Health tips for uric acid । मुंबई : शरीरात प्रमाणापेक्षा जास्त युरिक अॅसिडची (uric acid)निर्मिती ही आता सामान्य समस्या बनली आहे. हा आजार केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिला नसून तरुणांमध्येही या आजाराने पाय पसरले आहेत. शरीरात युरियाचे प्रमाण वाढल्याने अंगावर सूज येते, सांधेदुखी (Joint pain) यांसारख्या समस्या उद्भवतात. ज्याचा दैनंदिन जीवनावर वाईट परिणाम होतो, त्यामुळे चिडचिडेपणाही येतो. अशा परिस्थितीत या घरगुती उपायाचा अवलंब केल्यास या आजारापासून लवकर सुटका होऊ शकते. येथे आम्ही तुम्हाला दुधी भोपळ्याच्या (Bottle gourd) रसाबद्दल सांगत आहोत, जे प्याल्याने तुमच्या शरीरातील युरिक नियंत्रणात येईल. (beneficial to drink this leafy vegetable juice to control uric acid in the body)
दुधी भोपळा रस बनवण्यासाठी तुम्हाला बाजारातून दुधी भोपळा आणावे लागेल , त्याला कापून त्याच्या बिया काढून टाका. नंतर त्याचे छोटे तुकडे करून ज्युसरमध्ये टाका आणि नीट ढवळून घ्या. नंतर एका भांड्यात काढून त्यात पाणी मिसळा. दुधी भोपळ्याचा रस पिण्यासाठी तयार आहे.
जर तुम्ही हे नियमित केले तर तुम्हाला लवकरच ह्याचे परिणाम दिसतील. हा रस रिकाम्या पोटी प्यायल्याने त्याचे फायदे जास्त होतात.
युरिक एसिड संबंधित आजारात फ्रेंच बीन्सचा रस देखील फायदेशीर आहे. तुम्ही ते दिवसातून दोनदा घेऊ शकता. दुधी भोपळ्याचे नियमित सेवन केल्याने शरीरात युरिक बर्याच अंशी नियंत्रणात राहील.
ऑलिव्ह ऑईल देखील यूरिक ऍसिड नियंत्रित करण्याचे काम करते. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म शरीरात युरियाची पातळी वाढू देत नाहीत. भाजीपाल्यांचा रसही या आजारात फायदेशीर ठरतो. यामध्ये केळी, काकडी, ब्रोकोली, लिंबू इत्यादींच्या रसाचे सेवन फायदेशीर ठरते.
या आजारात उन्हाळ्यातील फळ, ब्लॅकबेरी हे देखील खूप गुणकारी आहे. इतकंच नाही तर बेरी आणि सफरचंद व्हिनेगरचा आहारासोबत समावेश केला जाऊ शकतो. ह्याचे परिणाम सुद्धा चांगले आहेत.