Piles Causing Foods: सावधान! या 5 गोष्टी खाल्ल्याने होतो मूळव्याधीचा त्रास, या समस्येपासून होते सुरुवात

मूळव्याध या आजाराला इंग्रजीत piles and hemorrhoids म्हणतात. ज्याच्या आत तुमच्या गुद्द्वार आणि गुदाशयातील नसांना सूज येते आणि रक्तस्त्राव होण्याची समस्या देखील असू शकते. बद्धकोष्ठतेची समस्या हे मूळव्याध आजाराचे प्रमुख कारण आहे.

Hemorrhoids can be caused by eating these 5 things
सावधान! या 5 गोष्टी खाल्ल्याने होतो मूळव्याधीचा त्रास  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • बद्धकोष्ठतेची समस्या टाळल्यास मूळव्याध रोगाला टाळता येणं शक्य आहे.
  • गहू, बार्ली यांसारख्या धान्यांमध्ये ग्लूटेन नावाचे प्रोटीन आढळते.
  • गाईचे दूध किंवा त्यापासून बनविलेले दुग्धजन्य पदार्थ देखील बद्धकोष्ठता आणि मूळव्याध रोग विकसित करू शकतात.

नवी दिल्ली : मूळव्याध या आजाराला इंग्रजीत piles and hemorrhoids म्हणतात. ज्याच्या आत तुमच्या गुद्द्वार आणि गुदाशयातील नसांना सूज येते आणि रक्तस्त्राव होण्याची समस्या देखील असू शकते. बद्धकोष्ठतेची समस्या हे मूळव्याध आजाराचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या टाळल्यास मूळव्याध रोगाला टाळता येणं शक्य आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की ते कोणते पदार्थ आहेत, जे बद्धकोष्ठतेचे कारण बनतात. 

Piles Causing Foods: मूळव्याध टाळण्यासाठी हे पदार्थ खाऊ नका

बद्धकोष्ठतेची समस्या हे मूळव्याध रोगाचे मुख्य कारण मानले जाते. कारण बद्धकोष्ठतेच्या वेळी तुम्हाला मल जाण्यात जास्त त्रास होतो, ज्यामुळे गुद्द्वार आणि गुदाशयाच्या शिरा आणि ऊतींना सूज येऊ शकते. त्यामुळे बद्धकोष्ठता निर्माण करणाऱ्या या पदार्थांपासून दूर राहा. 

ग्लूटेन असलेले पदार्थ

ग्लूटेनयुक्त पदार्थांमुळे बद्धकोष्ठता आणि मूळव्याध होऊ शकतो. गहू, बार्ली यांसारख्या धान्यांमध्ये ग्लूटेन नावाचे प्रोटीन आढळते. ज्यामुळे काही लोकांमध्ये स्वयंप्रतिकार रोग विकसित होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्या पचनास गंभीरपणे नुकसान करते. याआधी बद्धकोष्ठता आणि नंतर मूळव्याधचा आजार सुरू होऊ शकतो.

गाईचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

काही लोकांमध्ये, गाईचे दूध किंवा त्यापासून बनविलेले दुग्धजन्य पदार्थ देखील बद्धकोष्ठता आणि मूळव्याध रोग विकसित करू शकतात. कारण, गाईच्या दुधात असलेल्या प्रोटीनमुळे बद्धकोष्ठता देखील होऊ शकते. अनेक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. गायीच्या दुधाऐवजी तुम्ही सोया दूध वापरू शकता. 

लाल मांस

लाल मांसाचे सेवन हे बद्धकोष्ठतेमुळे होणा-या मूळव्याधचे कारण बनू शकते. कारण, रेड मीटमध्ये नगण्य प्रमाणात फायबर असते आणि त्यामध्ये फॅटचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे ते शरीराद्वारे सहज पचत नाही आणि ते गोळा होऊन शरीरातून बाहेर पडण्यात समस्या निर्माण होऊ शकते. मूळव्याधीच्या रुग्णांनी यापासून दूर राहावे.

तळलेले आणि फास्ट फूड

जर तुम्ही खूप तळलेले किंवा फास्ट फूड खाल्ले तर तुम्हाला मुळव्याधची समस्या होऊ शकते. कारण, लाल मांसाप्रमाणे या पदार्थांमध्येही फायबरचे प्रमाण कमी आणि चरबी जास्त असते. त्याऐवजी हिरव्या भाज्या, फळे खावीत.

दारू

अल्कोहोलमुळे शरीरात डिहायड्रेशन होते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या गंभीर बनते. बद्धकोष्ठतेची ही समस्या मल सहजतेने जाण्यास अडथळा आणते आणि मूळव्याध रोगास कारणीभूत ठरते.
Disclaimer: या माहितीची अचूकता, समयसूचकता आणि सत्यता सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. मात्र, ही टाइम्स नाऊची नैतिक जबाबदारी नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी