Beard Hairs : केस गळण्याची (Hair Fall) समस्या ही महिलांप्रमाणे पुरुषांनाही सतावत असते. काहीजणांना दाढीचे केस (Beard hairs) गळण्याचीही समस्या असते. या समस्येत दाढीचे केस गळायला सुरुवात होते. रोजच्या रोज दाढीचे केस गळू लागतात आणि दाढी विरळ होण्यास सुरुवात होते. दाढी वाढवण्याची हौस असणाऱ्या अनेकांसाठी ही बाब चिंताजनक ठरते. जे लोक क्लिनशेव करतात, त्यांच्या ही समस्या लक्षात येत नाही. मात्र गेल्या काही वर्षात दाढी वाढवण्याचा ट्रेंड आहे. अनेक तरुण वेगवेगळ्या स्टाईलने आपली दाढी वाढवत असल्याचं दिसतं. मात्र दाढीचे केस गळायला सुरुवात झाल्यामुळे त्याच्यावर काय उपाय (Home made remedies) करावा, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. जाणून घेऊया, या समस्येवरचे काही सोपे आणि घरगुती उपाय.
दाढीचे केस गळण्यामागे अनेक कारणं असण्याची शक्यता असते. अनेकांना अनुवांशिक कारणामुळेही दाढीचे केस गळू लागल्याचा अनुभव वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर येतो. त्याचप्रमाणं फंगल इन्फेक्शन, टेटेस्टेरॉन हार्मोन्सची कमतरता, केमोथेरपी, ऑटोइम्युन आजार, प्रोटिन आणि झिंक यांची कमतरता यासारख्या अनेक कारणांमुळे दाढीचे केस गळायला सुरुवात होते. चुकीचा आहार आणि झोपण्याच्या चुकीच्या वेळा याचाही परिणाम दाढीचे केस गळण्यावर होत असतो. त्यासाठी काही सोपे उपाय करणं गरजेचं असतं.
व्हिटॅमिन आणि मिनरल्स हे दाढीशिवाय संपूर्ण शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे तुमच्य्या आहारात डाळी, अंडी आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे दाढीचे केस गळणं कमी होऊ शकेल.
अधिक वाचा - Morning Habits : 'या'5 सवयी तुमचा मूड दिवसभर फ्रेश आणि सकारात्मकता टिकवून ठेवतील
आवळा हा व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असतो. आवळ्यातील व्हिटॅमिन आणि इतर औषधी गुणांमुळे दाढी गळण्याचं प्रमाण कमी होतं आणि काही दिवसांतच ही समस्या सुटल्याचा अनुभव येऊ शकतो.
दाढीला काही ठराविक दिवसांनी मसाज करण्याची गरज असते. त्यामुळे दाढीची सलग वाढ होते आणि दाढी गळण्याच्या प्रमाणात घट होते. सातत्याने काही दिवस असे केल्यामुळे दाढीचे केस अधिक आरोग्यपूर्ण होतात आणि केस गळण्याची समस्या कमी होते. असा अनुभव आहे.
अधिक वाचा - Ayurvedic body detox : बॉडी डीटॉक्स करण्याची आयुर्वेदातील प्रभावी आणि सोपी पद्धत
दाढीची गळती रोखण्यासाठी मोहरीचं तेल गुणकारी मानलं जातं. मोहरीच्या तेलाने हळूहळू दाढीला मसाज करण्याचा सल्ला दिला जातो. अगोदर मोहरीच्या तेलाचे काही थेंब दाढीवर लावावेत आणि दोन्ही हातांनी त्याला हलका मसाज करावा, असं तज्ज्ञ सांगतात.
ड्रायफ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात. त्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन्सची कमतरता भरून निघते आणि दाढीचे केस गळण्याचं प्रमाण कमी होतं.
डिस्क्लेमर - दाढीच्या केसांची गळती रोखण्याबाबतच्या या काही घरगुती आणि सामान्य टिप्स आहेत. याबाबत तुम्हाला काही गंभीर समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे.