banana diet will help you to weight loss
अधिक वाचा - प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेसला दिला 'प्लॅन 370
दही आणि केळ्यामुळे वेगाने कमी होते चरबी
दह्यात केळे घालून खाल्ल्यामुळे शरीरातील चरबी वेगाने कमी होते. कारण दही आणि केळ्यामध्ये तंतूमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि खाण्याची इच्छा टाळली जाऊन वजन कमी होते.
अधिक वाचा - Mumbai : कळस यात्रेदरम्यान दोन गटात राडा
पिवळ्या रंगाच्या या फळातून व्हिटॅमिन ए, बी, सी, ई, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे शरीराला आवश्यक घटक मिळतात. पण लठ्ठपणा किंवा मधुमेहाचा त्रास असेल तर डॉक्टरांच्या परवानगीशिवाय केळे खाऊ नका.