सावधान! एका जागी बसून काम करताय?; हालचाल होत नसल्यानं वाढतोय कॅन्सरचा धोका

जच्या जीवनशैलीमध्ये अनियमित आहार आणि कमी शारिरिक हालचालींमुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या  आजारांना आमंत्रण दिलं जात आहे.

Increased risk of cancer due to lack of movement
हालचाल होत नसल्यानं वाढतोय कॅन्सरचा धोका  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • शारिरीक हालचाल नसल्यानं कर्करोगाची लागण होण्याची शक्यता.
  • जर्नल ऑफ मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइजमध्ये कॅन्सरविषयी नवीन संशोधन प्रकाशीत.
  • संशोधनाच्या आकडेवारीनुसार, 2013 ते 2016 दरम्यान 30 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये शारीरिक हालचालींचा अभाव

नवी दिल्ली : आजच्या जीवनशैलीमध्ये अनियमित आहार आणि कमी शारिरिक हालचालींमुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या  आजारांना आमंत्रण दिलं जात आहे. बैठे काम तसेच शारिरीक हालचाली होत नसल्याने बहुतेक जण विविध आजारांना बळी पडत आहेत.  अनेकजण कामात खूपच व्यग्र राहतात आणि त्यांना दिवसभरात व्यायामासाठी थोडाही वेळ काढणे जमत नाही. पण आपल्याला कल्पना नसेल पण शारिरीक हालचाल नसल्यानं कर्करोगाची लागण होण्याची शक्यता आहे. यामुळे व्यायाम करणे ही आता रोजची सवय बनवण्याची गरज आहे. 

अलिकडे अनेकांनी चालणे सोडून दिले आहे, जिने चढणे कमी झाले आहेत, अन्नामध्ये फळे-हिरव्या भाज्या कटाक्षाने खाण्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होतं आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, यासर्व गोष्टी आपल्याला काही गंभीर आजारांकडे घेऊन जात आहेत. दैनिक जागरणमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, अमेरिकेत करण्यात आलेल्या एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, जर लोक दर आठवड्याला किमान 5 तास मध्यम ते तीव्र पातळीवरील शारीरिक हालचाली करत असतील तर सरासरी 46 हजारांहून अधिक लोकांना कर्करोगाच्या प्रकरणांपासून दरवर्षी वाचवता येऊ शकते.

हे संशोधन जर्नल ऑफ मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइजमध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनाच्या आकडेवारीनुसार, 2013 ते 2016 दरम्यान 30 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये शारीरिक हालचालींचा अभाव असल्याचे दिसून आले. परंतु हे प्रमाण पुरुषांच्या  (14,277 प्रकरणे) तुलनेत महिलांमध्ये (32,089 प्रकरणे) जास्त होते. केंटकी, वेस्ट व्हर्जिनिया, लुइसियाना, टेनेसी आणि मिसिसिपी सारख्या अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये स्त्रियांना शारीरिक हालचाली आणि कर्करोगाच्या घटनांमध्ये जास्त समानता असल्याचे दिसून आले. उटा, मोंटाना, वायोमिंग, वॉशिंग्टन आणि विंकान्सीन या पर्वतीय राज्यांमध्ये हे प्रमाण स्त्रियांमध्ये कमी असल्याचे दिसून आले आहे. 

अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, हे पहिले संशोधन आहे ज्यात कॅन्सरला शारीरिक हालचालींच्या अभावाशी जोडले गेले आहे. ते म्हणतात की, अशा कॅन्सरमध्ये ब्रेस्ट, एंडोमेट्रियल कॅन्सर, कोलन कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, किडनी कॅन्सर इ. होतात. सर्वाधिक पोटाच्या कर्करोगाची टक्केवारी 16.9 आहे. सर्वात कमी 3.9 मध्ये मूत्राशयाच्या कर्करोगाचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी