The Dangers of Consuming Too Much Salt: जागतिक आरोग्य संघटनेनुसार, सोडियमच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी मीठ दिवसाला 5 ग्रॅम किंवा एक चमचा इतकंच असावे.
WHO ने सोडियमचे सेवन कमी करण्याबाबत एक जागतिक अहवाल बनवला आहे, ज्यात त्यांनी म्हटले की, बहुतेक मृत्यू हे सोडियमच्या अतिसेवनामुळे होणारे ह्रदयविकार आणि रक्तवाहिन्यासंबंधीत विकारांमुळे होतात. WHO ने अंदाज वर्तवला आहे की, सध्या सुरू असलेल्या दशक अखेरपर्यंत 7 लाख लोक केवळ मिठाच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या रोगांनी मृत्युमुखी पडतील. (Before 2030 salt can become the cause of death of millions people!)
अधिक वाचा : सुकन्या योजनेच्या गुंतवणूकदारांना ३१ मार्चला बसू शकतो धक्का
रिपोर्टनुसार, मिठाचा सर्वाधिक वापर चीनमध्ये होतो. एक चिनी व्यक्ति सुमारे 10.9 ग्रॅम मीठ वापरते, दररोज 10 ग्रॅम मीठ वापरण्याच्या यादीत भारताचा सहावा क्रमांक लागतो, भारतात देखील यामुळे अनेक लोक बळी पडत आहेत.
भारतातील डॉक्टरांनीदेखील या रिपोर्टला दुजोरा दिला असून WHO ने सादर केलेला हा रिपोर्ट एक वेक अप कॉल असल्याचे म्हटले आहे. आता तरी लोकांनी जागरूक होऊन जेवणात मीठ कमी प्रमाणात वापरले पाहिजे आणि स्वतःच्या आरोग्यासोबतचा खेळ थांबवला पाहिजे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शिवाय बाजारातील पॅकिंग केलेले पदार्थ खाऊ नये, कारण त्यात मिठाचे प्रमाण अधिक असते, त्या ऐवजी घरी शिजवलेले अन्न खावे असे सांगितले.
भारतीय स्पाइनल इंज्युरीज सेंटर (ISIC) अंतर्गत वैद्यकीय विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. राजकुमार यांनी सांगितले की, मिठाच्या अतिसेवनाचा थेट आणि गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होतो, उच्च रक्तदाब सारख्या समस्येमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक तयार होऊ शकतात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात तसेच इतर हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीत समस्यांचा धोका वाढू शकतो.
अधिक वाचा : राहुच्या चक्रात अडकले राहुल गांधी, जाणून घ्या काय होईल पुढे.
डॉक्टरांनी सांगितले की, जास्त मिठाचे सेवन केल्यामुळे किडनीचे विकार बळावतात, कारण शरिरातील सोडियमचे संतुलन राखण्यासाठी मूत्रपिंड महत्वाचे कार्य करत असते, जे मिठाच्या अती सेवनामुळे बिघडते. मीठ जास्त प्रमाणात खालल्यामुळे कॅल्शियमचे देखील नुकसान होऊ शकते, ज्यामुळे हाडे कमकुवत होऊन ऑस्टिओपोरोसिस नामक समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे, या सर्व समस्यांपासून बचाव करण्यासाठी भारतीयांनी दररोज केवळ 5 ग्रॅम मिठाचे सेवन करावे, असे त्यांनी सांगितले. असे असले तरी आरडीए वय, लिंग आणि आरोग्यावर अवलंबून बदलत असते. त्यामुळे काही केसेसमध्ये व्यक्तींना 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाणे गरजेचं असू शकते.
पीएसआरआय हॉस्पिटलमधील इन्स्टिट्यूट ऑफ रेनल सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. संजीव सक्सेना यांनी सांगितले की, मिठाच्या अतिसेवनामुळे किडनी निकामी होण्याची शक्यता अधिक असते. उच्च रक्तदाबासारखी सामान्य वाटणारी समस्या किडनी निकामी सारखा गंभीर आजाराला आमंत्रित करु शकतो. मधुमेह असलेल्या लोकांना उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते. तसेच मूत्रपिंडाशी संबंधित रुग्णांमध्ये मिठाच्या अतिसेवनामुळे मूत्रपिंड निकामी होण्याची प्रकरणे इतर रुग्णांपेक्षा जास्त आहेत.
अधिक वाचा : 3 स्टार आणि 5 स्टार AC यामध्ये काय आहे फरक? जाणून घ्या
शालिमार बाग येथील फोर्टिस रुग्णालयातील वरिष्ठ सल्लागार आणि फिजिशियन डॉ. राहुल जैन यांनी सांगितले की, अत्याधिक सोडियम (70% पेक्षा जास्त) टेबल सॉल्टमधून मिळत नाही तर पॅकिंग फुड्स आणि प्रीपॅकेज केलेले पदार्थ खाल्ल्याने मिळते. 400 मिलिग्रॅम किंवा त्याहून अधिक सोडियम असलेल्या पदार्थांना उच्च सोडियम पदार्थ म्हणतात. 400 मिलिग्रॅम किंवा त्याहून अधिक सोडियमचे प्रमाण असलेल्या पदार्थांना हाई सोडियम फूड्स म्हटले जाते. हाय सोडियम फुड्सच्या पॅकेटवर, नमकीन किंवा चटपटीत स्नॅक्स असे काही तरी लिहिलेले असते, ज्यावर मोनोसोडियम ग्लूटामेटचा देखील उल्लेख असतो, मात्र हा देखील सोडियमचाच एक भाग आहे म्हणूनच जास्तीत जास्त घरी शिजवलेले अन्न खावे.