Aloe Vera Benefits: अशी वापरा कोरफड...चेहऱ्यावरील चमक पाहून सगळे होतील थक्क!

Skin Care Tips : आयुर्वेदातदेखील कोरफडचे महत्त्व (Importance of Aloe Vera)सांगितले आहे. खासकरून त्वचा, केस यांच्यासाठी कोरफड फारच उपयुक्त असते. औषधांमध्येही कोरफडचा वापर केला जातो. काहीवेळा तर कोरफडचा रसदेखील प्यायला जातो. अॅलोवेरा जेल म्हणजे कोरफडचा रस (Aloe Vera Gel) हे फेस मास्क, फेस पॅक आणि हेअर मास्कसाठी वापरले जाते.

Benefits Of Aloe Vera
कोरफडचे फायदे 
थोडं पण कामाचं
  • कोरफडचे अनेक औषधी उपयोग
  • त्चचेसाठी कोरफड गुणकारी
  • कोरफडीचा वापर करण्याच्या टिप्स

Benefits Of Aloe Vera :नवी दिल्ली : कोरफड (Aloe Vera) ही एक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदातदेखील कोरफडचे महत्त्व (Importance of Aloe Vera)सांगितले आहे. खासकरून त्वचा, केस यांच्यासाठी कोरफड फारच उपयुक्त असते. औषधांमध्येही कोरफडचा वापर केला जातो. काहीवेळा तर कोरफडचा रसदेखील प्यायला जातो. अॅलोवेरा जेल म्हणजे कोरफडचा रस (Aloe Vera Gel) हे फेस मास्क, फेस पॅक आणि हेअर मास्कसाठी वापरले जाते. याशिवाय इतरही अनेक बाबतीत कोरफडचा वापर केला जातो. कोरफडीचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी (Skin care) कशा पद्धतीने केला जातो ते जाणून घेऊया. (Benefits Aloe Vera in skin care & Face cleaning)

अधिक वाचा : ATM कार्ड विसरलात? स्मार्टफोनच्या मदतीने काढा एटीएममधून पैसे

चेहऱ्याच्या त्वचेसाठी कोरफडचे फायदे-

चेहरा साफ करण्यासाठी

चेहऱ्यावर अनेक पुळ्या किंवा मुरुम होतात. यापासून चेहरा मुक्त ठेवण्यासाठी किंवा चेहऱ्यावर मुरुम होऊ नये यासाठी चेहरा स्वच्छ करणे आवश्यक असते. धूळ, घाम इत्यादी गोष्टींमुळे चेहरा खराब होतो. अशावेळी चेहरा साफ करायला कोरफड उपयुक्त ठरते. यासाठी आधी कोरफडीचा लगदा घ्या. त्यानंतर तो चेहऱ्यावर घासून चेहरा स्वच्छ करा. थोडा वेळ ठेवून नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून टाका. कोरफडीतील अॅंडी ऑक्सिंडट गुणधर्म त्वचेला तजेलदार बनवतात.

अधिक वाचा : चंद्रग्रहणामुळे भूकंप? काय आहे ग्रहण आणि भूकंपाचं कनेक्शन? 

मेकअप काढण्यासाठी

मेकअप करणे ही आता एक सर्वसामान्य बाब झाली आहे. मात्र मेकअप केल्याने अनेक समस्यादेखील उद्भवतात. त्यामुळे मेकअप काढून चेहरा स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे असते. मेकअप काढण्यासाठी कोरफड उपयुक्त ठरते. हे काम नैसर्गिकरित्या होते. त्यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार होते.

टोनर

चेहऱ्यासाठी टोनरचा वापर केला जातो. कोरफड टोनरम्हणूनदेखील उपयुक्त असते. कोरफडीचा गर घ्या आणि त्याला बारीक करा. त्यानंतर एका स्प्रे बाटलीत भरून तुम्ही याचा वापर करू शकता.

अधिक वाचा : ठाकरे गटाची मुलुखमैदान तोफ पुन्हा धडाडणार, राऊतांना जामीन

सणासुदीच्या काळात महिलांना खूप काम करावे लागते. विशेषत: दिवाळी आणि छठ (Diwali and Chhath)  यांसारख्या सणांमध्ये घराची साफसफाई (cleaning) करण्यापासून ते खरेदी करण्यापर्यंत आणि विविध प्रकारचे पदार्थ बनवण्यापर्यंत महिलांकडे स्वत:साठी फारच कमी वेळ असतो. त्यामुळेच सण आला की त्यांचा चेहरा खूप थकलेला दिसतो. दररोज स्किनची (Daily skin care)  काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुमच्या स्किनच्या समस्या तर दूर होतातच शिवाय तुमची स्किन चमकदारही बनते. विशेषतः हिवाळ्याच्या सुरुवातीला स्किन खूप कोरडी होऊ लागते. अशा परिस्थितीत स्किनच्या कोरडेपणावर उपचार न केल्यास स्किन ड्राय वाटू लागते. अशावेळी काही सोपे घरगुती उपाय तुम्हाला फारच फायदेशीर ठरू शकतात.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी