Belly Fat: सुटलेल्या पोटामुळे मिळतं अनेक आजारांना निमंत्रण; हे घरगुती उपाय करून रहाल फिट

Belly Fat: वाढलेलं वजन (Weight) आणि पोटावरची वाढलेली चरबी (Belly Fat) कमी करण्यासाठी लोक कितीतरी प्रकारच्या सप्लिमेंट्स घेत असतात आणि वेगवेगळे व्यायामही (work out) करतात. पण हे सर्व प्रयत्न कधी कधी पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत नाहीत.

Reduce Belly Fat
सुटलेल्या पोटाला कसे आवरणार, जाणून घ्या घरगुती उपाय  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पीनट बटरमध्ये प्रथिनं आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. याच्यामुळं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं.
  • काळी मिरी तुमच्या पोटावरची चरबी कमी करण्यात खूप मदत करते. ती चरबी जमा होऊ देत नाही
  • मेथीची भाजी आणि त्याच्या बियांमुळं पोटावरची चरबी अगदी सहजपणे कमी होऊ शकते.

Belly Fat: नवी दिल्ली : वाढलेलं वजन (Weight) आणि पोटावरची वाढलेली चरबी (Belly Fat) कमी करण्यासाठी लोक कितीतरी प्रकारच्या सप्लिमेंट्स घेत असतात आणि वेगवेगळे व्यायामही (work out) करतात. पण हे सर्व प्रयत्न कधी कधी पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत नाहीत. यामुळे तुमचे पैसे आणि मेहनत व्यर्थ गेल्याची जाणीव तुम्हाला होत असते. यासोबतच दुष्परिणामांचा धोकाही कायम आहे. तर मग पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला घरात उपलब्ध असलेल्या काही पदार्थांचे सेवन करता येईल. यामुळे तुम्हाला दुष्परिणामांचा धोका नसेल. जाणून घेऊ पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोणते घरगुती पदार्थ उपयुक्त ठरू शकतात.बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकजण वजन वाढीच्या आणि पोटावरील चरबी वाढीच्या समस्येने ग्रस्त आहेत. या समस्यांची निराकरण करण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय या लेखात सांगत आहोत..  

स्थूलपणा कमी करण्यासाठी मेथी आहे उपयोगी 

मेथीची भाजी आणि त्याच्या बियांमुळं पोटावरची चरबी अगदी सहजपणे कमी होऊ शकते. मेथीचा चरबी जाळण्यासाठी चांगला उपयोग होतो. तसंच, मेथीची भाजी आणि मेथी दाणे भिजवलेलं पाणी प्यायल्यानं आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

पीनट बटर ठरू शकतं उपयुक्त

पीनट बटर तुमच्या पोटावरची चरबी कमी करण्यास मदत करू शकतं. पीनट बटरमध्ये प्रथिनं आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. याच्यामुळं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. जर तुम्ही साधं घरचं किंवा विकत आणून लोणी वापरत असाल तर त्याच्या जागी पीनट बटर हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल.

काळी मिरीनेही कमी होणार सुटलेलं पोट 

काळी मिरी तुमच्या पोटावरची चरबी कमी करण्यात खूप मदत करते. ती चरबी जमा होऊ देत नाही आणि चरबी सहजपणे जाळण्यास मदत करते. एवढंच नाही तर काळी मिरी खाल्ल्याने चयापचय क्रियाही वाढते आणि रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते.

मटारचं सेवन ठरेल फायदेशीर

मटारचं सेवन पोटावरची चरबी कमी करण्यासाठीदेखील उपयुक्त ठरू शकतं. मटार स्थूलपणा कमी करण्यासाठी उत्तम आहे. यामुळे पोटावरची चरबी कमी होत असून रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासही उपयुक्त असते.

हरभरा खाणं उपयुक्त

तुमच्या पोटावरची चरबी कमी करण्यासाठी चणे उपयुक्त ठरू शकतात. हरभरा खाल्ल्यानं चरबी जाळली जातेच. शिवाय, प्रथिनं, फायबर आणि खनिजं यांसारखी पोषक तत्त्वं शरीराला मिळतात.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ मराठी त्याची हमी देत नाही.)


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी