Belly fat : काय आबा ढेरी कमी करताय? मग फॉलो करा या सोप्या टिप्स

Belly Fat Loss Tips : सध्या कोरोनाचा (Corona) काळ असल्याने अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना (Employees) घरातून काम करण्यास सांगत आहेत. यामुळे सतत आठ ते दहा तास एकाच जागेवर एकाच स्थिती बसून काम करावं लागतं आहे. घरात बसून काम करण्याची मुभा मिळाली पण शरीराची हलचाल जास्त होत नसल्याने पोटाची चरबी वाढू लागली आहे.

Bell Fat reduce Tips
पोटावरील चरबी कमी करायच्या सोप्या टिप्स   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दररोज व्यायाम करणं, योगाभ्यास, चालणं, धावणे हे सर्व केल्यानं वाढतं वजन झटपट कमी होण्यात मदत होते
  • दररोज सूर्यनमस्कार केल्याने पोटाची चरबी कमी होऊ शकते.
  • वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने तुमचे वजन कमी होईल.

Belly Fat Loss Tips :  मुंबई :  सध्या कोरोनाचा (Corona) काळ असल्याने अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना (Employees) घरातून काम करण्यास सांगत आहेत. यामुळे सतत आठ ते दहा तास एकाच जागेवर एकाच स्थिती बसून काम करावं लागतं आहे. घरात बसून काम करण्याची मुभा मिळाली पण शरीराची हलचाल जास्त होत नसल्याने पोटाची चरबी वाढू लागली आहे. त्यामुळे चरबी (Fat) कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करतात. जर तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी (Belly Fat) कमी करायची असेल तर या सोप्या टिप्स तुम्ही फॉलो करू शकता.  दररोज व्यायाम करणं, योगाभ्यास, चालणं, धावणे हे सर्व केल्यानं वाढतं वजन झटपट कमी होण्यात मदत होते आणि आपले वजनसुद्धा नियंत्रणात राहते. पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्हाला तळलेले आणि मसाल्याचे पदार्थ खाणे कमी करावे लागेल. तसेच डाएटमध्ये तुम्हाला फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा लागेल. 

सूर्यनमस्कार करा 

दररोज सूर्यनमस्कार केल्याने पोटाची चरबी कमी होऊ शकते. भुजंगासन, नौकासन आणि चक्रासन इत्यादी आसनाचे प्रकार केल्यानं पोटाची चरबी झटपट कमी होऊ शकते. 

शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवा

पाणी जास्त पिल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होते. पाणी जास्त पिल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होते. सकाळी उठल्यानंतर लगेच पाणी पिल्याने शरीरातील अॅसिडीटी कमी होते. तसेच सकाळी पाणी प्यायल्याने पचनक्रिया देखील सुधारते. जर तुम्ही डायटिंग करत असाल तर तुम्ही साकाळी रिकाम्या पोटी पाणी पिले पाहिजे. त्यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिक रेट वाढेल.

गरम पाणी प्या- 

वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने तुमचे वजन कमी होईल. गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली होते. आयुर्वेदात असेही म्हटले आहे की सकाळी 2 कप कोमट पाणी प्यायल्याने शरीरात उर्जा निर्माण होते. कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून प्यायल्याने बेली फॅट्स कमी होतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी